ETV Bharat / city

Malegaon Blast Case : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाला आज 14 वर्षे पूर्ण ; खटला निष्कर्षाप्रत नाही, निम्म्या आरोपींची सुटका - Malegaon blast

नाशिक जिल्ह्यातील मालेगावला 29 सप्टेंबर 2008 रोजी रात्री 9.30 च्या जवळपास बॉम्बस्फोट झाला होता. याप्रकरणाला आज 14 वर्ष पूर्ण झाली (Malegaon blast case completes 14 years today) आहे. या स्फोटामध्ये सहा लोकांचा मृत्यू झाला होता तर या स्फोटामध्ये 101 जखमी झाले होते. या प्रकरणाचा तपास मालेगाव पोलीस करत होती. त्यानंतर महाराष्ट्र एटीएसकडे हा तपास वर्ग करण्यात आला होता. त्यानंतर हा पुन्हा तपास राष्ट्रीय तपास एजन्सी एनआयएकडे वर्ग करण्यात आला होता. सध्या या प्रकरणाचा खटला मुंबईतील सत्र न्यायालयातील विशेष एनआयए कोर्टामध्ये सुरू (Malegaon blast case)आहे.

Malegaon Blast Case
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण
author img

By

Published : Sep 29, 2022, 1:05 PM IST

मुंबई : नाशिक जिल्ह्यातील मालेगावला 29 सप्टेंबर 2008 रोजी रात्री 9.30 च्या जवळपास बॉम्बस्फोट झाला होता. या प्रकरणाला आज 14 वर्ष पूर्ण झाली (Malegaon blast case completes 14 years today) आहे. या स्फोटामध्ये सहा लोकांचा मृत्यू झाला होता, तर या स्फोटामध्ये 101 जखमी झाले होते. या प्रकरणाचा तपास मालेगाव पोलीस करत होती. त्यानंतर महाराष्ट्र एटीएसकडे हा तपास वर्ग करण्यात आला होता. त्यानंतर हा पुन्हा तपास राष्ट्रीय तपास एजन्सी एनआयएकडे वर्ग करण्यात आला होता. सध्या या प्रकरणाचा खटला मुंबईतील सत्र न्यायालयातील विशेष एनआयए कोर्टामध्ये सुरू (Malegaon blast case)आहे.

14 वर्षे पूर्ण झाली, खटला अद्यापही निकाली - सर्वोच्च न्यायालयाने खटला लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते, मात्र तरी देखील अद्यापही या खटल्याचा निकाल लागला नसून ट्रायल सुरू आहे. या प्रकरणी 495 साक्षीदारांना आरोपींविरोधात तपासण्यात येणार असल्याचे सुरुवातीला एनआयएने म्हटले होते. जुलै महिन्यात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात 256 साक्षीदार तपासले असून आणखी 218 साक्षीदार तपासायचे असल्याचे तपास यंत्रणेने नमूद केले होते. परंतु गेल्या जुलै महिन्यापासून आतापर्यंत केवळ 15 साक्षीदार तपासण्यात आल्यावर न्यायालयाने बोट ठेवले. त्यावर जुलै महिन्यातील प्रतिज्ञापत्रात आणखी 218 साक्षीदार तपासण्याचे नमूद करण्यात आले असले, तरी एवढे साक्षीदार तपासले जाणार नसल्याचा दावा एनआयएतर्फे करण्यात आला. त्यानंतर आतापर्यंत खटल्यात 271 साक्षीदार तपासण्यात आले असून त्यापैकी 26 साक्षीदारांनी साक्ष फिरवली आहे. हा एक गंभीर खटला आहे आणि 14 वर्षे पूर्ण झाली, तरी खटला कोणत्याही निष्कर्षाप्रत आलेला नाही. याउलट निम्म्या आरोपींची सुटका झाल्याचे कुलकर्णी याने न्यायालयाला सांगितले. मुंबईवरील 26/11 च्या दहशतवादी हल्ल्याशी संबंधित खटला, समझौता बॉम्बस्फोट खटला, अजमेर बॉम्बस्फोट खटला कधीच निकाली निघाले. परंतु हा खटला अद्यापही निकाली निघालेला नसल्याचे कुलकर्णी याने सांगितले.

एकूण 12 आरोपींवर गुन्हा, 2 आरोपी फरार - मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात एकूण 12 आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यापैकी दहा आरोपींना तपास एजन्सीकडून अटक करण्यात आली होती, तर दोन आरोपी अद्यापही फरार आहे. फरार आरोपींना तपास एजन्सी अद्यापही शोधू शकले नाही. या प्रकरणातील दहा आरोपींपैकी पाच आरोपींना खटल्याची ट्रायल सुरू होण्यापूर्वी आणि आरोप निश्चित करण्यापूर्वी दोष मुक्त करण्यात आले होते. तर उर्वरित अटकेत असलेले पाच आणि फरार असलेले दोन या आरोपींविरोधात विशेष NIA कोर्टामध्ये खटला सुरू आहे. या प्रकरणातील पाच आरोपी सध्या जामिनावर बाहेर आहे.

साक्षीदार फितूर - मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात एनआयएकडून 495 साक्षीदारांचा जबाब नोंदवण्यात आला होता. त्यापैकी आतापर्यंत 271 साक्षीदारांचा जबाब नोंदवण्यात आला आहे, तर या प्रकरणातील 26 साक्षीदार फितूर झाले आहे. या प्रकरणात भारतीय सेवा दलामध्ये काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचा देखील समावेश आहे. फितूर साक्षीदारांमध्ये सर्वाधिक साक्षीदार हे आरोपी प्रसाद पुरोहित यांच्या संबंधित होते. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण एकूण 446 साक्षीदार नोंदविण्यात आले होते. मात्र यामधील शंभरहून अधिक साक्षीदारांचा जबाब कोर्टासमोर नोंदवण्यात येणार (Malegaon blast case completes 14 years) नाही.

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपींनी आतापर्यंत 7190 अर्ज विविध कारणासाठी दाखल केले होते. या अर्जावर न्यायालयात उत्तर आणि त्यावर युक्तिवाद करायला बराच वेळ गेला. त्यामुळे देखील अनेक दिवस खटले लांबला असल्याची माहिती मुंबई उच्च न्यायालयात झालेल्या नुकत्याच सुनावणी दरम्यान एनआयएचे वकिलांकडून देण्यात आली होती.

साक्षीदार मरण पावले पण निकाल नाही - मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात 495 साक्षीदारांचा जबाब राष्ट्रीय तपास यंत्रणा असलेल्या एटीएसकडून नोंदवण्यात आला होता. त्यापैकी आतापर्यंत केवळ 271 साक्षीदार तपासण्यात आले आहेत. शिवाय 203 साक्षीदार तपासायचे बाकी आहेत. 21 साक्षीदार मरण पावले, 16 साक्षीदार बेपत्ता, 2 साक्षीदार वैद्यकीय अयोग्य, 3 साक्षीदार वगळले, 6 साक्षीदार डबल सॅमन्स जारी, 44 सह-पंच साक्षीदार तपासले जाण्याची शक्यता आहे, 84 समन्स जारी केले, परंतु अद्याप त्यांची न्यायालयाकडून तपासणी व्हायची (Malegaon blast) आहे.

काय घडलं होतं 29 सप्टेंबर 2008 रोजी ? मालेगाव येथे 29 सप्टेंबर 2008 रोजी एका मशिदीत बॉम्बस्फोट झाले होते. यात 7 जणांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह रमेश उपाध्याय, समीर कुलकर्णी, सुधाकर चतुर्वेदी, सुधाकर द्विवेदी, अजय राहिरकर आणि संदीप डांगे यांना अटक झाली होती. एनआयए विशेष कोर्टात सुनावणी सुरु आहे.

काय आहे प्रकरण ? 29 सप्टेंबर 2008 रोजी मालेगावमध्ये बॉम्बस्फोट झाला होता. शुक्रवारच्या नमाजानंतर मशिदीत मोटार सायकलवर बॉम्बस्फोट झाला होता. यामध्ये 6 जणांचा मृत्यू झाला होता, तर 100 हून अधिक लोक जखमी झाले होते. याप्रकरणी एटीएसने प्राथमिक चौकशी केली होती. तीन वर्षांनंतर 2011 मध्ये हे प्रकरण एनआयएकडे वर्ग करण्यात आले. एनआयएच्या विशेष न्यायालयात आता मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. भोपाळमधील भाजप खासदार प्रज्ञा ठाकूर या प्रकरणात आरोपी आहेत. या प्रकरणातील अन्य आरोपींमध्ये लेफ्टनंट कर्नल पुरोहित, मेजर (निवृत्त) रमेश उपाध्याय, सुधाकर द्विवेदी, अजय रहीरकर आणि समीर कुलकर्णी यांचा समावेश (blast case) आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.