ETV Bharat / city

वहिनींना आमदार व्हायचंय! मनीषा कायंदेंचा अमृता फडणवीसांना खोचक टोला - शिवसेना विरुद्ध अमृता फडणवीस

शिवसेना आमदार व प्रवक्त्या मनीषा कायंदे यांनी अमृता फडणवीस यांच्यावर खोचक शब्दात टीका केली आहे. शिवसेना आमदार कायंदे म्हणाल्या, की तुमच्याकडे सर्व तपास यंत्रणा आहेत. तुम्ही माजी गृहमंत्र्यांना शोधू शकता. तसेच सामनाचे अग्रलेख वाचण्यासाठी विचारांची शक्ती लागते ती अमृता फडणवीस यांच्याकडे नाही.

अमृता फडणवीस
अमृता फडणवीस
author img

By

Published : Oct 21, 2021, 5:51 PM IST

मुंबई - माजी गृहमंत्री अनिल देशमुख हनीमूनला गेल्याची टीका अमृता फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर केली. शिवसेनेने याला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. अमृता वहिनी भडकल्या आहेत. त्या अस्वस्थ असून वहिनींना आमदार व्हायचय, असा खोचक टोला शिवसेना आमदार व प्रवक्त्या मनीषा कायंदे यांनी लगावला.

शिवसेना आमदार व प्रवक्त्या मनीषा कायंदे यांनी अमृता फडणवीस यांच्यावर खोचक शब्दात टीका केली आहे. शिवसेना आमदार कायंदे म्हणाल्या, की तुमच्याकडे सर्व तपास यंत्रणा आहेत. तुम्ही माजी गृहमंत्र्यांना शोधू शकता. तसेच सामनाचे अग्रलेख वाचण्यासाठी विचारांची शक्ती लागते ती अमृता फडणवीस यांच्याकडे नाही. सामनातून केंद्र सरकार आणि भाजपवर होणाऱ्या टीकेमुळे त्या अस्वस्थ झाल्या आहेत. वहिनींना भाजपकडून आमदार व्हायचे आहे. त्यांना प्रवक्ता व्हायेच आहे. त्यासाठी त्या भारतीय जनता पक्षावर दबाव आणत आहे, असा टोला कायंदे यांनी लगावला.

मनीषा कायंदेंचा अमृता फडणवीसांना खोचक टोला

हेही वाचा-धक्कादायक : जळगावात अतिक्रमण कारवाई सुरू असताना पोलिसांना जबर मारहाण

काय म्हणाल्या होत्या अमृता फडणवीस?
पोलीस कमिशनर असो किंवा माजी गृहमंत्री असो, त्यांचे कुठे हनिमून चाललेत आपल्याला माहीत नाही. पण हे व्हायला नको ही खरी गोष्ट आहे. तुम्हाला पण कुठे दिसले तर रिपोर्ट करा. लवकर पकडता येईल त्या लोकांना, अशा शब्दात माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या गायब होण्यावरुन अमृता फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर बुधवारी जोरदार टीका केली होती.

काँग्रेस व राष्ट्रवादी हे लुटारूंचे सरकार-
शिवसेनेचे मुखपृष्ठ असलेल्या सामनामधून वारंवार मोदी सरकार व भाजप नेत्यांवर टीका होताना दिसत आहे. या टीकेचा समाचार घेताना अमृता फडणवीस म्हणाल्या होत्या, की सामनाकडे फक्त तेच काम आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी हे लुटारूंचे सरकार आहे. लुटारुंवर टीका करणे सामनाला शक्य नाही. त्यामुळे भाजपवर टीका करणे हेच त्यांचे एकमेव काम असल्याचे सांगत अमृता फडणीस यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला होतामाजी पोलीस आयुक्त आणि माजी गृहमंत्री यांचे कुठे हनीमुन चालले आहेत? - अमृता फडणवीस

संबंधित बातमी वाचा- माजी पोलीस आयुक्त आणि माजी गृहमंत्री यांचे कुठे हनीमुन चालले आहेत? - अमृता फडणवीस

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.