ETV Bharat / city

Kishori Pednekar on Childrens vaccination : महानगरपालिका लहान मुलांच्या लसीकरणासाठी सज्ज - किशोरी पेडणेकर - Kishori Pednekar on Childrens vaccination

बृहन्मुंबई महानगरपालिका २ ते १८ वर्षांपर्यंतच्या मुलांच्या कोरोना लसीकरणासाठी पूर्ण सज्ज ( BMC preparation for children vaccination ) आहे. केंद्र सरकारच्या मंजुरीनंतर लहान मुलांच्या लसीकरणासाठी २५० केंद्रांवर व्यवस्था करण्यात येणार असल्याचे मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर ( Mayor Kishori Pednekar on children vaccination ) यांनी सांगितले. मंजुरी मिळाल्यानंतर तीन दिवस ते आठवडाभरात लसीकरण सुरू करण्यात येणार आहे असल्याची माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली.

महापौर किशोरी पेडणेकर
महापौर किशोरी पेडणेकर
author img

By

Published : Dec 26, 2021, 12:49 AM IST

मुंबई- बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून ३५ लाख मुलांचे लसीकरण केले जाणार आहे. मात्र, तूर्तास केंद्राकडून मजुरी मिळालेली नाही. मंजुरी मिळाल्यास लवकरात लहान मुलांचे लसीकरण करण्यात येणार असल्याची माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर ( BMC preparation for children vaccination ) यांनी दिली.

बृहन्मुंबई महानगरपालिका २ ते १८ वर्षांपर्यंतच्या मुलांच्या कोरोना लसीकरणासाठी पूर्ण सज्ज ( BMC preparation for children vaccination ) आहे. केंद्र सरकारच्या मंजुरीनंतर लहान मुलांच्या लसीकरणासाठी २५० केंद्रांवर व्यवस्था करण्यात येणार असल्याचे मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर ( Mayor Kishori Pednekar on children vaccination ) यांनी सांगितले.

हेही वाचा- Covaxin for Children : कोव्हॅक्सिन १२ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांना देता येणार, डीसीजीआयची मंजुरी

लसीकरणासाठी मंजुरीची प्रतीक्षा-

महापौर किशोर पेडणेकर यांनी माध्यमांशी आज बोलताना सांगितले की, मुंबईसह राज्यात कोरोना आणि ओमायक्रॉनचे रुग्ण वाढू लागले आहेत. त्यातच आता मुंबईत लहान मुलांच्या शाळा सुरू झालेल्या आहेत. यामुळे लहान मुलांना लसीकरण करणे आवश्यक आहेत. मुलांच्या लसीकरणासाठी कोव्हॅक्सिन लसीच्या आपत्कालीन वापराला परवानगी दिल्यामुळे पुण्याच्या सिरम इन्स्टिट्यूटनेही २०० कोटी डोसचे उत्पादन करण्याचे जाहीर केले आहे. याशिवाय जागतिक आरोग्य संघटनेची मंजुरी मिळाल्यामुळे आता 'आयसीएमआर' व केंद्राच्या मंजुरीनंतर तातडीने मुलांचे लसीकरण सुरू करण्याची तयारी पालिका प्रशासनाकडून करण्यात आली आहे. त्यानुसार डोसची उपलब्धता आणि मुलांकडून मिळणारा प्रतिसाद यानुसार केंद्रांची आणि लसीकरणाची संख्या वाढविली जाणार आहे. मंजुरी मिळाल्यानंतर तीन दिवस ते आठवडाभरात लसीकरण सुरू करण्यात येणार आहे असल्याची माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली.

हेही वाचा-PM Narendra Modi : 15 ते 18 वयोगटातील मुलांना मिळणार लस, पंतप्रधान नरेंद्र मोदींची घोषणा

महापौरांचे मुंबईकरांना आवाहन -

राज्यात कोरोना तसेच ओमायक्रॉन विषाणूचा प्रसार वाढला आहे. यामुळे राज्य सरकारने राज्यात रात्री जमावबंदी लागू केली आहे. मुंबईत नाताळ आणि 31 डिसेंबरला नववर्षाचे स्वागत मोठ्या प्रमाणात केले जाते. त्यासाठी पार्ट्या केल्या जातात. कोरोना तसेच ओमायक्रॉन विषाणूच्या प्रसाराच्या पार्श्वभूमीवर पार्ट्या, कार्यक्रमावर तसेच कार्यक्रमासाठी एकत्र बंदी घालण्यात आली आहे.

हेही वाचा-Varsha Gaikwad On Schools Closing : सरसकट शाळा बंद करणार नाहीच, बंद ठेवण्याचा अधिकार स्थानिक प्रशासनाला : वर्षा गायकवाड

मुंबईत रात्री ९ ते सकाळी ६ पर्यंत जमावबंदी लागू आहे. सर्व प्रकारच्या समारंभांमध्ये उपस्थितांच्या संख्येवर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. ते निर्बंध शुक्रवारी मध्यरात्रीपासून लागू झाले आहेत. कोरोना संसर्ग वाढू द्यायचा नसेल तर सर्वांनी आरोग्याचे नियम पाळावेत, असे आवाहन महापौर किशोर पेडणेकर यांनी मुंबईकरांना केले आहे.

पंतप्रधानांकडून लसीकरणाची घोषणा-
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येत्या 3 जानेवारीपासून 15 ते 18 वयोगटातील मुला-मुलींसाठी लसीकरणास सुरूवात करण्याची घोषणा 25 डिसेंबरला केली. फ्रंटलाईन वर्कर्सना ( Booster Dose for Frontline Workers ) व आरोग्य क्रमचारी ( Booster Dose for Health Workers ) बूस्टर डोस 10 जानेवारीपासून सुरू करणार असल्याचेही पंतप्रधान मोदी ( PM Narendra Modi ) म्हणाले.

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.