मुंबई - एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरी मुळे राज्यातील सत्ता स्थापनेला वेग आला असून, घडामोडी फार वेगाने होताना दिसत आहेत. मंगळवारी ( 28 जून ) विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडवणीस व भाजप नेत्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर आज ( 29 जून ) राज्यपालांनी बहुमत सिद्ध करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र पाठवलं ( bhagatsingh koshyari sent letter cm uddhav thackeray ) आहे.
एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आल असून, त्यांच्याकडे बहुमत नाही, असं भाजपकडून सांगण्यात आलं आहे. यासाठी भाजप शिष्टमंडळांनं देवेंद्र फडवणीस यांच्या नेतृत्वाखाली काल ( 28 जून ) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर त्यांनी सध्या राज्यातील परिस्थिती त्यांना सांगत महाविकास आघाडी सरकारकडे आता बहुमत नसून ते अल्पमतात आलं असल्याकारणाने तुम्ही बहुमत चाचणी घेण्याचे आदेश द्यावेत, अशी विनंती केली होती. त्याअनुषंगाने आज ( 29 जून ) राज्यपालांनी बहुमत सिद्ध करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवले असल्याची माहिती समोर आली आहे. परंतु, या बहुमत चाचणीसाठी कुठली तारीख दिली आहे हे अजून स्पष्ट झालेलं नाही आहे.
विशेष अधिवेशन बोलवण्यासाठी काल लिहिलं होतं पत्र - सध्याची राजकीय परिस्थिती पाहता मंगळवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी विधानभवन सचिवांना पत्र पाठवलं होत. तसं एक पत्र प्रसारमाध्यमांमध्ये व्हायरल झालं होतं. त्याबाबत खुलासा करताना राजभवनाकडून सांगण्यात आलं होतं की, ते पत्र बनावट आहे. मात्र, आता राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना बहुमत चाचणीसाठी पत्र पाठवल्याची माहिती समोर आली आहे.
हेही वाचा - Rebel Shivsena Leader Eknath Shinde : उद्या मुंबईला परतणार, बहुमत सिद्ध करणार-एकनाथ शिंदे