ETV Bharat / city

पदवीधर, शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीत ५ पैकी ४ जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी - पुणे शिक्षक निकाल

Maharashtra Vihan Parishad Graduate and Teachers Constituency Elections LIVE Updates
विधानपरिषद रणधुमाळी : मराठवाडा पदवीधरमध्ये महाविकास आघाडीची बाजी, इतर जागांवरील मतमोजणी सुरुच..
author img

By

Published : Dec 4, 2020, 6:43 AM IST

Updated : Dec 4, 2020, 10:45 PM IST

22:42 December 04

अमरावती शिक्षक मतदार संघ निवडणूक: अपक्ष किरण सरनाईक यांनी मारली बाजी

अमरावती - शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत वाशिमचे अपक्ष उमेदवार किरण सरनाईक यांनी बाजी मारली आहे. या निवडणुकीत जाणकारांचे सर्व अंदाज चुकले असून मतदानाच्या दिवशीपर्यंत किरण सरनाईक हे स्पर्धेत राहतील, अशी अपेक्षाही कुणाला नसताना अतिशय नियोजनबद्ध आखणी करून किरण सरनाईक यांनी महाविकास आघाडीच्या श्रीकांत देशपांडे यांचा 3 हजार 342 मतांनी पराभव करून सर्वांना चकित केले.

20:10 December 04

पुणे शिक्षक मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार प्रा. जयंत आसगावकर विजयी

पुणे - शिक्षक मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार प्रा. जयंत आसगावकर विजयी 

19:48 December 04

पुण्यात काँग्रेस भवन येथे महाविकास आघाडीचा जल्लोष

19:30 December 04

अमरावती शिक्षक मतदारसंघ निवडणुकीमधून शेखर भोयर, संगीता शिंदे बाद

अमरावती - शिक्षक मतदार संघाची मतमोजणी ही मागील ३५ पेक्षा जास्त तासांपासून सुरू आहे. या निवडणुकीत तब्बल २७ उमेदवार आपले भाग्य आजमावत आहेत. या निवडणुकीच्या रिंगणात आधीपासूनच चर्चेत असलेले अपक्ष उमेदवार शेखर भोयर आणि संगिता शिंदे या बाद झाल्या असून आता महाविकास आघाडीचे उमेदवार प्रा. श्रीकांत देशपांडे आणि अपक्ष उमेदवार किरण सरनाईक यांच्यात थेट लढत सुरू आहे. 

16:44 December 04

पुणे शिक्षक मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार आघाडीवर

पुणे - शिक्षक मतदारसंघातील मतमोजणी ही बाद फेरीपर्यंत पोहोचली असून यामध्येही काँग्रेसचे जयंत आसगावकर आघाडीवर आहेत. 20 व्या बाद फेरीअखेर जयंत आसगावकर यांना 17 हजार 117 इतकी मते मिळाली आहेत तर अपक्ष उमेदवार आणि विद्यमान आमदार दत्तात्रय सावंत यांना 11 हजार 161 इतकी मते मिळाली आहेत. भाजपचे उमेदवार जितेंद्र पवार तिसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांना 5 हजार 878 इतकी मते मिळाली असून अद्याप मतमोजणी सुरू आहे.

15:32 December 04

महाविकास आघाडी सरकारमधील तिन्ही पक्षांची ऐकी हे विजयाचे रहस्य - राजेश टोपे

पुणे

पुणे - महाविकास आघाडी सरकारमधील तीन पक्षांची ऐकी, कार्यकर्त्यांमधील एकजूट आणि मनोमिलनाने केलेले काम, हे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत मिळालेल्या यशाचे रहस्य आहे, असे मत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केले.

14:49 December 04

नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघात कॉंग्रेसचे उमेदवार अभिजित वंजारी विजयी

नागपूर - विधानपरिषदेच्या नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघात कॉंग्रेसचे उमेदवार अभिजित वंजारी विजयी झाले. गेल्या कित्येक वर्षांपासून या जागेवर भाजप उमेदवार विजयी होत होता. मतदार नोंदणीत आघाडी घेतल्यानेच माझा विजय झाला असल्याची प्रतिक्रिया अभिजित वंजारी यांनी दिली. 

12:34 December 04

सत्तेत येण्याचा भाजपचा दावा ठरला फोल - नवाब मलिक

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाचा निकाल म्हणजे महाविकास आघाडी, आणि आम्ही वर्षभरात केलेले काम याची पोचपावती असल्याचे मत राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी व्यक्त केले आहे. या निकालांमुळे सत्तेत येण्याचा भाजपचा दावा फोल ठरल्याचेही ते म्हणाले.

12:31 December 04

हा विजय आघाडीतील सर्व पक्षांच्या एकजुटीचा, आणि राज्यातील जनतेच्या सरकारवरील विश्वासाचं प्रतीक- अजित पवार

महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा विजय हा आघाडीतील सर्व पक्षांच्या एकजुटीचा आहे. तसेच ते राज्यातील जनतेच्या सरकारवरील विश्वासाचं प्रतीक असल्याचे सांगून, महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी केल्याबद्दल सर्व मतदारांचे, राज्यातील जनतेचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आभार मानले आहेत. 

12:29 December 04

विधानपरिषद निवडणुकांचा निकाल अपेक्षेविरुद्ध - फडणवीस

विधान परिषदेच्या निवडणुकांचा निकाल हा अपेक्षेविरुद्ध होता. पराभवाच्या कारणांचे आत्मचिंतन करण्याची आम्हाला गरज आहे. महाविकासआघाडीमध्ये तीन पक्ष एकत्र आल्यामुळे त्यांना विजय मिळाला, असे मत विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.

12:29 December 04

मध्यमवर्गीयांसह उच्चशिक्षित मतदारदेखील महाविकास आघाडीसोबत - जयंत पाटील

या राज्यातील शेतकरी, कष्टकरी, कामगार व मध्यमवर्गीय यांच्यासोबतच उच्चशिक्षित मतदारदेखील महाविकास आघाडीसोबत ठामपणे उभा आहे हेच या निकालाने सिद्ध होते असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे. 

10:29 December 04

चंद्रकांत पाटलांनी कामंच केली नाहीत, त्यामुळे माझ्या विजयात त्यांचा मोठा वाटा - अरुण लाड

आमच्या यशामध्ये चंद्रकांत पाटील यांचा मोठा वाटा आहे. चंद्रकांत पाटलांनी कामेच केली नाहीत, त्यामुळे त्यांच्या पारंपारिक मतदारसंघातूनही महाविकास आघाडीचा उमेदवार विजयी झाला असे अरुण लाड म्हणाले.

09:24 December 04

महाविकास आघाडीच्या एका वर्षाच्या कामावर शिक्का - शरद पवार

विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीचा होत असलेला विजय, हा या सरकारवर लोकांनी दाखवलेला विश्वास आहे असे मत शरद पवार यांनी व्यक्त केले आहे. दरम्यान, नंदुरबारमधील पोटनिवडणुकीचा निकाल हा धक्कादायक नसल्याचेही पवार म्हणाले.

08:16 December 04

पुणे पदवीधरमध्ये मविआ कडून भाजपचा धुव्वा!

पुणे पदवीधर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या अरुण लाड यांनी विजय मिळवला आहे. लाड यांना एक लाख २२ हजार १४५ मतं मिळाली. तर, भाजपच्या संग्राम देशमुख यांना ७३ हजार ३२१ मतांवर समाधान मानावे लागले. या मतदारसंघात विजयाचा कोटा हा १ लाख १४ हजार १३७ होता. यानंतर आता अरुण लाड शरद पवार यांच्या निवासस्थानी जाणार आहेत.

07:21 December 04

पुणे पदवीधर मतदारसंघ अपडेट..

आतापर्यंत एक लाख 23 हजार 200 मतांची मोजणी पूर्ण झाली आहे. त्यामध्ये महाविकास आघाडीच्या अरुण लाड यांना 62 हजार 992 इतकी मतं मिळाली आहेत. तर, त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपचे संग्राम देशमुख यांना 35 हजार 32 इतकी मतं मिळाली आहेत.

07:19 December 04

पुणे शिक्षक मतदारसंघ अपडेट..

२०व्या फेरीअखेर महाविकास आघाडीच्या जयंत आंसगावकर यांना 17 हजार 117 इतकी मतं मिळाली आहेत. तर, अपक्ष उमेदवार आणि विद्यमान आमदार दत्तात्रय सावंत यांना 11 हजार 161 इतकी मतं मिळाली आहेत.

06:35 December 04

अमरावती शिक्षक मतदारसंघ : दुसऱ्या पसंतीच्या मतमोजणीनंतरची आकडेवारी..

दुसऱ्या पसंतीच्या मतमोजणीनंतर अपक्ष उमेदवार किरण सरनाईक यांना एकूण ६,२२६ मतं मिळाली आहेत. महाविकास आघाडीच्या श्रीकांत देशपांडे यांना ५.२४३ मतं मिळाली आहेत. तर ५,००६ मतांसह भाजपचे शेखर भोयर हे तिसऱ्या क्रमांकावर आहेत. या मतदारसंघात विजयासाठी कोटा १४,९९६ मतांचा आहे.

06:31 December 04

पदवीधर-शिक्षक मतदारसंघ निवडणूक; दुसऱ्या दिवशी मतमोजणी सुरुच..

विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकांची मतमोजणी दुसऱ्या दिवशीही सुरू आहे. एक डिसेंबरला या मतदारसंघांमध्ये निवडणुका पार पडल्या होत्या. त्यानंतर काल (गुरुवार) या निवडणुकांच्या मतमोजणीस सुरुवात झाली होती. आतापर्यंत मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचा निकाल हाती आला असून, त्याठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांना विजय प्राप्त झाला आहे. यासोबतच, कालपर्यंत हाती आलेल्या कलांनुसार इतर चार जागांवरही महाविकास आघाडीचे उमेदवार आघाडीवर आहेत.

Last Updated : Dec 4, 2020, 10:45 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.