मुंबई - केंद्रीय तपास यंत्रणेची करडी नजर महाराष्ट्रातल्या नेत्यांवर पाहायला मिळते. खास करून महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांना ईडीकडून समन्स बजावण्यात आले आहेत. तर अजूनही काही नेते तपास यंत्रणेच्या रडारवर आहेत. कोणत्या नेत्यांवर काय आरोप आहेत. तसेच आतापर्यंत या नेत्यांवर काय कारवाई करण्यात आली याबाबत घेतलेला हा मागोवा..
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यामागे ईडीचा (सक्तवसुली संचलनालय) ससेमिरा लागलेला आहे. आतापर्यंत तीन वेळा त्यांना चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर राहण्याचे समन्स बजावले आहेत. मात्र अद्याप ईडी कार्यालयात ते चौकशीसाठी हजर झालेले नाहीत. याआधी ईडीकडून देण्यात आलेल्या दोन समन्स वेळी वेगवेगळ्या कारणांमुळे ही चौकशी पुढे ढकलावी यासाठी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा प्रयत्न राहिला. तर तिथेच आज (३ जुलै रोजी) त्यांना देण्यात आलेल्या समन्सनंतर याबाबत कायदेशीर सल्ला घेण्यासाठी माजी गृहमंत्री थेट दिल्लीला पोहोचले आहेत. तिथे दिल्लीतील कायदे तज्ज्ञांकडून याबाबत सल्लामसल्लत करण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मात्र केवळ माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मागेच ईडीचा हा ससेमिरा नसून, महाविकास आघाडी सरकारमधील अजूनही इतर नेते आणि त्यांच्या निकटवर्तीय यांच्यावर ईडी तसेच सीबीआय या केंद्रीय तपास यंत्रणेची करडी नजर आहे. काही दिवसापूर्वी भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र कार्यकारणीची बैठक पार पडली. या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्याविरोधात सीबीआय चौकशी करण्यात यावी, असा प्रस्ताव पास करण्यात आला होता. तर तिथेच भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून अजित पवार आणि अनिल परब यांची सीबीआय द्वारे चौकशी करावी अशी मागणीही केली आहे. केंद्रीय तपास यंत्रणेच्या रडारवर असलेल्या नेत्यांची यादी दिवसेंदिवस मोठी होत चालली आहे. यापैकी सध्या सर्वात चर्चेत असलेल्या नेत्यांची नावे.
परमबीर सिंग यांच्या 100 कोटींच्या आरोपांमुळे देशमुख यांच्या मागे ईडीचा ससेमिरा -
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुंबईतील हॉटेल मालकांकडून अवैधरित्या शंभर कोटी रुपये जमा करण्यास सांगितले होते, असा आरोप परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर पत्र लिहून केला होता. 20 मार्च रोजी परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून हा आरोप केला होता. या आरोपानंतर उच्च न्यायालयात देखील याबाबत याचिका देखील दाखल करण्यात आली होती. या आधारावर ईडीकडून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर 2 जुलैला छापेमारी करण्यात आली. मुंबई, नागपूर आणि गृहमंत्री असताना त्यांना देण्यात आलेले शासकीय निवासस्थान या ठिकाणी हे धाड सत्र करण्यात आले. या धाडीनंतर देशमुख यांनी ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहावे, यासाठी आतापर्यंत तीन वेळा समन्स बजावण्यात आले आहे. तर तिथेच अनिल देशमुख यांचा मुलगा ऋषिकेश देशमुख यांनाही ईडीने चौकशीसाठी कार्यालयात हजर राहण्याचा समन्स बजावलेला आहे. यासोबतच शंभर कोटींच्या आरोपाबाबत अनिल देशमुख यांची सीबीआयकडून देखील चौकशी करण्यात आली होती.
अजित पवार यांच्या नातेवाईकांवर ईडीकडून कारवाई -
साताऱ्यातील जरंडेश्वर साखर कारखाण्याच्या कथित घोटाळाप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मामा राजेंद्र कुमार घाडगे यांच्यावर 1 जुलै रोजी कारवाई करण्यात आलेली आहे. राजेंद्र कुमार घाडगे यांच्याकडे जरंडेश्वर साखर कारखाना आहे. हा कारखाना आता ईडी कडून जप्त करण्यात आलाय. जरंडेश्वर साखर कारखान्याच्या नावाखाली कर्ज घेऊन ते बुडवण्याचा ठपका या कारवाईत ठेवण्यात आला आहे. राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणात ईडीकडून चौकशी सुरू आहे. या चौकशी दरम्यान जरंडेश्वर साखर कारखान्याने घेतलेल्या कर्जाबाबत या कारखान्याला टाळे ठोकण्यात आले. या कारवाईमुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठा धक्का मानला जातोय. सुरवातीला हा कारखाना सहकारी स्वरुपाचा होता. मात्र नंतरच्या काळात आर्थिक कारणावरून कारखान्याची विक्री होऊन कारखान्याचे खासगीकरण झाले. राज्य सहकारी बँकेत सुमारे २५ हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे. अनेक साखर कारखान्यांच्या मालकांनी कर्ज घेऊन ते नंतर बुडवले, तसेच साखर कारखान्याची कमी भावात विक्री झाली आणि राजकीय व्यक्तींनी हे कारखाने खरेदी केले असा आरोप होत आहे.
प्रताप सरनाईक यांच्यावर असलेले आरोप -
प्रताप सरनाईक यांनी एनएसईएल मध्ये अडीचशे कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप भाजपचे माजी खासदार किरीट सोमैया यांनी केला होता. या घोटाळ्यांच्या पैशातून त्यांनी जमीन खरेदी केल्याचा आरोपही किरीट सोमैया यांच्याकडून करण्यात आलाय. याबाबत ईडीकडून प्रताप सरनाईक यांच्या ठाण्याच्या आणि मुंबईच्या अशा दोन्ही घरांवर छापेमारी करण्यात आली होती. याबाबत वेळोवेळी ईडीकडून ईडी कार्यालयात हजर राहण्याचे समन्स प्रताप सरनाईक आणि त्यांच्या मुलांना देण्यात आले आहेत.
संजय राऊत यांच्या पत्नींना आली होती ईडीची नोटीस -
पीएनबी बँक घोटाळा प्रकरणी संशयित असलेले प्रवीण राऊत यांच्याकडून संजय राऊत यांच्या पत्नीने 55 लाख रुपये त्यांच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर झाले होते. या 55 लाख रुपयाच्या चौकशीसाठी वर्षा राऊत यांना ईडीकडून 28 डिसेंबर 2020 रोजी नोटीस बजावण्यात आली होती. यासंबंधी दोन वेळा वर्षा राऊत या ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी उपस्थित झाल्या होत्या. ईडीची चौकशी होण्याआधीच हे 55 लाख रुपये वर्षा राऊत यांनी परत केले होते.
अविनाश भोसले यांची ईडीकडून मालमत्ता जप्त -
बांधकाम व्यवसायिक अविनाश भोसले यांची 40 कोटी 34 लाख रुपयांची मालमत्ता जप्त करत ईडीने कारवाई केली. ही कारवाई 21 जून रोजी करण्यात आली होती. फेमा कायद्यांतर्गत ईडीने भोसले यांची पुणे आणि नागपुरातील मालमत्ता जप्त केली आहे. या आधीही भोसले यांची दोन वेळा चौकशी करण्यात आली होती. अविनाश भोसले यांची सर्व पक्षाच्या महत्त्वाच्या नेत्यांसोबत वैयक्तिक हितसंबंध आहेत. त्यामुळे अविनाश भोसले यांच्यावर झालेले कारवाईचे धागेदोरे महाराष्ट्रातल्या कोणत्या नेत्यापर्यंत पोहोचू शकतील याबाबत आता तर्क-वितर्क लावले जात आहेत.
अनिल परब यांच्यावर भाजपाच्या आरोपाची टांगती तलवार -
अनिल परब यांनी लॉकडाऊन दरम्यान रत्नागिरी येथील दापोली येथे १० कोटींचा बेकायदेशीर रिसॉर्ट बांधले असल्याचा आरोप खासदार किरीट सोमैया यांनी केला आहे. याबाबत किरीट सोमैया यांच्याकडून सीबीआय आणि आयकर विभागाकडे तक्रारी करण्यात आलेल्या आहेत. तसेच वेळोवेळी सचिन वाझे प्रकरणात देखील अनिल परब यांचा हात असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांच्याकडून करण्यात आलाय.
रवींद्र वायकर यांनी अवैध्यरित्या अलिबागमध्ये बंगले खरेदी केल्याचा आरोप -
अलिबाग मधील कोलई गावात अन्वय नाईक यांच्याकडून ३० जमिनीचे करार करण्यात आले. जमिनीचे करार, ग्रामपंचायतमध्ये केलेले अर्ज, रजिस्ट्रेशन, त्यांच्यावरील १९ बंगले याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. ही सर्व माहिती निवडणूक प्रतिज्ञापत्रात लपवण्यात आली असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केलाय. 19 बंगल्यांची प्रॉपर्टी विकत घेण्यासाठी रविंद्र वायकर यांच्या पत्नीसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या नावाची कागदपत्रे सादर करण्यात आली आहेत. मात्र याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही आपल्या प्रतिज्ञापत्रामध्ये काहीही उल्लेख केलेला नाही. या प्रॉपर्टीबाबत रवींद्र वायकर आणि खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप करण्यात आले आहेत.
कर्नाळा बँक घोटाळा प्रकरणी माजी आमदार विवेक पाटील यांच्यावर कारवाई -
पनवेलच्या कर्नाळा बँकेत 529 कोटींच्या घोटाळा केल्याप्रकरणी बँकेचे अध्यक्ष आणि माजी आमदार विवेक पाटील यांच्यावर ईडीकडून कारवाई करण्यात आली आहे. 16 जून रोजी ही कारवाई झाली असून, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी किडीने विवेक पाटील यांना त्यांच्या पनवेलच्या राहत्या घरातून ताब्यात घेतले होते.
ईडी आणि सीबीआय तपास यंत्रणेच्या रडारवर महाराष्ट्रातले नेते.. 'या' नेत्यांवर आहे करडी नजर! - अजित पवारांना ईडीचे समन्स
केंद्रीय तपास यंत्रणेची करडी नजर महाराष्ट्रातल्या नेत्यांवर पाहायला मिळते. खास करून महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांना ईडीकडून समन्स बजावण्यात आले आहेत. तर अजूनही काही नेते तपास यंत्रणेच्या रडारवर आहेत. कोणत्या नेत्यांवर काय आरोप आहेत. तसेच आतापर्यंत या नेत्यांवर काय कारवाई करण्यात आली याबाबत घेतलेला हा मागोवा..