मुंबई - मान्सूनने महाराष्ट्रात आगमन झाले असून ( Maharashtra weather forecast ) त्याच्या कवेत राज्यातील अनेक जिल्हे आली आहेत. काल मुंबई, रत्नागिरी, ठाणे जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. कल्याण भागात नागरिकांच्या घरात पाणी शिरले. रस्त्यांवरून पाणी वाहत होते. मुंबईत मुसळधार ( Mumbai heavy rain) पावसामुळे रस्त्यावर पाणी जमा झाले आहे. पाणी साचलेल्या रस्त्यावरून वाहने काढताना नागरिकांची दमछाक ( Maharashtra rain ) होत आहे. दरम्यान मुंबई, ठाणे आणि रायगड, पालघरच्या काही भागांत पुढील 3, 4 तास मधूनमधून पावसाच्या तीव्र सरी सुरू राहण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने कोकणात पावसाचा इशारा दिला आहे.
-
latest radar obs at 10.50 am from Mumbai...
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) July 5, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
intermittent intense spells are likely to continue for next 3, 4 hrs over #Mumbai, #Thane and parts of #Raigad, #Palghar as seen here pl.
TC pic.twitter.com/17o9h12B5F
">latest radar obs at 10.50 am from Mumbai...
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) July 5, 2022
intermittent intense spells are likely to continue for next 3, 4 hrs over #Mumbai, #Thane and parts of #Raigad, #Palghar as seen here pl.
TC pic.twitter.com/17o9h12B5Flatest radar obs at 10.50 am from Mumbai...
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) July 5, 2022
intermittent intense spells are likely to continue for next 3, 4 hrs over #Mumbai, #Thane and parts of #Raigad, #Palghar as seen here pl.
TC pic.twitter.com/17o9h12B5F
हेही वाचा - Mumbai Rain : मुंबईसह कोकणात जोरदार पाऊस, राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा
5 जुलैपासून पुढील 4-5 दिवस चांगल्या पावसाचा अंदाज - ओरिसा व लगतच्या भागात तयार होणारे कमी दाबाचे क्षेत्र व त्याची संभाव्य वायव्य दिशेकडे होणारी वाटचाल यामुळे अरबी समुद्र व बंगालचा उपसागर या मान्सूनच्या दोन्ही शाखा सक्रिय होऊन 2 दिवसांत राज्यात 5 जुलैपासून पुढील 4-5 दिवस चांगला पाऊस अपेक्षित आहे, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला होता.
-
Monsoon Vigorous over the west coast and ghat areas as seen from the latest satellite obs at 10.50 am.
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) July 5, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
pl zoom to see, the embedded clouds multiple layered structure to understand the intensity of probable rain pattern
Entire Konkan is on high alert with rainfall warning by IMD pic.twitter.com/Ow5i4R0i5X
">Monsoon Vigorous over the west coast and ghat areas as seen from the latest satellite obs at 10.50 am.
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) July 5, 2022
pl zoom to see, the embedded clouds multiple layered structure to understand the intensity of probable rain pattern
Entire Konkan is on high alert with rainfall warning by IMD pic.twitter.com/Ow5i4R0i5XMonsoon Vigorous over the west coast and ghat areas as seen from the latest satellite obs at 10.50 am.
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) July 5, 2022
pl zoom to see, the embedded clouds multiple layered structure to understand the intensity of probable rain pattern
Entire Konkan is on high alert with rainfall warning by IMD pic.twitter.com/Ow5i4R0i5X
मुंबईत जोरदार पाऊस - मुंबईला ५ दिवस पावसाचा यलो अलर्ट दिला ( Heavy rain in Mumbai ) आहे, तसेच रात्रीच मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता. त्यानुसार मध्यरात्रीपासून मुंबईत मुसळधार पाऊस पडला आहे. यामुळे अनेक सखल भागात पाणी साचले. मात्र, पाहटे पावसाने विश्रांती घेतल्याने मुंबईकरांना ( Stagnant water in low laying areas in Mumbai ) दिलासा मिळाला आहे. मुंबईत २९ जूनपासून पावसाने जोर धरला. २ जुलै पर्यंत सतत पाऊस पडत होता. रविवारी पावसाने विश्रांती घेतली होती. काल सोमवार ४ जुलै सायंकाळपासून पुन्हा पावसाने हजेरी लावली. सायंकाळनंतर पावसाचा जोर वाढला. मध्यरात्रीपासून पहाटे पर्यंत मुसळधार ( Mumbai rain news ) पाऊस पडला. यामुळे मुंबईत अनेक सखल भागात पाणी साचले. मात्र, पहाटे ६ वाजता पावसाने विश्रांती घेतली. यामुळे सखल भागात साचलेल्या पाण्याचा निचरा होऊ लागला आहे.
इतका पडला पाऊस - ४ जुलै सकाळी ८ ते ५ जुलै सकाळी ८ पर्यंत गेल्या २४ तासांत मुंबई शहर विभागात ९५.८१ मिलिमीटर, पूर्व उपनगर ११५.०९ मिलिमीटर, तर पश्चिम उपनगर ११६.७३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. सायंकाळी ४.१० वाजता समुद्राला ४.१ मीटरची भरती असून नागरिकांनी समुद्र किनारी जाऊ नये, असे पालिकेने आवाहन केले आहे. मुंबई शहर आणि उपनगरात मुसळधार ते अती मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे, अशी माहिती पालिकेच्या आपात्कालीन व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात जोरदार पाऊस - जिल्ह्याला सोमवारी मुसळधार पावसाने ( Heavy rain in Ratnagiri district ) झोडपून काढले. त्यामुळे, काही ठिकाणी पाणी तुंबले, तर काही ठिकाणी नद्यांना पूर आल्याने पुराचे पाणी शहरात घुसले. त्यामुळे, अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. चिपळूण शहर ( Chiplun rainfall news ) आणि ग्रामीण भागात सोमवारी पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला. धो-धो असा पाऊस पडत होता. त्यामुळे, चिपळूण शहरात ( Rivers crossed warning level in Ratnagiri ) अनेक ठिकाणी पाणी तुंबले. महामार्गावर डीबीजे कॉलेज, तसेच कापसाळ येथे पाणी तुंबल्याने वाहतूक पूर्णतः कोळमडली होती. एक ते दीड फूट पाण्यातून ( Ratnagiri rainfall ) वाहने काढली जात होती. सलग मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. एकूणच पहिल्याच पावसात चिपळूणमधील जनजीवन विस्कळीत झाल्याचे चित्र आहे.
कोल्हापुरात मुसळधार पावसाने पंचगंगा नदी पाणी पातळीत वाढ - कोल्हापुरात ( Kolhapur Rain) पावसाचा जोर चांगलाच वाढला असून, 8 जुलै पर्यंत मुसळधार पावसाचा ( Heavy Rain ) इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळे एका दिवसात 6 बंधारे पाण्याखाली गेले असून, पंचगंगा नदी पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. येथील राजाराम बंधारासुद्धा सायंकाळी पाण्याखाली गेला. सद्यस्थितीत राजाराम बंधाराची ( Rajaram Dam ) पाणी पातळी 17.5 फुटावर आहे. त्यामुळे, हा बंधारा आता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
राज्य हवामान खात्याने मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली - राज्य हवामान खात्याने मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे, पालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी तैनात करण्यात आले होते. खबरदारीची उपाययोजना म्हणून मुंबई अग्निशमन दल, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथकाच्या तुकड्या, शहर आपत्ती पथकाच्या सर्व तुकड्या, नौदल, तटरक्षक दल यांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत. मुंबई व शहर उपनगरांत पाण्याचा निचरा होण्यासाठी पंप लावण्यात आल्याची माहिती पालिका आपत्कालीन विभागाने दिली.
आज राज्यातील प्रमुख शहरांचे तापमान किती? याबाबत जाणून घ्या
मुंबई - 26.4 अंश सेल्सिअस
पुणे - 27.4 अंश सेल्सिअस
नागपूर - 28.4 अंश सेल्सिअस
नाशिक - 27 अंश सेल्सिअस
सोलापूर - 29.8 अंश सेल्सिअस
कोल्हापूर - 23.6 अंश सेल्सिअस
जळगाव - 25.4 अंश सेल्सिअस
वरील सर्व जिल्ह्यांच्या तापमानाचे निरीक्षण आयएमडीकडून आज पहाटे 11.30 ला झाले आहे.
हेही वाचा - रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार.. काही नद्यांनी ओलांडली इशारा पातळी, चिपळूणमध्ये पाणी तुंबलं