मुंबई - देशात आणि राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढतच असून दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. दरम्यान, मंगळवारी दिवसाच्या रुग्णवाढीमध्ये पुन्हा एकदा सर्वोच्च संख्या गाठत राज्यात २३ हजार ८१६ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे.
कोरोना बाधित रुग्णांची संख्या ९ लाख ६७ हजार ३४९ झाली आहे. राज्यात २ लाख ५२ हजार ७३४ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. तर आज राज्यात ३२५ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून मृतांची संख्या २७ हजार ७८७ वर पोहोचली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.८७ टक्के एवढा आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
राज्यात मंगळवारी १३ हजार ९०६ रुग्ण बरे झाले. आतापर्यंत एकूण ६ लाख ८६ हजार ४६२ रुग्ण बरे झाले असून राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७०.९६ टक्के आहे. मंगळवारीी २३ हजार ६१६ नवीन रुग्णांचे निदान झाले. राज्यभरात सध्यास्थितीत २ लाख ५२ हजार ७३४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
हेही वाचा - देशातील कोरोना संबंधी महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा...वाचा सविस्तर