ETV Bharat / city

Mumbai Bank Election : दरेकरांच्या गडाला सुरुंग, मुंबै बँकेवर महाविकास आघाडीचा झेंडा - Mumbai Bank Election latest news

मुंबै बँकेच्या अध्यक्षपदासाठी आज निवडणुक पार ( Mumbai Bank President Election ) पडली. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सिद्धार्थ कांबळे यांची अध्यक्षपदी तर भाजपाच्या विठ्ठल भोसले यांची उपाध्यक्ष पदी वर्णी ( Mumbai Bank President Siddharth Kamble ) लागली आहे. प्रसाद लाड यांचा दोन मतांनी पराभव ( Prasad Lad Defeated Mumbai Bank Election ) झाला आहे.

Mumbai Bank Election
Mumbai Bank Election
author img

By

Published : Jan 13, 2022, 7:11 PM IST

मुंबई - मुंबै बँकेंच्या अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत ( Mumbai Bank President Election ) महाविकास आघाडीने भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांच्या ( Bjp Pravin Darekar ) गडाला सुरुंग लावला आहे. दरेकर यांनी अध्यक्ष पदाच्या निवडणुकीतून ऐनवेळी माघार घेत प्रसाद लाड ( Mumbai Bank Prasad Lad ) यांना उमेदवारी दिली. मात्र, सदस्य संख्याबळाच्या जोरावर बँकेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे सिद्धार्थ कांबळे यांची ( Mumbai Bank President Siddharth Kamble ) निवड झाली आहे. उपाध्यक्षपदाची निवड चुरशीची झाली. शिवसेनेचे अभिषेक घोसाळकर आणि भाजपच्या उमेदवाराला समसमान मते मिळाली. अखेर भाजपच्या विठ्ठल भोसले यांची उपाध्यक्ष पदी वर्णी लागली.

गेल्या अनेक वर्षापासून प्रवीण दरेकर यांच्याकडे मुंबै बँकेची सुत्रे हाती होती. दरेकर यांच्या सत्तेला सुरुंग लावण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने युती करत व्यूहरचना आखली. सह्याद्री अतिथीगृहावर उपमुख्यमंत्री अजित पवार, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, शिवसेनेचे नेते मिलींद नार्वेकर आणि सुरज चव्हाण यांच्या चर्चा झाली. यावेळी अध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादीचे सिद्धार्थ कांबळे तर उपाध्यक्ष पदासाठी शिवसेनेचे अभिषेक घोसाळकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

उपाध्यक्षपदी भोसले

मुंबै बँकेच्या अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत सिद्धार्थ कांबळे यांना 11 मते तर भाजपचे प्रसाद लाड यांना 9 मते मिळाली. उपाध्यपदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या अभिषेक घोसाळकर यांना 10 मते आणि भाजपच्या विठ्ठल भोसले यांना 10 मते पडली. त्यानंतर दोन्ही उमेदवारांना समसमान मते पडल्याने ईश्वर चिठ्ठी काढण्यात आली. यावेळी भोसले यांच्या नावाची चिठ्ठी आल्याने निवडणूक आयोगाने त्यांना उपाध्यक्ष पद घोषित केले.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी दबाव निर्माण केला

या निवडणुकीत भाजपाकडे 10 मते होती. भाजपाचे विष्णू भोंगळे हे फुटल्याने महाविकास आघाडीला 11 मते मिळाली. या निवडणुकीसाठी राज्य सरकारने दबाव आणला होता. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी प्रत्यक्ष लक्ष घातल्याने मोठा दबाव निर्माण झाला. सत्तेचा दुरुपयोग करुन ही निवडणुक महाविकास आघाडीने जिंकल्याचा आरोप प्रवीण दरेकर यांनी ( Pravin Darekar Criticized Cm Deputy Cm ) केला.

हेही वाचा -UP Election : भाजपा आमदारांच्या राजीनाम्यांवर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.