मुंबई- राज्यसभा निवडणुकीत ( Rajya Sabha elections ) महाविकास आघाडीचा चौथा उमेदवार पराभूत झाल्यानंतर विधानपरिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे सहा उमेदवार ( Mahavikas Aghadi special strategy Legislative Council elections ) निवडून यावे यासाठी महाविकास आघाडीने खास रणनीती ( Special strategy of Mahavikas Aghadi ) आखली आहे. राज्यसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने जास्तीचा कोटा ठेवल्यामुळे त्याचा फायदा त्यांना झाला. त्यामुळे या निवडणुकीत महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षाने आपल्या मताच्या कोटा बाबत काळजी घेतली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबत मआवीच्या नेत्यांची बैठक काल घेतली.
प्रत्येक पक्षाचा कोटा ठरला - ठाकरे यांच्या सुचनेनुसार प्रत्येक पक्षाचा कोटा ठरवण्यात आला. विधान परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने गुप्तता पाळत आपल्या उमेदवारांचा कोटा अंतिम क्षणी ठरवला. काँग्रेसने आपल्या दोन उमेदवारांसाठी 29 चा कोटा केला. तर, राष्ट्रवादीने 30, सेनेने सर्वाधिक 31चा कोटा ठेवला आहे. महाविकास आघाडी मधील प्रमुख नेत्यांनी या उमेदवार निवडीसाठी कोटा ठरवला. विधान परिषदेत सहा ही उमेदवारांना निवडून आणण्यासाठी ही रणनीती महाविकास आघाडीने अंतिम क्षणी केली असल्याची माहिती आहे.
महाविकास आघाडी विजयी होईल - महाविकास आघाडीकडून मतदान पूर्ण झाल्यानंतर महाविकास आघाडीचे सहा ही उमेदवार निवडून येतील, असा विश्वास काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे. राज्यसभा निवडणुकीत मिळालेल्या यशमुळे भाजपकडे आत्मविश्वास आला आहे. मात्र, या निवडणुकीत महाविकास आघाडी विजयी होईल असा दावा त्यांनी केला आहे.