मुंबई : महाराष्ट्रातील नाशिक (Nashik) मधील मालेगाव (Malegaon Bomb Blast Case) येथे 29 सप्टेंबर 2008 रोजी भिकू चौकाजवळ एका दुचाकी मध्ये बॉम्ब ठेवून स्फोट घडवण्यात आला होता. या बॉम्बस्फोटात 7 जणांचा मृत्यू झाला होता, तर 92 जखमी झाले होते. या स्फोट घडुन तेरा वर्ष झाले असले तरी, अद्यापही न्यायालयाने या प्रकरणातील आरोपी दोषींवर कुठलेही कारवाई केलेली नाही. आतापर्यंत न्यायालयाचे कामकाज अद्यापही पूर्ण झालेले नाही आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणे कडून या प्रकरणात 495 साक्षीदारांचा जबाब नोंदवण्यात आला आहे.
तेरा वर्ष पुर्ण : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाला तेरा वर्ष होत असताना देखील, अद्यापही हे प्रकरण न्याय प्रविष्ट आहे. या प्रकरण जलद गतीने निकाली लावण्यात यावे, याकरिता मुंबई सत्र न्यायालयातील विशेष ए एन आय कोर्टात एक स्पेशल न्यायाधीशांची नियुक्ती केली आहे. असं असताना देखील अद्यापही या खटल्या संदर्भातील साक्षीदारांचा जवाब न्यायालयासमोर पूर्णपणे नोंदवण्यात आलेला नाही.
मुंबई उच्च न्यायालयाला निर्देश : सर्वोच्च न्यायालयाने मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण लवकरात लवकर निकाली काढण्याकरिता मुंबई उच्च न्यायालयाला (Mumbai High Court) निर्देश देखील देण्यात आले होते .सर्वोच्च न्यायालयाला यापूर्वी मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचे तपास जलद गतीने करण्या करिता दोन वेळा मुदतवाढ देण्यात आलेली आहे. 2020 आणि त्यानंतर 2021 या वर्षांमध्ये मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा निकाल लावण्यात यावा, असे निर्देश देण्यात आले होते. मात्र तरी देखील अद्यापही मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा निकाल लागू शकलेला नाही. अद्यापही या प्रकरणातील साक्षीदारांची जबाब न्यायालयासमोर नोंदवणे बाकी आहे.
218 साक्षीदार तपासायचे बाकी : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात 495 साक्षीदारांचा जबाब राष्ट्रीय तपास यंत्रणा असलेल्या एटीएस (ATS) कडून नोंदवण्यात आला होता. त्यापैकी आतापर्यंत केवळ 256 साक्षीदार तपासण्यात आले आहेत. शिवाय 218 साक्षीदार तपासायचे बाकी आहेत. 21 साक्षीदार मरण पावले, 16 साक्षीदार बेपत्ता, 2 साक्षीदार वैद्यकीय अयोग्य, 3 साक्षीदार वगळले, 6 साक्षीदारांना डबल समंन्स जारी, 44 सह-पंच साक्षीदार तपासले जाण्याची शक्यता आहे, 84 समंन्स जारी केले, परंतु अद्याप त्याची न्यायालयाकडून तपासणी व्हायची आहे.
22 साक्षीदार हे फितूर झाले : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा खटला सुरू असताना नेहमीच सुनावणी दरम्यान एटीएस कडून सादर करण्यात आलेल्या साक्षीदाराने न्यायालयासमोर आपला जवाब बदलला आहे. या प्रकरणातील आतापर्यंत 22 साक्षीदार हे फितूर झाले आहे. या फितूर साक्षीदारांनी न्यायालयासमोर जवाब नोंदवताना तत्कालीन एटीएसचे प्रमुख परमवीर सिंग यांच्यावर अनेक गंभीर आरोप देखील करण्यात केले आहे. तसेच या प्रकरणात आर एस एस आणि भाजपचा प्रमुख हिंदुत्ववादी चेहरा असणाऱ्या नेत्यांचे नाव घेण्याचे सांगण्यात आले होते. असे देखील फितूर साक्षीदारांनी न्यायालयासमोर सांगितल्यामुळे या प्रकरणाला एक वेगळेच वळण न्यायालयासमोर आले होते.
फितूर झालेल्या साक्षीदार हे प्रमुख्याने या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेले खासदार प्रज्ञा सिंग ठाकूर, माजी कर्नल प्रसाद पुरोहित, रमेश उपाध्याय यांच्या संदर्भातील साक्षीदारांनी या प्रकरणातील अनेक आरोपींना ओळखण्यात आले नाही आहे.
समीर कुलकर्णी यांचे दिल्लीतील रामलीला मैदानात उपोषण : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाला तेरा वर्ष होत असताना देखील अद्यापही प्रकरण निकाली काढण्यात आले नसल्याने, या प्रकरणातील आरोपी समीर कुलकर्णी यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली आहे. याचिकेवर न्यायालयाने राष्ट्रीय तपास यंत्रणेला संपूर्ण दोन महिन्याचा खटल्यातील प्रगतीचा अहवाल तपशीलासह सादर करण्याचे निर्देश देखील देण्यात आले आहे. तसेच या प्रकरणाला लवकर निकाली काढण्यात यावे, याकरिता समीर कुलकर्णी यांनी दिल्लीतील रामलीला मैदानात उपोषण देखील केले होते.
एनआयए विशेष कोर्टात सुनावणी सुरु : मालेगाव येथे 29 सप्टेंबर 2008 रोजी एका मशिदीत बॉम्बस्फोट झाला होते. यात 6 जणांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह रमेश उपाध्याय, समीर कुलकर्णी, सुधाकर चतुर्वेदी, सुधाकर द्विवेदी, अजय राहिरकर आणि संदीप डांगे यांना अटक झाली होती. एनआयए विशेष कोर्टात सुनावणी सुरु आहे.
IPC आणि UAPA कायद्यातील कलमांनुसार खटला सुरुच : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा तपासात 30 सप्टेंबर 2008 रोजी मुंबई दहशतवाद विरोधी पथकानं, नाशिक ग्रामीण पोलीसांसमवेत तपास सुरु केला. तत्कालीन गृहमंत्र्यांची ATS कडे तपास देण्याची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर या प्रकरणाचा तपास तीन वर्षानंतर 13 एप्रिल 2011 गृह मंत्रालयाच्या निर्देशानुसार राष्ट्रीय तपास संस्थेनं NIA मालेगाव स्फोट प्रकरणासह 2007 मध्ये झालेला समझोता एक्स्प्रेस स्फोट, मक्का मशिद स्फोट आणि अजमेर दर्गा स्फोटाचा तपास सुरू केला होता. 27 डिसेंबर 2017 NIAच्या विशेष न्यायालयानं साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, कर्नल पुरोहित, रमेश उपाध्याय आणि अजय रहिकार यांच्यावरील मोका हटवला. आता सर्वांवर IPC आणि UAPA कायद्यातील कलमांनुसार खटला चालवण्यात येत आहे.
काय आहे प्रकरण : 29 सप्टेंबर 2008 रोजी मालेगावमध्ये बॉम्बस्फोट झाला होता. शुक्रवारच्या नमाजानंतर मशिदीत मोटारसायकलवर बॉम्बस्फोट झाला होता. यामध्ये 6 जणांचा मृत्यू झाला होता, तर 100 हून अधिक लोक जखमी झाले होते. याप्रकरणी एटीएसने प्राथमिक चौकशी केली होती. तीन वर्षांनंतर 2011 मध्ये हे प्रकरण एनआयएकडे वर्ग करण्यात आले. एनआयएच्या विशेष न्यायालयात आता मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. भोपाळमधील भाजप खासदार प्रज्ञा ठाकूर या प्रकरणात आरोपी आहेत. या प्रकरणातील अन्य आरोपींमध्ये लेफ्टनंट कर्नल पुरोहित, मेजर (निवृत्त) रमेश उपाध्याय, सुधाकर द्विवेदी, अजय रहीरकर आणि समीर कुलकर्णी यांचा समावेश आहे.
हेही वाचा : ATM Theft : गॅस कटरने एटीएम फोडणाऱ्या तीन चोरटयांना मुरबाड पोलिसांनी ठोकल्या बेड्या