ETV Bharat / city

महाविकास आघाडीच ठरलं! सलग दुसऱ्या वर्षी हिवाळी अधिवेशन मुंबईतच होणार - मुंबई हिवाळी अधिवेशन

यंदाचे हिवाळी अधिवेशन ( Winter session on 7th December 2021 ) ७ डिसेंबर २०२१ रोजी नागपूरमध्ये घेण्याची घोषणा यापूर्वीच करण्यात आली होती. मात्र, या अधिवेशनाला काही दिवस शिल्लक असतानादेखील नागपूरमध्ये तयारीसाठी हालचाली झाल्या नाहीत. त्यामुळे मागील काही दिवसांपासून यंदाचे हिवाळी अधिवेशनदेखील नागपूर ऐवजी मुंबईलाच होईल असा तर्क लावला जात होता. अखेर हा अंदाज खरा ठरला आहे.

विधानसभा
विधानसभा
author img

By

Published : Nov 25, 2021, 7:50 PM IST

मुंबई - सलग दुसऱ्या वर्षी राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर ऐवजी मुंबईतच होणार आहे. महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्याने हे अधिवेशन मुंबईत घेतले जाणार असल्याचे बोलले जात आहे.

यंदाचे हिवाळी अधिवेशन ( Winter session on 7th December 2021 ) ७ डिसेंबर २०२१ रोजी नागपूरमध्ये घेण्याची घोषणा यापूर्वीच करण्यात आली होती. मात्र, या अधिवेशनाला काही दिवस शिल्लक असतानादेखील नागपूरमध्ये तयारीसाठी हालचाली झाल्या नाहीत. त्यामुळे मागील काही दिवसांपासून यंदाचे हिवाळी अधिवेशनदेखील नागपूर ऐवजी मुंबईलाच होईल ( Maharashtra winter assembly session in Mumbai ) असा तर्क लावला जात होता. अखेर हा अंदाज खरा ठरला आहे. यामागे मुख्यमंत्र्यांची तब्येत हे सुध्दा कारण आहे.

हेही वाचा-नागपुरातील हिवाळी अधिवेशनानं कंत्राटदारांची होणार चांदी? वाचा काय आहे प्रकरण..

कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत होणार शिक्कामोर्तब-

मागील बऱ्याच दिवसापासून कामकाज सल्लागार समितीची बैठकच होत नव्हती. तर दुसरीकडे हिवाळी अधिवेशन नागपुरात होणार, अशा चर्चा रंगल्या होत्या. पण, अधिवेशनाबाबत अधिकृत निर्णय झाला नव्हता. आता हे अधिवेशन २२ ते २९ डिंसेबरला होणार असल्याचे समजते आहे. याबाबत कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत अधिवेशनावर अंतिम निर्णय घेतला जाईल.

हेही वाचा-हिवाळी अधिवेशनात होणार विधानसभा अध्यक्षांची निवड?

नागपूरसाठी शिवसेनेचा विरोध तर काँग्रेस आक्रमक

शिवसेनेचा सुरुवातीपासूनच नागपूर अधिवेशनाला विरोध आहे. मात्र, काँग्रेस आणि भाजप हिवाळी अधिवेशन नागपूरलाच घ्यावे यासाठी आग्रही होते. अधिवेशन नागपूरला घेण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना विनंती करणार असल्याचे काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले होते. तर दुसरीकडे भाजपचे विशेष करून विदर्भातील नेतेही अधिवेशन नागपूरला घेण्याकरता आग्रही होते. त्यामुळे अधिवेशन नागपूरला घ्यावे की मुंबईला यावरून महाविकास आघाडी सरकारमध्ये मतभेद होते. तसेच चार-पाच दिवसांच्या अधिवेशनावर कोट्यवधींचा खर्च करण्याऐवजी तेवढा निधी विदर्भाला उपलब्ध करून देण्याची तयारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दर्शवली. त्यामुळे हे अधिवेशन मुंबईत घेण्याला विदर्भातील नेत्यांचा विरोध नाही.

या कारणामुळे मुंबईत हिवाळी अधिवेशन

हिवाळी अधिवेशन नागपूर (winter session Mumbai ) येथे घेऊन विदर्भातील जनतेच्या विविध प्रश्नांना न्याय द्यायचा, असा राज्य सरकारचा प्रघात आहे. त्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून अधिवेशन नागपुरात घेण्यात येते. मात्र, यंदा हे अधिवेशन कोरोनाचे सावट कमी झाले असले तरी मुंबईत घेण्यात यावे, असे मत शिवसेनेने व्यक्त केले आहे. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर नुकतीच झालेली शस्त्रक्रिया आणि येत्या १० डिसेंबर रोजी राज्यात होणाऱ्या विधान परिषदेच्या पोटनिवडणुका यांच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर हे अधिवेशन मुंबईत ( why winter assembly session in Mumbai ) घेतले जाणार असल्याचे सूत्राने सांगितले आहे.

हेही वाचा-Maharashtra Winter Session 2021 : कोणी म्हणतंय मुंबईत घ्या तर कोणी म्हणतंय नागपुरात, पेच कायम

हिवाळी अधिवेशनात होणार विधानसभा अध्यक्षांची निवड?

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेले राज्य विधानसभेचे अध्यक्षपद अजूनही रिक्तच आहे. अगोदर अर्थसंकल्पीय नंतर पावसाळी या दोन्ही अधिवेशनात न झालेली विधानसभा अध्यक्षांची निवड आतातरी हिवाळी अधिवेशनात होते का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मात्र, यंदा या अधिवेशनात अध्यक्षांची निवड करण्याबाबत काँग्रेसकडून शिक्कामोर्तब झाल्याचे समजत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.