- गडकरींच्या विरोधात आचारसंहिता भंग केल्याची तक्रार ; काँग्रेसची कारवाईची मागणी
नागपूर - नामनिर्देशन पत्र दाखल केल्यानंतर भाजपचे उमेदवार नितीन गडकरी यांनी आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप काँग्रेस नेत्यांनी केला आहे. त्यासंदर्भात काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी अश्विन मुदगल यांची भेट घेऊन रीतसर तक्रार दाखल करून कारवाई करण्याची मागणी केली आहे. वाचा सविस्तर
- मला लोकसभा निवडणूक लढवायची नव्हती, पण... - उर्मिला मातोंडकर
मुंबई - प्रसिध्द मराठमोळी बॉलिवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आहे. उत्तर मुंबईतून तिला पक्षातर्फे निवडणूक लढवण्याची संधी दिली जाऊ शकते. राजकारणात येण्याचा तिचा का निर्णय झाला याबद्दल आमच्या प्रतिनिधीने तिच्याशी केलेली बातचीत. वाचा सविस्तर
लातूर - राज्यात महायुती होऊन शिवसेना- भाजपने एकत्रितपणे निवडणुका लढविण्याचा निर्धार केला. लातुरात मात्र, दुफळी निर्माण झाल्याचे चित्र आहे. भाजपाने उमेदवारी अर्ज दाखल करण्यापासून ते प्रचार सभांमध्ये युवासेनेला डावल्याचा आरोप युवासेना पदाधिकाऱ्यांनी केला आहे. भविष्यात अशीच वागणूक मिळाल्यास जिल्ह्यात भाजपच्या सभा होऊ देणार नसल्याचा इशारा युवा सैनिकांनी बैठकीत दिला आहे.वाचा सविस्तर..
ठाणे- मावळ लोकसभा मतदारसंघाचे आघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांना पनवेलमधील सभेला जाताना वाहतूक कोंडीचा फटका बसला. त्यामुळे सभेला जाण्यासाठी उशीर होऊ नये, म्हणून आजूबाजूला असलेला पोलिसांचा फौजफाटा आणि आलिशान गाडी सोडली. त्यानंतर पार्थ पवार यांनी चक्क रस्त्यावरुन धावत-पळत सभा गाठली.वाचा सविस्तर..
नाशिक - युतीच्या दिंडोरी लोकसभा मतदार संघाच्या अधिकृत उमेदवार भारती पवार यांच्या प्रचारार्थ मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात हरिश्चंद्र चव्हाण अनुपस्थित राहिले. त्यामुळे चव्हाण हे बंडखोरी करणार का, ? असा प्रश्न उपस्थित होत असून त्यांची पुढील भूमिका काय असेल हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.वाचा सविस्तर..
नांदेड - नांदेड लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार अशोक चव्हाण यांच्या उमेदवारी अर्जावरील आक्षेप जिल्हाधिकारी आणि निवडणूक निर्णय अधिकारी अरुण डोंगरे यांनी उशिरा फेटाळला. अपक्ष उमेदवार रवींद्र थोरात आणि शेख अफजलोद्दीन अजिमोद्दीन उर्फ शेख सर (बहुजन महापार्टी) यांनी घेतलेल्या आक्षेपांवर बुधवारी प्रदीर्घ युक्तीवाद झाला. त्यानंतर रात्री उशिरा डोंगरे यांनी हा निर्णय दिला.वाचा सविस्तर..
सोलापूर- राष्ट्रवादी काँग्रेसने माढा लोकसभेसाठी संजय शिंदे यांना उमेदवारी दिल्यानंतर माढा तालुक्यातील संजय शिंदेंच्या विरोधकांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी माढ्यात भाजपला पाठिंबा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषदेचे माजी सभापती शिवाजी कांबळे यांच्यासह माढ्यातील शिंदे विरोधकांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन भाजपच्या उमेदवाराचा प्रचार करण्याचा निर्णय जाहीर केला.वाचा सविस्तर..
रत्नागिरी - भाजपचे प्रदेश चिटणीस विनय नातू आणि काँग्रेस उमेदवार नविनचंद्र बांदिवडेकर यांनी भेट घेतली. या भेटीमुळे रत्नागिरीत चर्चांना उधाण आले आहे. भाजपची शिवसेनेसोबत असणारी नाराजी देखील यामुळे समोर आली आहे.वाचा सविस्तर..
हिंगोली - लोकसभा मतदार संघात ३४ उमेदवारांचे अर्ज वैध ठरवण्यात आले. तर ८ उमेदवारांचे अर्ज रद्द करण्यात आले. बुधवारी जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी रुचेश जयवंशी यांच्या निगराणीत निवडणूक निरीक्षक डॉ. जे. रविशंकर यांच्या उपस्थितीत नामनिर्देशन पत्रांची छाणनी करण्यात आली.वाचा सविस्तर..
हिंगोली - पहिले शिवसेना, नंतर भाजप आणि आता काँग्रेसकडून सुभाष वानखेडे हे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात दंड ठोकून उभे आहेत. मागील निवडणुकीत त्यांनी नामनिर्देशन पत्रात 5 लाख रुपयांची कार दाखविली होती. तर या लोकसभेत दाखल केलेल्या शपथपत्रात त्यांनी कार दाखवलेली नाही. त्यामुळे वानखेडे यांची कार कुणीकडे गेली, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.वाचा सविस्तर..
धुळे - सुशीलकुमार शिंदेंना आता कोणी विचारत नाही. त्यामुळे माध्यमांमध्ये चर्चेत राहण्यासाठी ते भाजपकडून ऑफर देण्यात आली असल्याचे सांगत आहेत, अशी टीका जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांनी केली आहे.वाचा सविस्तर..
सोलापूर - भाजपने माढामधून लढा असे सांगितले तर आपण माढातून लढायला तयार असल्याचे विजयसिंह मोहिते पाटील यांनी स्पष्ट केले आहे. रणजितसिंह मोहिते पाटील हे भाजपमध्ये गेले असले तरी विजयसिंह मोहिते पाटील हे अजूनही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच आहेत. मात्र, भाजपकडून माढामध्ये निवडणूक लढण्यास तयार असल्याचे खुद्द विजयसिंह मोहिते पाटील यांनी बुधवारी माढा दौऱ्यावर आले असता, त्यांनी सूचक विधान केले.वाचा सविस्तर..
अहमदनगर- राज्याचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे स्टार प्रचारक राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजपने उमेदवारी नाकारलेले विद्यमान खासदार दिलीप गांधी यांची भेट घेतली. या भेटीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. गांधी यांचे पुत्र सुवेंद्र यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. याचा फटका अर्थातच सुजय विखे यांना बसणार आहे. या परस्थितीत राधाकृष्ण विखे यांनी गांधी, सुवेंद्र यांच्या सोबत जवळपास ३ तास बंद खोलीत चर्चा केली.वाचा सविस्तर..
नाशिक- भारतातील एकमेव अशा पंचवटी एक्सप्रेसच्या आदर्श बोगीचा १२ वा वर्धापनदिन साजरा करण्यात आला.यावेळी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र पक्ष संयुक्त पुरोगामी महाआघाडीचे उमेदवार समीर भुजबळ यांच्या हस्ते रेल्वेत केक कापून वर्धापनदिन साजरा करण्यात आला. समीर भुजबळ यांनी रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष स्वर्गीय बिपीनभाई गांधी यांच्या फोटोला गुलाबपुष्प वाहुन आदरांजली वाहीली. यावेळी समीर भुजबळ यांच्या सोबत त्यांच्या पत्नी डॉ. शेफाली भुजबळ देखील उपस्थित होत्या.वाचा सविस्तर..
वाशिम- लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, याकरिता वाशिम जिल्ह्यातील मतदार संघाच्या सिमेवर रिकल सर्व्हेक्षण पथकाची निर्मिती करण्यात आहे. या पथकामार्फत रस्त्याने ये-जा करणाऱ्या गाड्यांची तपासणी करण्यात येत आहे. यावेळी तपासणीदरम्यान एका कारमधून २ लाख ४५ हजार रुपयाची रक्कम जप्त करण्यात आल्याची माहिती कारंजा उपविभागीय अधिकारी अनुप खांडे यांनी दिली आहे.वाचा सविस्तर..
बीड - बीड लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार प्रीतम मुंडे यांनी उमेदवारी अर्जासोबत दिलेली माहिती खोटी आहे, असा आक्षेप काँग्रेसचे कार्यकर्ते दादासाहेब मुंडे यांनी घेतला होता. यावरून बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांना मारहाण झाली. याप्रकरणी बीड येथील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात स्वप्नील गलधर, संतोष राख आणि बंटी फड यांच्यासह अज्ञात २० जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.वाचा सविस्तर..