ETV Bharat / city

Maharashtra Rains Update : आज 'या' राज्यात अनेक ठिकाणी रेड अलर्ट, सतर्कतेचं आवाहन - Maharashtra Rain

Maharashtra Rain Updates : राज्यभर पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे राज्यातील अनेक नद्यांच्या (Maharashtra Flood) आणि धरणांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे.

Maharashtra Rains Update
Maharashtra Rains Update
author img

By

Published : Jul 13, 2022, 9:15 AM IST

मुंबई - मुंबई बरोबरच राज्यभर पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे. सतत पडणाऱ्या पावसाने राज्यात अनेक नद्यांच्या ( Maharashtra Flood ) आणि धरणांच्या पाणीपातळीमध्ये वाढ झाली आहे. अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती देखील निर्माण झाली आहे. जनजीवन विस्कळीत झाले आहे. पालघर, पुणे शहर, गडचिरोली या ठिकाणी पुढचे 2 दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. या ठिकाणी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडावं अशी सूचना प्रशासनाने दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार काही सॅटेलाइट ऑब्सनुसार, मुंबई, ठाणे आणि रायगड आणि पालघरच्या काही भागात पुढील 2.3 तास मध्यम तीव्रतेचा पाऊस होण्याची शक्यता आहे.

मुंबईत मुसळधार पावसाची हजेरी, 14 जुलै पर्यंत ऑरेंज अलर्ट - गेल्या आठवड्यात मुंबई, मुंबई उपनगर येथे जोरदार पाऊस पाहायला मिळत आहे. मात्र, मागील 2 दिवसापासून मुंबईत पावसाने काहीशी विश्रांती घेतली होती. मात्र, अधून- मधून पावसाच्या जोरदार सरी सुरू आहेत ( Maharashtra Rain ). मात्र, सकाळपासूनच मुंबई, मुंबई उपनगर आणि ठाणे परिसरामध्ये जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे.

Maharashtra Rains Update

पुढील 3 दिवस ऑरेंज अलर्ट - हवामान विभागाने ( Meteorological Department ) मुंबई ठाणे आणि मुंबई उपनगर अशा तिन्ही जिल्ह्याला पुढील 3 दिवस ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे. सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईकरांना आपल्या कार्यालयापर्यंत पोहोचण्यात काही अडचणी होत आहेत. मात्र, सकाळपासून पाऊस सुरू असतानाही लोकल सेवेवर अद्याप कोणताही परिणाम झालेला नाही. तर तिथेच रस्ते वाहतूकही व्यवस्थित आहे. अद्याप मुंबईच्या रस्त्यांवर सखल भागात पाणी साठलेलं नाही. मात्र, असाच पाऊस पडत राहिला तर मुंबईच्या सकल भागात पाणी साठण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईकरांनी घराच्या बाहेर निघताना पावसाचा अंदाज घेऊनच बाहेर पडावं असं आवाहन पालिका प्रशासन आणि हवामान विभागाकडून करण्यात आला आहे.

चार महिने पाऊस पडतो असे म्हटले जाते. मात्र, मुंबईमध्ये चार महिन्याचा पाऊस काही दिवसातच ( mumbai rain ) पडतो. यामुळे मुंबईमध्ये पाणी साचून ते पाणी समुद्राला जाऊन मिळते. समुद्रात जाऊन मिळणारे पाणी वाचवण्यासाठी पालिकेने ( Municipal Corporation ) रेन वॉटर हार्वेस्टिंग ही योजना राबवली पण ती फेल गेली आहे. तसेच, पाणी साठवण्यासाठी बोगदे बांधले जाणार होते. मात्र ते बोगदेही उभारण्यात आलेले नाहीत. समुद्रात वाहून जाणारे पाणी वाचवण्यासाठी महापालिकेकडे कोणतीही उपायोजना नाही. समुद्राला जाऊन मिळणारे पाणी वाचवल्यास मुंबईकरांना पाणी कपातीपासून मुक्ती मिळवणार ( corporation does not have any measures save rain water ) आहे.

नागपुरात पावसाचा धुमाकूळ - नागपूर शहरात रविवारी दमदार पावसाने हजेरी ( Nagpur rains update ) लावली. यामुळे शहरातील अनेक भागात पाणी साचल्याचे चित्र पाहायला मिळाले. रात्री दहा वाजताच्या सुमारास नागपूरच्या पडोळे चौकात रिंगरोडवर गुडघाभर पाणी साचल्यामुळे रस्त्याच्या एका बाजूची वाहतूक ( Nagpur traffic update ) बंद पडली. खोलगट भाग असल्याने पडोळे चौकातून प्रतापनगरच्या दिशेने जात असलेल्या रस्त्यावर पावसाचे पाणी साचल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद झाला.

हेही वाचा - Nagpur Scorpio Swept Away in Flood : स्कॉर्पिओ गेली पुराच्या पाण्यात वाहून; तीन जणांचा मृत्यू, तिघांचा शोध सुरू

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.