ETV Bharat / city

दुबईतून आलेल्या व्यक्तीची पॉन्डिचेरीतून सुटका, 15 लाखांसाठी अपहरण

दुबईहून मुंबईत आलेल्या शंकर मथमल्ला या व्यक्तीची पोलिसांनी पॉन्डिचेरी येथून त्यांची सुटका केली. मथमल्ला यांचे अपहरण करण्यात आले होते. सुटकेसाठी 15 लाख रुपयाची खंडणी मागण्यात आली होती. पोलिसांकडून तपास सुरू केला असता शंकर मथमल्ला याची पॉन्डिचेरीमधून सुटका करण्यात आली.

kidnap
kidnap
author img

By

Published : Jul 5, 2022, 10:35 AM IST

मुंबई - दुबईहून मुंबईत आलेल्या शंकर मथमल्ला या 47 वर्षीय व्यक्तीचे अपहरण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 22 जून रोजी अपहरण करण्यात आल्यानंतर सुटकेसाठी 15 लाख रुपयाची खंडणी मागण्यात आली होती. पोलिसांकडून तपास सुरू केला असता शंकर मथमल्ला याची पॉन्डिचेरीमधून सुटका करण्यात आली. अपहरणकरते दोन्हीही आरोपींचा शोध पोलिसांकडून सुरू आहे. शंकर मथमल्ला हे मूळचे तेलंगणा राज्यातील राहणारे आहे.

हेही वाचा - Mumbai Rain : मुंबईसह कोकणात जोरदार पाऊस, राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा

दुबईहून आलेल्या 47 वर्षीय व्यक्तीचे मुंबईतील शीव परिसरातून अपहरण झाले होते. शंकर मथमल्ला असे या व्यक्तीचे नाव असून ते तेलंगणा येथील रहिवासी आहेत. त्यांचा मुलगा हरीश मथमल्ला यांच्या तक्रारीवरून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. मथमल्ला 22 जूनला दुबईहून मुंबईत आले होते. त्यानंतर शीव परिसरातून त्यांनी गावी जाण्यासाठी बसचे तिकीट घेतले. पण, ते घरीच पोहचले नाही. त्यानंतर त्यांचा मुलगा व मेहूणा त्यांचा शोध घेण्यासाठी मुंबईत आले. त्यावेळी त्यांच्या वडिलांनी बसचे तिकीट रद्द केल्याचे त्यांना समजले. त्यानंतर हरीशने शीव पोलिसांकडे तक्रार केली.

पोलिसांनी शंकर बेपत्ता असल्याची नोंद केली. त्यानंतर शंकर यांनी स्वतः मुलाला दूरध्वनी करून आपण चेन्नईमध्ये रुग्णालयात भरती असल्याचे सांगितले. त्यानंतर दूरध्वनी बंद झाला. मुलाने वारंवार दूरध्वनी केला, पण दूरध्वनी लागला नाही. त्यानंतर त्यांना दुसऱ्या क्रमांकावरून दूरध्वनी आला. त्यात तुमचा व्यक्ती अल्सरवर उपचार घेत असल्याचे सांगून फोन बंद करण्यात आला. त्यानंतर 28 जूनला तक्रारदाराच्या मुलाला विविध 10 क्रमांकावरून दूरध्वनी आले. एका व्यक्तीने 15 लाख रुपयांची मागणी केली. रक्कम दिल्यावर वडिलांना सोडण्यात येईल असे सांगितले होते.

मुलाने घडलेला प्रकार शीव पोलिसांना सांगितला. त्यानुसार पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन गुन्हे शाखाही याप्रकरणाचा समांतर तपास करीत होते. त्यासाठी एक पथक महाराष्ट्राबाहेर तपासासाठी गेले. त्यांनी पॉन्डिचेरी येथून शंकर यांची सुटका केली. दोन आरोपींनी शंकरचे अपहरण करून त्यांना मारहाण केली होती. त्यानंतर त्यांचे छायाचित्र मुलाला पाठवले व खंडणीची मागणी केली. शंकर यांना सध्या उपचारासाठी शीव रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दोन आरोपींचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

हेही वाचा - धक्कादायक..! कुपोषणामुळे आदिवासी भागांमध्ये दोन महिन्यांत 39 बालकांचा मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.