मुंबई : महाराष्ट्र विधिमंडळाचे ( Maharashtra Legislature ) दोन दिवसीय अधिवेशन तीन व चार जुलै रोजी मुंबई येथे संपन्न होत आहे. या अधिवेशनात विशेष करून विधानसभा अध्यक्षपदाची ( Of the Speaker of the Legislative Assembly ) निवडणूक केली जाणार आहे. त्यासोबतच नवीन सरकारची बहुमत चाचणी होणार आहे. त्यामुळे राज्यपालांनी विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणुकीसंदर्भात आदेश जारी केला आहे.
विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसंदर्भात आक्षेप : विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडी संदर्भामध्ये हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याचे राज्यपाल महोदयांनाही माहिती आहे. महाविकास आघाडी सरकार असताना विधानसभा अध्यक्ष निवडीसाठी राज्यपालांनी परवानगी द्यावी म्हणून महाविकास आघाडी विशेष करून काँग्रेस वारंवार मागणी करीत होती. त्या संदर्भातील पत्रही त्यांनी राज्यपालांना दिला होते. परंतु, राज्यपालांनी हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याकारणाने विधानसभा अध्यक्ष निवडणूक घेता येत नाही अशा आशयाचे पत्र ( Letter to the Principal Secretary ) महाविकास आघाडी सरकारला दिलं होतं. आता त्याच पत्राचा आधार घेत महाविकास आघाडी सरकारने राज्यपालांवर निशाणा साधला आहे.
महाविकास आघाडीकडून राज्यपालांना पत्र : या प्रकरणावर बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, तेव्हा राज्यपाल यांनी घेतलेला एक निर्णय व आता भाजपसाठी घेतलेला निर्णय यामध्ये दुमत असून, या प्रकरणात राज्यपालांची भूमिका संशयास्पद आहे. त्या कारणास्तव अशा पद्धतीने निवडणूक घेणे चुकीचे असल्याचे आम्ही विधानसभा सचिवांना पत्राद्वारे निदर्शनास आणून दिले आहे. तसेच तसा आदेशही स्वतः राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मागेच दिले असल्याकारणाने आता ते पुन्हा निवडणूक कशी लावू शकतात, असा प्रश्न उपस्थित करीत, महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांच्या गटनेत्यांनी तसं पत्र विधिमंडळाच्या प्रधान सचिवांना दिले आहे.
राज्यपालांची भूमिका चुकीची : महाविकास आघाडी सरकार असताना विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीसाठी राज्यपालांनी परवानगी द्यावी म्हणून महाविकास आघाडी विशेष करून काँग्रेस वारंवार मागणी करीत होती. त्या संदर्भातील पत्रही त्यांनी राज्यपालांना दिले होते. परंतु, राज्यपालांनी हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याकारणाने विधानसभा अध्यक्ष निवडणूक घेता येत नाही, अशा आशयाचे पत्र महाविकास आघाडी सरकारला दिले होते. आता त्याच पत्राचा आधार घेत महाविकास आघाडी सरकारने राज्यपालांवर निशाणा साधला आहे.
राज्यपालांची भूमिका संशयास्पद : या प्रकरणावर बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, तेव्हा राज्यपाल यांनी घेतलेला एक निर्णय व आता भाजपसाठी घेतलेला निर्णय यामध्ये दुमत असून, या प्रकरणात राज्यपालांची भूमिका संशयास्पद आहे. त्या कारणास्तव अशा पद्धतीने निवडणूक घेणे चुकीचे असल्याचे आम्ही विधानसभा सचिवांना पत्राद्वारे निदर्शनास आणून दिले आहे. तसेच, आता आलेल्या नवीन ईडी सरकारने लगेच विधिमंडळ अधिवेशन घेऊन विधान सभा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांना पत्र दिले. त्यामुळे लगेच राज्यपालांनी विधान सभा अध्यक्षपदाची निवडणूक घेणे हे चुकीचे आहे.
काॅंग्रेसचा पाठिंबा शिवसेनेच्या उमेदवाराला : विधानसभा अध्यक्षपदासाठी महाविकास आघाडीमध्ये हे पद काँग्रेसच्या वाट्याला होते. तरीसुद्धा काँग्रेसने आपला उमेदवार न देता शिवसेनेचे उमेदवार राजन साळवी यांना पाठिंबा दिला आहे. याबाबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना विचारले असता, ते म्हणाले की, हा एक रणनीतीचा भाग असून, आम्ही त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेचे उमेदवार राजन साळवी यांना पाठिंबा देण्याचे ठरवले आहे.
हेही वाचा : Special Session of Maha Legislature : विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक ३ जुलैला, ४ जुलैला होणार बहुमत चाचणी