मुंबई - कोरोनाकाळात नागरिकांना सुविधा देण्यामध्ये दिलेल्या कंत्राटात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भाजपाकडून केला जात आहे. यात काही तथ्य असेल तर त्यांनी समोर घेऊन याव, असे आवाहन करत भाजपाकडून मुंबई अस्थिर करण्याचे काम केले जात असल्याचे महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटले आहे. तसेच पालिकेच्या कामाचा खुद्द राज्यपालांनी गौरव केल्याचे सांगत भाजपाला टोला लगावला आहे.
- 'मुंबई अस्थिर करण्याचे काम'
भाजपा नेते किरीट सोमैया यांनी पत्रकार परिषद घेऊन मुंबई महापालिकेत कोरोना काळात केलेला खर्च आणि दिलेली कंत्राट यात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला आहे. या आरोपाला महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रतित्त्युर दिले आहे. यावेळी बोलताना, भाजपा डबल ढोलकी वाजवत आहे. कोर्टाचा देखील निर्णय आहे, यात काही तथ्य असेल तर त्यांनी घेऊन यावे. टेंडरची काम सगळ्यांना समान भेटली आहेत, असा खुलासा महापौरांनी केला. नुसते आरोप आणि आंदोलने करून मुंबई अस्थिर करण्याचे काम भाजपा करत आहे. जेव्हा हे शेपूट घालून आतमध्ये बसले होते, तेव्हा आम्ही रस्त्यावर उतरून काम केले आहे, असा टोला महापौरांनी लागवला आहे.
- राज्यपालांनी दिला पुरस्कार
राज्यपाल यांना बाकीचे लोक भाजपाचे मानतात. मात्र त्यांना आम्ही राज्याचे राज्यपाल मानतो. काल याच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडून कोरोना काळात महापालिकेने चांगले काम केल म्हणून पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. त्यामुळे हा पुरस्कार कोणी दिला तर स्वत: राज्यपालांनी दिला आहे, असे सांगत भाजपाचे नाव न घेता टोला लगावला आहे.
हेही वाचा - Sanjay Raut Allegation on Kirit Somaiya : राकेश वाधवानचा किरीट सोमौयांशी आर्थिक संबंध; राऊतांचा आरोप