ETV Bharat / city

Maharashtra winter session 2021 : हिवाळी अधिवेशनात निवडला जाणार विधानसभेचा अध्यक्ष - बाळासाहेब थोरात - काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात

मागील दोन अधिवेशने ही अध्यक्षाविना झाली. मात्र, यंदाच्या हिवाळी अधिवेशनात विधानसभेला नवा अध्यक्ष मिळेल आणि तो काँग्रेसचाच असेल, अशी माहिती महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.

balasaheb thorat
balasaheb thorat
author img

By

Published : Dec 20, 2021, 6:50 PM IST

Updated : Dec 20, 2021, 7:18 PM IST

मुंबई - मागील दोन अधिवेशने ही अध्यक्षाविना झाली. मात्र, यंदाच्या हिवाळी अधिवेशनात विधानसभेला (Maharashtra Assembly Session 2021) नवा अध्यक्ष मिळेल आणि तो काँग्रेसचाच असेल, अशी माहिती महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Congress leader Balasaheb Thorat)यांनी आज माध्यमांशी बोलताना दिली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यानंतर अद्याप विधानसभा अध्यक्षाची निवड झालेली नाही.

अंतिम नावाची घोषणा हायकमांड करणार -

बाळासाहेब थोरात म्हणाले, यंदाच्या हिवाळी अधिवेशनात (Maharashtra Assembly Session 2021) विधानसभा अध्यक्षाची निवड होणार आहे. अध्यक्ष हा काँग्रेसचाच असेल. अध्यक्षपदासाठी कोणाच्या नावाची शिफारस करण्यात येणार आहे, याबाबत थोरात यांनी सांगण्यास नकार दिला. काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याशी चर्चा केल्यानंतर अध्यक्षपदाच्या नावावर निर्णय घेण्यात येईल. अध्यक्षपदासाठी आमदार अमिन पटेल त्याचबरोबर आमदार संग्राम थोपटे यांचे नाव चर्चेत असल्याची माहिती आहे.

हे ही वाचा - Subhash Desai Attacked Amit Shah : केंद्र व गुजरातकडून महाराष्ट्राचे वैभव पळवण्याचा प्रकार -सुभाष देसाई

आवाजी मतदानाने होणार अध्यक्षांची निवड -

दरम्यान, येत्या २२ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात (Maharashtra Assembly Session 2021) विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. विधानसभा नियम समितीच्या पार पडलेल्या बैठकीत विधानसभा अध्यक्षाच्या निवडीचा नियम बदलण्याचा निर्णय झाला असून आता आवाजी मतदानाने अध्यक्षाची निवड करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी नियम बदलाचा हा प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्यात येणार असल्याची माहिती पुढे आली आहे. २२ तारखेला हा प्रस्ताव समोर ठेवून २३ तारखेला निवडणूक घेतली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Last Updated : Dec 20, 2021, 7:18 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.