ETV Bharat / city

राष्ट्रीय कौशल्य स्पर्धेत महाराष्ट्राचे घवघवीत यश; 8 ‘सुवर्ण’सह एकूण 30 पदकांची कमाई - नवाब मलिक राष्ट्रीय कौशल्य स्पर्धा

केंद्र शासनामार्फत दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय कौशल्य स्पर्धेत (India Skill Competition 2021) महाराष्ट्राने घवघवीत यश मिळविले आहे. या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातून गेलेल्या युवक-युवतींनी 8 सुवर्ण, 4 रौप्य, 7 कांस्य आणि 11 उत्तेजनार्थ पदके अशा एकूण 30 पदकांची कमाई केली आहे. महाराष्ट्राने पदकसंख्येत देशात दुसरे स्थान पटकावले आहे.

Nationl Skills Competitions
राष्ट्रीय कौशल्य स्पर्धेत महाराष्ट्राचे घवघवीत यश
author img

By

Published : Jan 11, 2022, 8:14 PM IST

मुंबई - केंद्र शासनामार्फत दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय कौशल्य स्पर्धेत (India Skill Competition 2021) महाराष्ट्राने घवघवीत यश मिळविले आहे. या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातून गेलेल्या युवक-युवतींनी 8 सुवर्ण, 4 रौप्य, 7 कांस्य आणि 11 उत्तेजनार्थ पदके अशा एकूण 30 पदकांची कमाई केली आहे. महाराष्ट्राने पदकसंख्येत देशात दुसरे स्थान पटकावले आहे. पुरस्कार विजेते तरुण-तरुणी आता शांघाय (चीन) येथे होणाऱ्या जागतिक स्किल्स चँपियनशीपसाठी पात्र ठरले असून त्यांना आपले कौशल्य जागतिक स्तरावर प्रदर्शित करता येणार आहे.

Nationl Skills Competitions
राष्ट्रीय कौशल्य स्पर्धेत महाराष्ट्राचे घवघवीत यश

पहिला ओडिसा तर दुसरा महाराष्ट्र -
स्पर्धेमध्ये 10 सुवर्णपदकांसह एकूण 49 पदके पटकावून ओडीशा राज्याने प्रथम क्रमांक पटकावला, तर 8 सुवर्णपदकांसह एकुण 30 पदके पटकावून महाराष्ट्र राज्य द्वीतीय क्रमांकावर आले. याशिवाय केरळ 24 पदके, कर्नाटक 23 पदके, तामिळनाडू 23 पदके, आंध्र प्रदेश 16 पदके, बिहार 13 पदके, हरयाणा, गुजरात, राजस्थान व चंदीगड यांना प्रत्येकी 11 पदके, पंजाब 8 पदके अशा पद्धतीने विविध राज्यांनी कामगिरी केली आहे. राज्यातून एकुण 60 पेक्षा अधिक स्पर्धक दिल्ली येथे राष्ट्रीय कौशल्य स्पर्धेत सहभागी झाले होते. यापूर्वी गांधीनगर (गुजरात) येथे झालेल्या पश्चिम प्रादेशिक स्पर्धेत 45 पदके पटकावून 55 टक्के पदकांवर महाराष्ट्रातील युवक-युवतींनी आपले नाव कोरले होते.

राज्य शासनामार्फत सर्वतोपरि सहकार्य- नवाब मलिक
राष्ट्रीय स्पर्धेतील यशाबद्दल सर्व युवकांचे राज्याचे कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांनी अभिनंदन केले असून त्यांना जागतिक स्किल्स चँपियनशीपसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. याशिवाय मलिक म्हणाले की, या स्पर्धेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील कल्पक तरुणांना जागतिक पातळीवर त्यांचे कौशल्य दाखविण्याची संधी प्राप्त झाली आहे. कौशल्य विकासात देशाला अग्रेसर बनविताना महाराष्ट्र त्यात महत्वपूर्ण योगदान देईल. राष्ट्रीय स्पर्धेत यश मिळविलेल्या तरुणांनी आता जिद्दीने शांघाय येथे होणाऱ्या जागतिक स्पर्धेत यश मिळविण्याचे ध्येय ठेवावे. २०२३ मध्ये फ्रान्स येथे होणाऱ्या स्पर्धेसाठीही आतापासूनच तयारी सुरु करावी. जागतिक पातळीवर कौशल्य क्षेत्रात देशाचे नाव उज्वल करताना त्यात महाराष्ट्रातील युवक-युवती महत्वपूर्ण योगदान देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या विद्यार्थ्यांना राज्य शासनामार्फत सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

राज्यातील सुवर्ण पदक विजेते स्पर्धक-
पंकज सिताराम सिंह (३ डी डिजीटल गेम आर्ट), मोहम्मद सलमान अन्सारी (ऑटोमोबाईल टेक्नॉलॉजी), रिंकल करोत्रा (ब्युटी थेरपी), श्रीराम कुलकर्णी (फ्लोरीस्ट्री), कोपल अजय गांगर्डे (इंडस्ट्रीयल डिझाईन टेक्नॉलॉजी), अमित कुमार सिंह (प्लास्टरींग अँड ड्रायवॉल सिस्टीम्स), ओमकार गौतम कोकाटे (प्रिंट मिडीया टेक्नॉलॉजी), संजीव कुमार सबावथ (वॉल अँड फ्लोअर टायलिंग)

रजत पदक विजेते स्पर्धक-
देवेज्या (फॅशन टेक्नॉलॉजी), रितेश मारुती शिर्के (इंडस्ट्रीयल कंट्रोल), लवकेश पाल (प्लास्टरींग अँड ड्रायवॉल सिस्टीम्स), आदित्य दीपक हुगे (प्रिंट मिडीया टेक्नॉलॉजी)

कांस्य पदक विजेते स्पर्धक-
ज्ञानेश्वर बाबुराव पांचाळ (कारपेन्ट्री), स्टेनली सोलोमन (काँक्रीट कन्स्ट्रक्शन वर्क), योगेश दत्तात्रय राजदेव (इलेक्ट्रीकल इन्स्टॉलेशन्स), श्रीष्टी मित्रा (ग्राफीक डिझाईन टेक्नॉलॉजी) आदित्य बिरंगळ (मोबाईल ॲप्लीकेशन्स डेव्हलपमेंट), अश्लेषा भारत इंगवले (पेंटींग अँड डेकोरेटींग), सुमीत सुभाष काटे (प्लॅस्टीक डाय इंजिनिअरींग)

उत्तेजनार्थ पुरस्कार विजेते-
कृष्णा लोया (डिजीटल कन्स्ट्रक्शन), जुई संतोश सपके (हेअर ड्रेसिंग), यश दिनेश चव्हाण (हेअर ड्रेसिंग), कृष्णा गिल्डा (इंडस्ट्रीयल डिझाईन टेक्नॉलॉजी), दक्ष राहुल सावला (इंडस्ट्रीयल डिझाईन टेक्नॉलॉजी), अविनाश नवनाथ तौर (मेकॅट्रॉनिक्स), श्वेतांक भालेकर (मेकॅट्रॉनिक्स), मित्रा राव (पॅटीसरी अँड कॉन्फेक्शनरी), अर्जुन मोगरे (प्लंबिंग अँड हिटींग), शेख इब्राहीम अजीज (वेल्डींग), वेद इंगळे (सायबर सिक्युरिटी)

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.