ETV Bharat / city

Kishori Pednekar Attack on BJP : ...तेव्हा विरोधकांच्या डोक्याला गंज चढला होता का? - पेडणेकरांचा भाजपाला टोला - Kishori Pednekar Attack on BJP

महापौर किशोरी पेडणेकर
महापौर किशोरी पेडणेकर
author img

By

Published : Jan 15, 2022, 12:06 PM IST

Updated : Jan 15, 2022, 1:33 PM IST

12:00 January 15

महापौर किशोरी पेडणेकर यांचा भाजपाला टोला

मुंबई - मुंबईमध्ये होम टेस्ट किटची विक्री जोरात सुरू आहे. मात्र यापुढे आधारकार्ड क्रमांक दिल्याशिवाय ही किट मिळणार आहे. जर कोणी याचा धंदा केल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल असा इशारा मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर ( Mumbai mayor on home test kit ) यांनी दिला आहे. तसेच २५ वर्षे भ्रष्टाचार झाला असा आरोप करणारे विरोधक गेले २० वर्षे आमच्या मांडीवर बसले होते. तेव्हा त्यांच्या डोक्याला गंज आला होता का असा टोला महापौरांनी भाजपाला ( Mayor Kishori Pednekar Attack on BJP ) लगावला आहे.

तर कारवाई होणार -

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी महापौर बंगल्यावर पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की, होम किट टेस्ट किट मोठ्या प्रमाणात विकल्या जात आहेत. त्यासाठी पालिकेने नियमावली केली आहे. किट बनवणाऱ्या कंपन्या, डिस्ट्रिब्युटर आणि केमिस्ट यांना आता किट कोणाला विकली याची नोंद ठेवावी लागणार आहे. आधार कार्ड नंबर दिल्याशिवाय किट मिळणार नाही. मात्र जर कोणी याचा धंदा करण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल असा इशारा महापौरांनी दिला. मुंबईत आतापर्यंत 1,06,987 लोकांनी चाचण्या केल्या आहेत. त्यापैकी 3549 पॉजिटीव्ह आले आहेत. नागरिकांनी आरटीपीसीआर करण्यापेक्षा होम किट टेस्टचा वापर करावा मात्र त्याचा रिपोर्ट अपलोड करावा असे आवाहन महापौरांनी केले. कोरोनाच्या प्रसाराला घाबरू नका मात्र काळजी घ्या असे आवाहनही महापौरांनी केले.

तेव्हा डोक्याला गंज चढला होता का?

गेल्या २५ वर्षात पालिका आणि शिवसेनेने दीड लाख कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला आहे. यावर बोलताना विरोधकांकडून नेहमीच आरोप केले जात आहेत. प्रत्येकाने एक विरोधाचा अजेंडा घेतला आहे. नुसते बोलू नये तर ते भ्रष्टाचार सिद्ध करून दाखवावेत असे आवाहन महापौरांनी भाजपाला केले आहे. पालिका आयुक्तांनी कोरोनामध्ये चांगले काम केले इतरही चांगले काम केले म्हणून आयुक्त यांच्या हिट लिस्टवर आहेत. आयुक्त आणि आम्ही चांगले काम करत आहोत हीच विरोधकांची पोटदुखी आहे. नागरिक सुरक्षित राहावे म्हणून आम्ही काम करत आहोत.

२० वर्षाचा हिशोब द्या मग आम्ही ५ वर्षाचा देतो -

भाजपा गेल्या २५ वर्षात दीड लाख कोटीचा भ्रष्टाचार झाल्याचे म्हणत आहे. त्यातील २० वर्षे ते आमच्या मांडीवर बसले होते. तेव्हा यांच्या डोक्याला गंज चढला होता का असा प्रश्न उपस्थित करत आधी तुम्ही २० वर्षाचा हिशोब द्या मग आम्ही ५ वर्षाचा देतो असा टोला महापौरांनी लगावला आहे.

त्या शस्त्राचा वापर होणारच नाही -

भाजपाने स्थायी समिती अध्यक्षांच्या विरोधात अविश्वास ठराव मांडला आहे. मात्र तो यशस्वी होणार नाही. भाजपावाले स्वतःला बुद्धिमान समजतात मात्र त्यांना हा अविश्वास ठराव मंजूर होण्यासाठी सर्व सभागृहाची मंजुरी आवश्यक आहे हे त्यांना माहीत नाही का असा प्रश्न उपस्थित करत चर्चेत राहण्यासाठी हा ठराव आणल्याची टीका महापौरांनी केली. नुसते आरोप करण्यापेक्षा विरोधकांनी कोणी चूक करत असल्यास ते दाखवावे आम्ही नक्की कारवाई करू असे महापौर म्हणाल्या.

गरोदर महिला सुरक्षित -

कोरोना दरम्यान गरोदर असलेल्या महिला कोरोना पॉझिटिव्ह येत आहेत. याबाबत बोलताना, गरोदर महिला पॉझिटिव्ह येत आहेत. नायरमध्ये 300 गरोदर महिला ऍडमिट आहेत त्यापैकी 170 गरोदर महिला पॉझिटिव्ह आहेत. आई बाळ सुरक्षित असल्याची माहिती महापौरांनी दिली.

'त्या' समाजाची माफी -

मी घिसाडघाईत असा शब्दप्रयोग केला. त्यावर राष्ट्रीय घिसाड गाडी समाजाच्या वतीने मला पत्र देण्यात आले आहे. घिसाडी गाडी लोहार समाज आहे. घिसाड घाई बोलले नाही पाहिजे. घाई घाईत बोललं पाहिजे. परत असे शब्द वापरणार नाही कोणत्याही समाजाची मन दुखवणे मनात नव्हते असे म्हणत महापौरांनी या समाजाची माफी मागितली आहे.

घाटकोपर घटनेची चौकशी -

घाटकोपर येथे लस घेतल्यावर एका १५ वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला असे सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आहे. याबाबत बोलताना, आरोग्य विभागाला चौकशी करण्यास सांगितले आहे. राजावाडी रुग्णालयात ८ जानेवारीला त्या मुलीला लस देण्यात आली.११ जानेवारीला तीचा मृत्यू झाला. अचानक हार्ट अटॅक आला असे समजले. या प्रकरणी कोणी मृत्यूचे सर्टिफिकेट दिले. पोस्ट मार्टम का नाही झाला याची चौकशी करण्यास सांगितले आहे. पालिका लसीकरणानंतर माहिती घेते. तीच्या पालकांनीही लसीकरणामुळे मृत्यू झाला असे म्हटलेले नाही. घरी जाऊन त्या कटुबाची भेट घेणार असल्याचे महापौरांनी सांगितले.

हेही वाचा - CM Thackeray to Citizens : नागरिकांनी बेसावध राहू नका, जिल्हा प्रशासनांनी लसीकरण वाढवा - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Last Updated : Jan 15, 2022, 1:33 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.