मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी आठवड्यातून दोनदा राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी बोलतात. याचा अर्थ देशाच्या पंतप्रधानांना कळले तिसरी लाट आलेली आहे. पंतप्रधानांना कळते, पण भाजपच्या राज्यातल्या नेत्यांना कळत नाही, असा टोला लगावत भाजप नेत्यांना राजकीय बाळकडूची गोळी कमी पडली आहे. त्यात सोमैया भरसटलेले आहेत. ते कुठली गोळी घेतात, असा सवाल मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केला आहे.
हेही वाचा - Gym, Parlor will partially open : जिम, ब्युटी पार्लरची नियमावली शिथिल
काय आहेत सोमैया यांचे आरोप -
भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमैया यांनी काल मुंबईतील दहिसर, बीकेसी आणि नेस्को कोविड सेंटरला भेट दिली. त्यावेळी त्यांनी येत्या दहा दिवसांत ठाकरे सरकारचा कोविड सेंटर घोटाळा बाहेर काढणार असल्याचा दावा केला. मुंबईत कोरोना रुग्णांचा आकडा वाढला असला तरी, कोविड सेंटर्स रिकामे आहेत. याचा अर्थ 98 टक्के रुग्ण आपल्या घरी किंवा नर्सिंग होममध्ये बरे होतात. तसेच, ज्यांचे लसीकरण झाले आहे त्यातील 99.99 टक्के लोक सुरक्षित असल्याचा दावाही सोमैयांनी केला आहे. तसेच, महापौर किशोरी पेडणेकर यांच्या मुलाच्या कंपनीला वरळी कोविड सेंटरचे काम कसे मिळाले? असा प्रश्नही सोमैया यांनी उपस्थित केला.
महापौरांचा भाजपा नेत्यांना टोला -
सोमैया यांनी केलेल्या या आरोपांवर बोलताना महापौर बोलत होत्या. यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आठवड्यातून दोनदा राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी बोलतात. याचा अर्थ देशाच्या पंतप्रधानांना कळले तिसरी लाट आलेली आहे. पंतप्रधानांना कळत आहे, पण भाजपच्या राज्यातल्या नेत्यांना कळत नाही, असा टोला महापौरांनी भाजपा नेत्यांना लगावला आहे. कोरोना रुग्ण चार आणि पाच पटींनी वाढत आहे. लहान मुले बाधित होत आहेत. दुसरीकडे भाजप नेते बार आणि शाळांची तुलना करत आहेत. हे त्यांच्या मुर्खपणाचे लक्षण आहे. भाजप नेत्यांना राजकीय बाळकडूची गोळी कमी पडली आहे, असे महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या.
सोमैया विचाराने भरसटलेले -
वरळी येथील कोविड सेंटरमधील कंत्राट महापौरांच्या मुलाला कसे मिळाले? असा प्रश्न सोमैया यांनी उपस्थित केला. यावर बोलताना, परत जुन्या कढीला उत आला आहे. किरीट सोमैया विचाराने भरसटले आहेत. हळूच कुठलीतरी गोळी खातात. ती फस्ट्रेशनची आहे का? असा प्रश्न महापौरांनी उपस्थित केला आहे. माझ्या मुलाला मिळालेल्या कंत्राटाची माहिती नाही. माझ्या कामात मी व्यस्त असते. सेल्फ टेस्टिंग किटवर महापालिकेची कारवाई सुरू झाली. पोलिसही त्या पद्धतीने कारवाई करत आहेत, अशा किटमुळे रुग्णसंख्येचा धोका वाढू शकतो, अशी भीती महापौर पेडणेकर यांनी व्यक्त केली.
हेही वाचा - Corona wave in Mumbai : मुंबईत तीन दिवसात रोज २० हजारावर रुग्ण, 104 पोलीस रुग्णालयात