मुंबई - मुंबईतील वरळी परिसरामध्ये राहत असलेल्या एका 29 वर्षीय महिला डॉक्टरने तणावाखाली येऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आलेली आहे. मुंबईतील वरळी परिसरात राहणाऱ्या निताशा बेंगाली या 29 वर्षीय एमबीबीएस डॉक्टरने गुरुवारी तिच्या राहत्या घरात विषारी इंजेक्शन स्वतःला टोचून घेऊन आत्महत्या केली असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
निताशा ही पेशाने एमबीबीएस डॉक्टर होती व एमडीचा अभ्यास ती करत होती. गेल्या काही महिन्यांपासून निताशा बेंगाली ही मानसिक तणावाखाली असल्याचे तिच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे. गुरुवारी दुपारच्या वेळेस निताशा बेंगाली हिने तिच्या बेडरूममध्ये असताना विषारी इंजेक्शन स्वतःला टोचून घेतले होते व त्यानंतर ती बाहेर येऊन तिच्या आईला तिने इंजेक्शन घेतल्याचे सांगितल्यानंतर तिला तात्काळ मुंबईतील नायर रुग्णालयांमध्ये उपचारासाठी नेण्यात आले होते. मात्र नायर रुग्णालयात दाखल करून घेण्यापूर्वीच निताशा हीस डॉक्टरांनी मृत घोषित केले होते.
या संदर्भात वरळी पोलीस ठाण्यामध्ये मृत्यूची नोंद करण्यात आलेली असून आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार निताशा बेंगाली हिच्या पोस्ट मॉर्टम रिपोर्टनंतर तिने कुठले इंजेक्शन स्वतःला टोचून घेतले होते याचे उत्तर मिळेल, असे पोलिसांनी सांगितले. निताशाची आईही डॉक्टर असून वडील इंजिनियर आहेत. मात्र गेल्या काही दिवसांपासून निताशा ही मानसिक तणावाखाली असल्यामुळे तिच्यावर उपचार सुरू असल्याचे तिच्या कुटुंबियांनी म्हटले आहे.
विषारी इंजेक्शन स्वत:ला टोचून एमबीबीएस महिला डॉक्टरची आत्महत्या
मुंबईतील वरळी परिसरामध्ये राहत असलेल्या एका 29 वर्षीय महिला डॉक्टरने तणावाखाली येऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आलेली आहे. विषारी इंजेक्शन टोकून घेऊन डॉक्टरने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. निताशा बेंगाली असे आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरचे नाव आहे.