मुंबई - नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्याने राज्यात सध्या राजकीय वातावरण तापलं आहे. त्यामुळे बंडखोर आमदार विरुद्ध शिवसैनिक यांच्यात संघर्ष निर्माण झाला आहे. अनेक ठिकाणी तोडफोडीच्या घटनेत वाढ झाली आहे. त्याच पार्श्वभूमीवर मुंबईत कलम 144 लागू करण्यात आलं आहे. मुंबई पोलिसांनी हा निर्णय घेतला ( Mumbai Police Imposed Section 144 In Mumbai ) आहे.
10 जुलैपर्यंत मुंबईत जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. सध्या सुरु असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई शहरातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी जमावबंदीचे कलम 144 लागू करण्याचे आदेश आले आहेत. त्यामुळं जमाव किंवा गर्दी करता येणार नाही. 10 जुलैपर्यंत मुंबईत जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत.
काल ( शुक्रवार ) पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती. आमदार, खासदार आणि राजकीय पक्षांच्या कार्यालयाचा बंदोबस्त देखील वाढवण्यात आला आहे राजकीय बॅनरबाजी होणार नाही, याकडेही विशेष लक्ष दिलं जातंय. आंदोलन किंवा हिंसा होणार यांची याचीही खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. राज्यात सध्या राजकीय वातावरण तापल्यानं पोलिसांकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. शिवसैनिक सध्या बंडखोर आमदारांच्या विरोधात आक्रमक झाले आहेत. ही सगळी परिस्थिती पाहता आता मुंबई पोलिसांनी खबरदारीची पावलं उचलण्यास सुरूवात केली आहे. मुंबईत आता कलम 144 लागू करण्यात आलं असून, जमावबंदी लावण्यात आली आहे.
एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर महाराष्ट्रात मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. शिवसेना विरुद्ध एकनाथ शिंदे गट असा संघर्ष रोज पहायला मिळतोय. एकीकडे सरकार वाचवण्यासाठी शिवसेनेची धडपड सुरू झाली आहे. तर, दुसरीकडे एकनाथ शिंदे गट संख्याबळ पूर्ण करून सरकार स्थापनेच्या तयारीत असल्याचं दिसतंय. यामुळे मुंबईत कधीही बंडखोर येऊ शकतात आणि राजकीय पेच निर्माण होऊ शकतो. त्याच पार्श्वभूमीवर पोलीस दल अलर्टवर आलेलं आहे.
हेही वाचा - Maharashtra Political Crisis : कोल्हापुरात राडा! राजेश क्षीरसागरांचे पोस्टर्स शिवसैनिकांनी फाडले