ETV Bharat / city

Primary Education Department : माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण संचालक महेश पालकर यांच्याकडे प्राथमिकचाही पदभार - महेश पालकर प्राथमिक शिक्षण विभागाचे संचालक

राज्याच्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण संचलनालयाचे संचालक महेश पालकर ( Mahesh Palkar ) यांच्याकडे आता प्राथमिक शिक्षण विभागाची देखील जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे. नुकतेच प्राथमिक शिक्षण संचलनालयाचे संचालक दिनकर पाटील ( Director of Primary Education Department ) एक सप्टेंबर रोजी सेवानिवृत्त झाले. त्यांच्या जागी आता महेश पालकर यांची वर्णी लावण्यात आलेली आहे. राज्याच्या शिक्षण क्षेत्रातील प्रशासकिय राजकीय सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

Mahesh Palkar
महेश पालकर
author img

By

Published : Sep 11, 2022, 5:07 PM IST

मुंबई राज्याच्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण संचलनालयाचे संचालक महेश पालकर ( Mahesh Palkar )यांच्याकडे आता प्राथमिक शिक्षण विभागाची देखील जबाबदारी सोपवण्यात आलेली ( Director of Primary Education Department )आहे. नुकतेच प्राथमिक शिक्षण संचलनालयाचे संचालक दिनकर पाटील एक सप्टेंबर रोजी सेवानिवृत्त झाले. त्यांच्या जागी आता महेश पालकर यांची वर्णी लावण्यात आलेली आहे.

जाणकारांच्या वर्तुळात याबाबत भुवया उंचावल्या राज्याच्या प्राथमिक शिक्षण संचालनालयाचे संचालक पद दिनकर पाटील यांच्याकडे होते. ते 1 सप्टेंबर 2022 रोजी सेवानिवृत्त झाल्यावर शासनाने महेश पालकर यांच्याकडे त्या विभागाचे संचालक पद दिले आहे. मात्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाचेही संचालक पद महेश पालकर यांच्याकडे अद्यापही (Mahesh Palkar Director Primary Education) आहे. याबाबत स्वतः महेश पालकर यांच्याशी ईटीव्ही भारत द्वारा संवाद साधला असता त्यानी माहिती दिली. त्यांच्याकडे संचालक पद दिल्यामुळे राज्याच्या आणि मंत्रालयाच्या देखील प्रशासन आणि जाणकारांच्या वर्तुळात याबाबत भुवया उंचावल्याचे पाहायला मिळाले.

मराठी शिकून इंग्रजी शाळांमध्ये शिक्षकाची नोकरी करता येणार नाही या नियमावर बोट ठेवणारे अधिकारी. साधारणत: तीन वर्षांपूर्वी राज्याच्या पवित्र पोर्टलवरून शिक्षकांच्या भरती प्रक्रियेची जाहिरात निघाली. त्यानंतर मुंबई महानगरपालिकेने शिक्षकांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली होती. आणि त्यावेळी तत्कालीन मुख्य शिक्षणाधिकारी महेश पालकरच होते. त्यावेळी 252 शिक्षकांना ते केवळ मराठी माध्यमात शालेय शिक्षण घेतलेले असल्यामुळे त्यांना आता इंग्रजी माध्यमांमध्ये शिक्षक म्हणून भरती करून घेता येत नाही; या मुद्द्यावर भरती प्रक्रियेत नाकारले होते. आणि हा नियम मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीने केलेला आहे. त्यामुळे महापालिका किंवा राज्य शासन या नियमात बदल करत नाही; तोपर्यंत मराठी माध्यमात शाळा शिकलेल्यांना इंग्रजी माध्यमात मुंबई महानगरपालिकेच्या एमपीएस शाळेमध्ये शिक्षक म्हणून नोकरीवर येत नाही. यावर महेश पालकर त्यावेळी अत्यंत ठाम होते.

नियमावर बोट ठेवण्याच्या पद्धतीमुळे महेश पालकर यांच्यावर अनेक स्तरातून टीका झाली होती. शेकडो शिक्षकांची नाराजी देखील तत्कालीन शिक्षण अधिकारी पालकर यांच्यावर होती. आता प्राथमिक शिक्षण विभागाचे संचालक पद देखील महेश पालकर यांच्याकडे आल्यामुळे त्याच 252 शिक्षकांचा प्रश्न देखील मुख्यमंत्र्यांनी मनावर घेऊन महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंग यांना त्याबद्दल निर्देश देखील दिलेले आहेत. आता मुंबई महानगरपालिकेच्या भरती प्रक्रियेत नाकारले गेलेल्या शिक्षकांचा प्रश्न किती लवकर सुटतो की लटकतो ? हे येत्या काळात समजेल.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.