मुंबई - ३१ ऑगस्टपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आले असले तरीही, काही ठिकाणी अनलॉक करण्यात आले आहे.`मिशन बिगिन अगेन` अंतर्गत मॉल्स आणि शॉपिंग मार्केट्सधील दुकानं खुली करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र मॉल्समधील थिएटर आणि फूड कोर्ट बंद राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच दुकानांना वेळेचे बंधन असणार आहे.
कोरोनाच्या निमित्ताने लॉकडाऊनच्या काळात अनेक गोष्टींवर निर्बंध लादण्यात आले होते. मात्र त्यानंतर मुंबईचे अर्थचक्र सुरू राहण्यासाठी काही ठिकाणी शिथिलता देण्यात आली. त्याच्याच पुढील टप्प्यात ५ ऑगस्टपासून मुंबईत मॉल्स सुरू होत आहे. मॉल्स सुरू करताना शासनाने दिलेल्या गाइडलाईनचे तंतोतंत पालन होते आहे, की नाही. याचा आढावा घेतलाय 'ईटीव्ही भारत'ने..
ग्राहकांना सुरक्षित खरेदीचा सुरक्षित अनुभव मिळावा यासाठी सरकारने दिलेल्या सर्व एसओपीचे पालन करून मॉल 5 ऑगस्ट रोजी पुन्हा सकाळी 11 ते सायंकाळी 7 पर्यंत ग्राहकांसाठी खुले राहतील. त्यासाठी सरकारने मॉल्स चालकांना पुढील गाइडलाईन दिल्या आहेत.
ग्राहकांसाठी सुरक्षा उपाय
- हँडबॅग्ज निर्जंतुकीकरणासाठी प्रवेशावरील युवी स्कॅनर
- खरेदीनंतर शॉपिंग बॅग निर्जंतुक करण्यासाठी यूव्ही बॉक्स
- प्रवेशद्वारावर थर्मल स्कॅनर
- आरोग्य सेतु अॅप तपासणे
- ग्राहकांची पादत्राणे निर्जंतुकीकरणासाठी प्रवेशद्वारावर शुद्धीकरण मॅट
- मॉलच्या आत मास्क घालणे अनिवार्य
- दीड मीटरचे सामाजिक अंतर सुनिश्चित करण्यासाठी मॉलवर फ्लोर मार्कर
- सॅनिटायझर - शॉपिंग बॅग, ट्रॉली आणि बास्केट सर्व स्टोअरमध्ये खरेदीदारांना उपलब्ध करणे
- पार्किंग आणि किरकोळ काउंटरसाठी डिजिटल पेमेंटसाठी प्रोत्साहित करावे