ETV Bharat / city

बाणगंगेच्या जलस्त्रोताला बाधा आणणारे खोदकाम 'जैसे थे' ठेवा - महापौर किशोरी पेडणेकर - महापौर किशोरी पेडणेकर लेटेस्ट न्यूज

हिंदू जनजागृती समितीच्या वतीने दिलेल्या निवेदनानुसार महापौर किशोरी पेडणेकर यांनी बाणगंगा तलावाची पाहणी केली. त्यानंतर पेडणेकर यांनी महापालिका अधिकाऱ्यांशी संवाद साधला. याप्रसंगी "डी" विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रशांत गायकवाड, हिंदू जनजागृती समितीचे सोनार, गोड सारस्वत ब्राह्मण मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष प्रवीण कानविंदे, सचिव शशांक गुळगुळी, प्रकल्प अधिकारी ऋत्विक औरंगाबादकर उपस्थित होते.

Mayor Kishori Pednekar visits Banganga tank
महापौर किशोरी पेडणेकर
author img

By

Published : Jan 2, 2021, 6:11 AM IST

मुंबई - बाणगंगा तलावालगत खासगी विकासकाकडून करण्यात येणाऱ्या खोदकामामुळे बाणगंगेचा जलस्त्रोत दूषित होत असल्याने संबंधित विकासकाने भूगर्भशास्त्रज्ञाचा अहवाल महापालिकेला सादर करेपर्यंत सदर काम "जैसे थे" ठेवण्याचे निर्देश महापौर किशोरी पेडणेकर यांनी महापालिका अधिकाऱ्यांना दिले आहेत.

Mayor Kishori Pednekar visits Banganga tank
महापौर किशोरी पेडणेकर

हेही वाचा - उमेश यादवच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन, ट्विट करून दिली माहिती

हिंदू जनजागृती समितीच्या वतीने दिलेल्या निवेदनानुसार महापौर किशोरी पेडणेकर यांनी बाणगंगा तलावाची पाहणी केली. त्यानंतर पेडणेकर यांनी महापालिका अधिकाऱ्यांशी संवाद साधला. याप्रसंगी "डी" विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रशांत गायकवाड, हिंदू जनजागृती समितीचे सोनार, गोड सारस्वत ब्राह्मण मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष प्रवीण कानविंदे, सचिव शशांक गुळगुळी, प्रकल्प अधिकारी ऋत्विक औरंगाबादकर उपस्थित होते.

ऐतिहासिक ठेवा -

महापौर किशोरी पेडणेकर संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश देताना म्हणाल्या की, बाणगंगेचा ऐतिहासिक ठेवा पुसू नये तसेच नैसर्गिक स्त्रोत जीवंत रहावा, यासाठी संबंधित कंत्राटदाराला तातडीने "डी" विभाग कार्यालयाने नोटीस देऊन काम "जैसे थे' ठेवण्याचे निर्देश महापौरांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. संबंधित विकासकाला भूगर्भशास्त्रज्ञाचा अहवाल सादर करण्यास सांगितले असून हा अहवाल आल्यानंतर नैसर्गिक स्त्रोत जीवंत ठेवून याबाबत निर्णय घेणार असल्याचे महापौरांनी यावेळी सांगितले. संंबधित विकासक रात्रीच्या वेळेस काम करत असेल तर महापालिका कायद्यानुसार कारवाई करण्याचे निर्देश महापौरांनी यावेळी दिले.

जलस्त्रोत लुप्त होण्याची भीती -

हिंदू जनजागृती समितीने महापौरांना दिलेल्या निवेदनात नमूद केल्यानुसार, सप्टेंबर २०२० पासून बाणगंगा कुंडाजवळ इमारत बांधकामासाठी खोदकाम चालू करण्यात आले आहे.या खोदकामाला प्रारंभ झाल्यावर बाणगंगेमध्ये येणाऱ्या नैसर्गिक जलस्त्रोतातून चिखल आणि
चिखलमिश्रित पाणी कुंडामध्ये यायला लागले असल्याचे निवेदनात नमूद केले आहे. यामुळे भूमिगत जलस्त्रोताला बाधा निर्माण झाल्याचे स्पष्ट होत असून भविष्यात हे बांधकाम तसेच कुंडाच्या आजूबाजूला अन्या खोदकाम झाल्यास हा ऐतिहासिक जलस्त्रोत लुप्त होण्याची भीती संभवत असल्याचे त्यांनी निवेदनात नमूद केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.