ETV Bharat / city

Kishori Pednekar About Ashish Shelar : "त्या" पार्टीत कोण मंत्री होता, ते दाखवा नाहीतर जनतेची माफी मागा -किशोरी पेडणेकर

author img

By

Published : Dec 20, 2021, 12:21 PM IST

Updated : Dec 20, 2021, 2:23 PM IST

महापौर किशोरी पेडणेकर यांनी शेलारांवर जोरदार हल्ला चढवला. पार्टीत कोण मंत्री होता ते दाखवा नाहीतर जनतेची माफी मागा, नुसता आरोप करू नका, पुरावे देऊन सिद्ध करा, असे महापौर किशोरी पेडणेकर यांनी ( Kishori Pednekar on Ashish Shelar ) शेलारांना उद्देशून म्हटलं.

kishori pednekar
किशोरी पेडणेकर

मुंबई - भाजपा नेते आशिष शेलार यांनी दिग्दर्शक करण जोहरच्या पार्टीत आघाडीतील मंत्री होते, असा दावा केला होता. त्यावरून महापौर किशोरी पेडणेकर यांनी शेलारांवर जोरदार हल्ला चढवला. पार्टीत कोण मंत्री होता ते दाखवा नाहीतर जनतेची माफी मागा, नुसता आरोप करू नका, पुरावे देऊन सिद्ध करा, असे महापौर किशोरी पेडणेकर यांनी शेलारांना ( Kishori Pednekar on Ashish Shelar ) उद्देशून म्हटलं.

किशोरी पेडणेकर यांची आशिष शेलार यांच्यावर टीका

भाजपा नगरसेवक वैतागले -

आशिष शेलार हे दररोज पत्रकार परिषद घेत घोटाळा झाला असे सांगत आहेत. त्यांनी नुसते घोटाळे असा आरोप करू नये. त्यांनी ते पुराव्यासह घोटाळे समोर आणावेत. नुसते घोटाळे म्हणून शिवसेनेला बदनाम करू नये. तुम्ही फक्त शिवसेनेला बदनाम करत आहात, हे आता मुंबईकराना आणि तुमच्या नगरसेवकांना कळून चुकले आहे. तुमचा जीव पालिकेत का अडकला आहे, असा प्रश्न उपस्थित करत घोटाळे सिद्ध करा, असे आवाहनही महापौरांनी शेलार यांना दिले आहे. शेलार यांच्या वागण्याला भाजपचे नगरसेवक वैतागले आहेत. ते आम्हाला भेटतात, ते आमच्या संपर्कात आहेत. ते किती टॉप सिक्रेट असल्याचे महापौरांनी म्हटले आहे. माझ्यावर शिंतोडे उडवले, मीही बघेलच. तुमच्या आरोपांनी, पत्राने घाबरून जाणार नाही, असेही महापौरांनी म्हटले आहे.

अमित शाह गप्प का -

स्थानिक भाजप नेत्यांवर विश्वास नाही. त्यामुळे शाह यांना लुभावण्यासाठी स्थानिक नेते येतात. पुण्यातही असेच झाले. पहाटे दूध येण्याच्या वेळेला शपथ का झाली, याचा खुलासा भाजपाने करावा. जी संधी सरकार स्थापनेची भाजपाने घेतली त्याबाबत जनतेला सांगावे. उपमुख्यमंत्री अजितदादा पवारसोबत आले, त्यावेळी वाहवा करणारी भाजपा आता त्यांच्यावर आरोप करत आहे. अमित शहा सत्तेबाबत बोलत आहेत. मग पहाटे दूध टाकण्याच्यावेळी सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न केला, त्यावर का बोलत नाहीत. कर्नाटकमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाली, त्याबाबद्दल कोणी बोलत नाही, असा प्रश्न महापौरांनी उपस्थित केला आहे.

हेही वाचा - Year in Review 2021 : मुंबईतील गुन्हेगारी जगतातील महत्वाच्या घडामोडींचा आढावा...

Last Updated : Dec 20, 2021, 2:23 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.