मुंबई - मालेगाव बाॅम्बस्फोट 2008 प्रकरणातील ( Malegaon Bomb Blast Case) १६ व्या साक्षीदाराने आपली साक्ष फिरवली आहे. साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर विरोधातील साक्षीदाराने साक्ष बदलली आहे. या आधी १५ साक्षीदारांनी आपली साक्ष बदलली होती.
साक्षीदाराने एटीएसवर गंभीर आरोप केले आहेत. जाणीवपूर्वक आरोपींची आणि RSS मधील अनेक मोठ्या पदाधिका-यांची नावे घ्यायला सांगितले असल्याचा आरोप साक्षीदारांनी (Malegaon Bomb Blast Case Hearing) केला आहे.
एटीएसने घेतलेला जबाब आमचा नाही, असं सांगत १६ व्या साक्षीदाराने साक्ष बदलली. मुंबई सत्र न्यायालयातील विशेष NIA न्यायालयात या प्रकरणाची ( Malegaon Bomb Blast Case) सुनावणी सुरू आहे.
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील एनआयएने हजर केलेल्या साक्षीदाराने आपली साक्ष बदलली आहे. आजच्या सुनावणीत साक्षीदाराने दहशतवाद विरोधी पथकावर (ATS) गंभीर आरोप केले आहेत. 2008 मालेगाव ब्लास्ट केसमध्ये मुंबईतील विशेष एनआयए न्यायालयात दैनंदिन सुनावणी सुरू आहे. आज झालेल्या सुनावणीत (Malegaon Bomb Blast Case Hearing) ह्या प्रकरणातील साक्षीदार क्रमांक 16 यांनी अतिशय धक्कादायक खुलासे न्यायालयासमोर केले.