ETV Bharat / city

महाराष्ट्र लवकरच पूर्णतः निर्बंध मुक्तीकडे, मास्क सक्ती उठणार

गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांची संख्या कमालीची घटली आहे. या पार्श्वभूमीवर येत्या १ एप्रिलपासून राज्यातील निर्बंध ( Maharashtra Covid Restriction lifting Decision ) पूर्णतः उठवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यामध्ये सर्व कोविड कायदे मागे घेतले जाणार असून, मास्क सक्ती देखील उठवली जाणार आहे.

Maharashtra covid restrictions lift
महाराष्ट्र कोविड निर्बंध मुक्ती निर्णय
author img

By

Published : Mar 30, 2022, 11:18 AM IST

मुंबई - गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांची संख्या कमालीची घटली आहे. या पार्श्वभूमीवर येत्या १ एप्रिलपासून राज्यातील निर्बंध ( Maharashtra Covid Restriction lifting Decision ) पूर्णतः उठवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यामध्ये सर्व कोविड कायदे मागे घेतले जाणार असून, मास्क सक्ती देखील उठवली जाणार आहे. आज (ता.३०) या संदर्भातील परिपत्रक काढण्यात येणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. राज्याच्या कोविड कार्यकारी समितीची मंगळवारी बैठक पार पडली. या बैठकीत निर्बंध पूर्णतः मुक्त करण्यावर शिक्कामोर्तब झाल्याचे ते म्हणाले.

हेही वाचा - Electricity Workers Call Off Strike : राज्यातील वीज ग्राहकांना दिलासा.. संप मागे घेण्याची कर्मचाऱ्यांची घोषणा

दोन वर्षांपूर्वी कोविडचा शिरकाव झाला आणि राज्यात निर्बंध लागू करण्यात आले. कोरोनाच्या तीन लाटा या काळात धडकल्या. राज्य सरकारच्या कठोर उपाय योजनांची अंमलबजावणी, वाढवलेल्या लसीकरणाच्या वेगामुळे कोरोना आटोक्यात आला. सध्या कोरोनाची रुग्णसंख्या कमालीची घटली असून, मृत्युदर शून्यावर आला आहे. तरीही राज्यात निर्बंध लागू असल्याने अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम होत आहे. त्यामुळे, आपत्ती व्यवस्थापन कायदा मागे घेण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

मास्क सक्ती नाही : कोरोनाचे निर्बंध पूर्णतः हटवल्यास कोविड नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलीस अथवा स्थानिक प्रशासनाकडून होणारा दंड आता आकारता येणार नाही. मास्क सक्ती देखील बंधनकारक नसेल. मात्र, गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरावे, असे आवाहन सरकार करणार आहे. लोकल प्रवासाला लसींच्या दोन डोसचे प्रमाणपत्र बंधनकारक होते. हा नियम देखील रद्द होणार आहे. मात्र, शंभर टक्के लसीकरणावर राज्य शासनाचा भर असणार आहे.

हेही वाचा - Prasad Lad : उद्धव ठाकरे आदिलशहा सरकारचं दर्शन देत आहेत का? प्रसाद लाड यांचा सवाल, मुंडन करून निषेध

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.