मुंबई - तुम्ही एका बापाचे असाल तर आमदारकीचे राजीनामे द्यावे, अशा बोचऱ्या शब्दात शिवसेना नेते संजय राऊत यांनी बंडखोरांना आव्हान दिले आहे. हा बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे, त्यांच्या हातात भगवा झेंडा आहे. वेळ पडल्यास शिवसैनिक झेंडा खिशात ठेवतील आणि त्याचा दांडा वापरतील असा सज्जड इशारा शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिला आहे.
बंडखोरांना इशारा - आमदारांच्या बंडखोरीनंतर आता शिवसेनेने स्थानिक पातळीवर शिवसैनिकांचे मेळावे घेण्यास सुरुवात केली आहे. दहिसर येथील शिवसेनेच्या मेळाव्यात मार्गदर्शन करताना त्यांनी शिवसेना बंडखोरांना इशारा दिला. शिवसेनेला बंड नवीन नसल्याचे त्यांनी सांगितले. शिवसेनेने असे अनेक बंड पचवले असल्याचे सांगितले.
हेही वाचा - Meeting On Silver Oak : सरकार टिकवण्यासाठी कायदेशीर लढाई; सिल्वर ओकवर बैठक
जोरदार टीका - संजय राऊत यांनी बंडखोर आमदार गुलाबराव पाटील, संदीपान भुमरे यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले. गुलाबराव पाटील हे पान टपरी चालवत होते. संदीपान भुमेर हे साखर कारखान्यावर सुरक्षा रक्षक होते. त्यांनी शिवसेनेने आमदार केले, कॅबिनेट मंत्री केले असल्याचे सांगितले. आज त्यांनी शिवसेनेशी प्रतारणा केली असल्याचा हल्लाबोल त्यांनी केला. हे शिवसेनेवर संकट नाही तर ही संधी असल्याचे त्यांनी सांगितले.
हेही वाचा - Sharad Pawar leave for Delhi : शरद पवार आज मुंबईहून दिल्लीला रवाना होणार
हेही वाचा - Maharashtra Political Crisis: राज्यात भाजप स्थिर सरकार देणार का?; पाहा काय म्हणाले चंद्रकांत पाटील