ETV Bharat / city

माहुलवासीयांना जीवनदान, प्रकल्पग्रस्तांनी मानले राज्य सरकारचे आभार

न्यायालयाच्या आदेशानुसार महाविकास आघाडी सरकारने १६०० माहुलवासीयांना प्रदूषण नसलेल्या कुर्ला येथील एचडीआयएल येथे तात्पुरते पुनर्वसन करण्याचा निर्णय घेतला आहे. माहुलवासीयांना महाविकास आघाडी सरकारने जीवनदान दिल्याने या निर्णयाचे माहुलवासीयांनी स्वागत केले असून आघाडी सरकारचे आभार मानले आहेत.

माहुलवासीयांना जीवनदान
माहुलवासीयांना जीवनदान
author img

By

Published : Jan 24, 2022, 6:37 AM IST

मुंबई - मुंबईमधील तानसा पाईपलाईन ( Tansa Pipeline in Mumbai ) तसेच इतर प्रकल्पात बाधित झालेल्या प्रकल्पग्रस्तांचे प्रदूषण असलेल्या माहुल येथे पुनर्वसन केले जात होते. माहुलमधील प्रदूषणाचा त्रास होऊन शेकडो प्रकल्पग्रस्तांना श्वसनाचा त्रास होऊन मृत्यू झाला. याविरोधात माहुल प्रकल्पग्रस्तांनी मेधा पाटकर यांच्या घर बचाओ घर बनाओ आंदोलनाच्या सहकार्याने २०१७ पासून आंदोलन उभारले. न्यायालयीन लढाही उभारला. न्यायालयाच्या आदेशानुसार महाविकास आघाडी सरकारने १६०० माहुलवासीयांना प्रदूषण नसलेल्या कुर्ला येथील एचडीआयएल येथे तात्पुरते पुनर्वसन करण्याचा निर्णय घेतला आहे. माहुलवासीयांना महाविकास आघाडी सरकारने जीवनदान दिल्याने या निर्णयाचे माहुलवासीयांनी स्वागत केले असून आघाडी सरकारचे आभार मानले आहेत.

माहुल प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन -

मुंबईला प[पाणीपुरवठा करणाऱ्या तानसा पाइपलाईनवरील घरे सुरक्षेच्या कारणावरून तोडण्यात आली. तानसा पाईपलाईनवरील प्रकल्पग्रस्तांचे माहुल येथे पुनर्वसन करण्यात आले. माहुलमध्ये अनेक कंपन्यांचे रिफायनरी प्रकल्प असल्याने प्रदूषण असते. या प्रदूषणामुळे प्रकल्पग्रस्तांना श्वसनाचा त्रास होऊ लागला. २०० हुन अधिक प्रकल्पग्रस्तांचा मृत्यू झाला आहे. यामुळे माहुल प्रकल्पग्रस्तांनी घर बचाओ घर बनाओ आंदोलनाच्या सोबत न्यायालयीन आणि जमिनी लढाईच्या माध्यमातून २०१७ पासून चालू आहे, माहुल परिसरात औद्योगिक क्षेत्रामुळे होणाऱ्या प्रदूषणापासून आजार आणि मृत्यू भोगत शेकडो कुटुंबांनी अहिंसक मार्गाने संघर्ष केला, जो एक प्रकारचा सत्याग्रह होता. हा विषय जसा प्रदूषण आणि पर्यावरण सुरक्षेचा होता तसाच जगण्याविषयी अधिकाराचा ही होता. मुंबई उच्च न्यायालयाने प्रदूषणाने पीडित असलेले आणि तानसा पाईप लाईनच्या विस्थापित परिवारांना कायमस्वरूपी पर्यायी घर किंवा दर महिना १५ हजार रुपये घर भाडे देण्याचे आदेश दिले. यावर माहुल वासियांनी घरभाडे नाकारत घरच पाहिजे अशी भूमिका घेतली होती अशी माहिती आंदोलनातील कार्यकर्त्या रेखा गाडगे यांनी दिली.

१६०० प्रकल्पग्रस्तांना कुर्ला येथे घरे -

माहुल प्रकल्पग्रस्त समितीच्या नेतृत्वात योग्य असे निकष लावून याद्या बनवल्या गेल्या. महाराष्ट्र सरकारमधील मंत्री आदित्य ठाकरे आणि उदय सामंत यांनी संवेदनेसह म्हाडाची २८८ आणि एसआरएची ५६८ अशी सुमारे ८०० हुन अधिक घरे दिली. त्यानंतरही आदित्य ठाकरे आणि उदय सामंत यांच्या उपस्थितीत तथा संबंधित उच्च अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मेधा पाटकर आणि आम्ही समिती सदस्यांचा संवाद सुरूच राहिला. एसआरए प्राधिकरणाकडे सुविधांसाठी प्रत्येक स्तरावर प्रयत्न चालू राहिले. या सुविधा देण्यामध्ये महानगरपालिका आणि एमएमआरडीएच्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांचा मोठा सहभाग राहिला आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ज्यांनी माहुलमधून बाहेर जाण्यास अर्ज केला होता अशा उर्वरित १६०० कुटुंबांना घरे देण्याचे बाकी होते. आमच्या आंदोलनासह उदय सामंत आणि आदित्य ठाकरे यांच्यासह चर्चा आणि विचार विनिमयासह एचडीआयएल HDIL ने बांधलेल्या कुर्ला येथील घरांना संवेदनेसह वाटप करण्यासाठीची निर्णय प्रक्रिया चालू झाली. एमएमआरडीए MMRDA च्या माध्यमातून नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी पूर्ण सहानुभूती दाखवली. सोळाशे कुटुंबांसाठी दुसरी कायमस्वरूपी घरे देईपर्यंत प्रीमियर कंपाउंड, कुर्ला येथे उपलब्ध घरांपैकी १६०० घरे माहूल प्रकल्पग्रस्त समितीने बनवलेल्या यादीमधील सहभागी कुटुंबांना देण्याचा अंतिम निर्णय आदित्य ठाकरे, एकनाथ शिंदे, उदय सामंत आणि जितेंद्र आव्हाड, महानगरपालिका, एमएमआरडीए MMRDA आणि एसआरए SRA चे उच्च अधिकारी यांच्यासह झालेल्या 21 डिसेंबर 2021 बैठकीनंतर समन्वय साधत आदित्य ठाकरे यांनी आपली जबाबदारी पार पाडली असे गाडगे यांनी सांगितले.

निर्णयाचे आम्ही मनोपूर्वक स्वागत -

बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधत आदित्य ठाकरे यांनी या निर्णयाची घोषणा केली आहे. माहुल प्रकल्पग्रस्त समिती आणि घर बचाओ घर बनाओ आंदोलन जन आंदोलनांचा राष्ट्रीय समन्वयाशी संलग्न आहे या निर्णयाचे आम्ही मनोपूर्वक स्वागत करीत आहोत. आपली प्रदूषण मुक्त घरे मिळवण्यासाठी १६०० कुटुंबे उत्सुक आहेत. आजही प्रदूषण चालू आहे आणि रसायनांचा पाऊस देखील पडतो तेव्हा संघर्ष गरजेचा होता. ज्यात संवेदना आणि संवादशीलता दाखवत विकास आघाडी सरकारने समस्या सोडवली आहे. आता या कुटुंबांमध्ये लवकरात लवकर घरांची सुधारणा करीत माहुलवासी कुटुंबांना चाव्या देऊन पुनर्वसित केले जाईल असा विश्वास आहे. या प्रक्रियेत सहयोगाची अपेक्षा आणि विश्वास आहे. आम्ही महाविकास आघाडी सरकारचे मंत्रीमंडळ, आदित्य ठाकरे, उदय सामंत आणि जितेंद्र आव्हाड यांच्या प्रति आभार व्यक्त करतो. सर्व गरिबांच्या विविध प्रश्नांवर २००५ पासून कार्यरत असलेले घर बचाव घर बनाव आंदोलन याच प्रकारे सक्रिय आणि संवादशील राहील असे रेखा गाडगे यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.