ETV Bharat / city

Maharashtra Political Crisis : भाजपाला हिंदुत्वासाठी भागीदार नको म्हणून हे सर्व कारस्थान - उद्धव ठाकरे

Maharashtra political update
Maharashtra political update
author img

By

Published : Jun 24, 2022, 6:25 AM IST

Updated : Jun 24, 2022, 10:48 PM IST

22:37 June 24

नगरसेवकांच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचे संबोधन

  • भाजपाला हिंदुत्वासाठी भागीदार नको म्हणून हे सर्व कारस्थान
  • शिवसेना ठाकरे परिवाराची खासगी मालमत्ता नाही

22:22 June 24

  • आपल्याच लोकांनी पाठीत खंजीर खुपसला
  • कोण त्रास देतं ते बघू असं मी शिंदेंना सांगितलं

20:46 June 24

  • शिवसेनेच्या बंडखोर आमदारांच्या बैठकीत उपसभापती नरहरी झिरवाळ यांची हकालपट्टी करण्याचा ठराव घेण्याचे नियोजन केले आहे. बंडखोर गटाच्या ४६ आमदारांच्या सह्या घेऊन प्रस्तावाच्या तयारीसाठी कार्यवाही सुरू

20:23 June 24

दोन तासानंतर शरद पवार मातोश्रीबाहेर

19:43 June 24

  • #WATCH | Shiv Sena MP Sanjay Raut arrives at Matoshree (Thackeray residence) in Mumbai.

    Amid political turmoil in the state, a meeting between CM Uddhav Thackeray and NCP leaders, including party chief Sharad Pawar, is underway at Matoshree pic.twitter.com/kh9zRtDMux

    — ANI (@ANI) June 24, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
  • संजय राऊत मातोश्रीवर दाखल

19:34 June 24

सातारा - शिवसेना अंगार है, बाकी सब भंगार है. गद्दार है.. गद्दार है... एकनाथ शिंदे गद्दार है, अशी घोषणाबाजी करत कराडमधील शिवसैनिकांनी दुपारी पुणे-बंगळुरू महामार्गावरील कोल्हापूर नाक्यावर एकनाथ शिंदेंच्या समर्थनार्थ लावण्यात आलेला बॅनर उतरवले.

19:18 June 24

  • मातोश्रीसमोर शिवसैनिकांची मोठी गर्दी

18:43 June 24

  • राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्याचे कॅबिनेट मंत्री जयंत पाटील आणि पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल यांचे मुंबईतील मातोश्रीवर दाखल

18:38 June 24

महाराष्ट्रातील सर्व पोलीस ठाण्यांना विशेषत: मुंबईतील पोलीस ठाण्यांना हाय अलर्टवर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शिवसैनिक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरू शकतात, अशी माहिती पोलिसांना मिळाली. शांतता नांदावी यासाठी पोलिसांना सतर्क राहण्यास सांगितले आहे.

18:32 June 24

  • थोड्याच वेळात उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात बैठक, अजित पवार ही राहणार उपस्थित

17:49 June 24

मुंबईत शिवसैनिक आक्रमक; कुर्ला येथील आमदार मंगेश कुडाळकर यांचे कार्यालय फोडले

उद्धव ठाकरे यांच्या शिवसैनिकांना केलेल्या आवाहनानंतर शिवसैनिक आक्रमक

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेल्या भावनिक आवाहनाचा परिणाम

शिवसैनिक, शाखाप्रमुख झाले आक्रमक

मुंबईत जागोजागी शिवसैनिक आक्रमक

कुर्ला येथील आमदार मंगेश कुडाळकर यांचे कार्यालय फोडले

17:27 June 24

महाविकास आघाडी सरकार पडणार आहे, हे लक्षात येतात आघाडी सरकारने दोन दिवसात 106 निर्णय घेतले आहेत. यातून मोठ्या प्रमाणात निधी वळवण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातो आहे. मात्र, या आरोपाचे खंडन उपमुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री अजित पवार यांनी केले आहे.

15:56 June 24

  • आमचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पूर्ण पाठिंबा
  • आज 6 वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांची भेट

15:41 June 24

महाराष्ट्रातील सामान्य जनता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि एमव्हीए सरकारच्या पाठीशी आहे. आपण एकत्र आहोत असे शरद पवार म्हणाले. MVA सरकार मोडणे अशक्य आहे. मी मोदी सरकारला सांगू इच्छितो की महाराष्ट्र दिल्लीपुढे कधीही झुकणार नाही आणि शेवटपर्यंत लढेल, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी दिली आहे.

15:40 June 24

  • Maharashtra Shiv Sena MLA Dilip Lande today joined the other rebel MLAs who are camping at Radisson Blu hotel in Guwahati. Shinde is not seen here in the photo as reported earlier. He is staying at the hotel with other rebel MLAs from Maharashtra.

  • शिवसेनेचे आमदार दिलीप लांडे आज गुवाहाटी येथील रॅडिसन ब्लू हॉटेलमध्ये तळ ठोकून असलेल्या इतर बंडखोर आमदारांमध्ये सामील झाले आहेत. आधी कळवल्याप्रमाणे शिंदे इथे फोटोत दिसत नाहीत. महाराष्ट्रातील अन्य बंडखोर आमदारांसोबत ते हॉटेलमध्ये थांबले आहेत.

14:20 June 24

  • Assam BJP MLA Taranga Gogoi arrives at Radisson Blu Hotel in Guwahati. Rebel Maharashtra MLAs are staying at the hotel. pic.twitter.com/dq36opRY5P

  • आसाममधील भाजपाचे आमदार तरंगा गोगोई रेडिसन ब्लू हॉटेलमध्ये

14:16 June 24

विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळसुद्धा नॉटरिचेबल

मुंबई- विधानसभा नरहरी झिरवळ यांनी रात्रीच पोलीस संरक्षण सोडले आहे. झिरवळ का झाले नॉटरिचेबल? काय आहे महाविकासआघाडीची खेळी? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

14:05 June 24

गुवाहाटीतील बंडखोर आमदारांचा फोटो आला समोर, ३८ शिवसेना आमदारांचा पाठिंबा असल्याचा एकनाथ शिंदेंचा दावा

गुवाहाटी- बंडखोर शिवसेना आमदार एकनाथ शिंदे यांनी ३८ शिवसेना आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला आहे. गुवाहाटीतील हॉटेलमधील या आमदारांचा फोटो समोर आला आहे.

14:01 June 24

एकनाथ शिंदे सुरतला रवाना?

मुंबई- महाराष्ट्राच्या राजकारणात भुकंप घडवणारे शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी रातोरात शिवसेनेचे अनेक बंडखोर आमदार घेऊन सुरतला निघाले होते. मात्र ही सर्व घडामोड होत असल्याची माहिती संबंधित मंत्र्यांच्या अंगरक्षकांनी कंट्रोल रूमला दिल्या होती अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे गृहविभागवर गृहमंत्र्यांचे पकड नाही का असा प्रश्न उपस्थित होत आहे. :

13:48 June 24

एकनाथ शिंदे यांच्या पोस्टरवर शिवसैनिकांनी फेकली शाई

  • #WATCH Shiv Sena supporters throw black ink and eggs at a poster showing a picture of rebel MLA Eknath Shinde, also raise slogans against him, in Nashik pic.twitter.com/DUtKE2R2S5

नाशिकमध्ये शिवसेना समर्थकांनी बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांचे छायाचित्र असलेल्या पोस्टरवर काळी शाई आणि अंडी फेकली, त्यांच्याविरोधात घोषणाबाजीही केली.

13:39 June 24

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सुटीसाठी आसामला यावे

शिवसेना प्रमुख, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सुटीसाठी आसामला यायला हवे, असा टोला आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांना मारला आहे. महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर त्यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना हा सल्ला दिला आहे.

13:35 June 24

आदित्य ठाकरे शिवसेना भवनात दाखल

शिवसेना नेते आदित्य ठाकरे शिवसेना भवनावर पोहोचले आहेत. या ठिकाणी ते शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांच्या बैठकीत मार्गदर्शन करणार आहेत.

13:30 June 24

एकनाथ शिंदे यांची बंडखोरी ही शिवसेनेची अंतर्गत बाब - दानवे

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी केलेली बंडखोरी ही शिवसेनेची पक्षांतर्गत बाब आहे. कोणत्याही केंद्रीय मंत्र्यांकडून कोणावरही दबाव टाकला जात नाही. त्यांच्या अंतर्गत प्रश्नत आम्ही दखल देण्याचा प्रश्नच नाही, असे केंद्रीय रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे यांनी म्हटले आहे.

13:02 June 24

शिवसेनेचे चांदीवली विधानसभा मतदारसंघाचे आमदार दिलीप लांडे यांच्याशी संपर्क तुटला

शिवसेनेचे चांदीवली विधानसभा मतदारसंघाचे आमदार दिलीप लांडे यांच्याशी संपर्क तुटला आहे. लांडे बंडखोर एकनाथ शिंदे गटात सामील होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच सकाळपासून गुहागर विधानसभा मतदारसंघाचे आमदार भास्कर जाधव देखील सकाळ पासून नॉट रीचेबल आहेत. त्यामुळे आज जाधव, लांडे शिंदे गटात सामील झाल्यास बंडखोरांच्या संख्येत वाढ होऊ शकते.

12:37 June 24

गुवाहटी तातडीने सोडा, आसाम काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा शिंदेंना इशारा

  • Assam Congress chief Bhupen Kumar Borah writes to rebel Maharashtra Shiv Sena MLA Eknath Shinde and asks him to leave Assam at the earliest "in the interest of the state" pic.twitter.com/OajA322m6M

आसाम काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांना तातडीने आसाम सोडण्याचा इशारा दिला आहे. आमच्या आसामच्या हितासाठी शिंदे व अन्य आमदारांनी तातडीने आसाम सोडावे असे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे गुजरातनंतर आता शिंदे गटाला आसामही सोडावे लागणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

12:34 June 24

ठाकरे सरकारने काढले फक्त 48 तासात तब्बल 160 जीआर,

राज्यातली अस्थिर राजकीय परिस्थिती पाहून राज्य सरकार अंधाधुंद निर्णय घेत आहे. ठाकरे सरकारने काढले फक्त 48 तासात तब्बल 160 जीआर काढले आहेत. राज्याच्या हिताच्या दृष्यीने हे योग्य होणार नाही. त्यामुळे तातडीने सर्व कारभार हाती घ्यावी, असे पत्र भारतीय जनता पार्टीने राज्यपालांना दिले आहे. भाजप नेते प्रविण दरेकर यांनी हे पत्र दिले आहे.

12:28 June 24

अस्थिर परिस्थिती पाहता सरकारकडून अंधाधुंद निर्णय, भाजपाचं राज्यपालांना पत्र

राज्यातली अस्थिर राजकीय परिस्थिती पाहून राज्य सरकार अंधाधुंद निर्णय घेत आहे. राज्याच्या हिताच्या दृष्यीने हे योग्य होणार नाही. त्यामुळे तातडीने सर्व कारभार हाती घ्यावी, असे पत्र भारतीय जनता पार्टीने राज्यपालांना दिले आहे. भाजप नेते प्रविण दरेकर यांनी हे पत्र दिले आहे.

12:23 June 24

उद्धव ठाकरे घेणार थोड्याच वेळात बैठक

शिवसेना प्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे थोड्याच वेळात शिवसेना आमदार, जिल्हा प्रमुखांची बैठक घेणार आहेत. शिवसेना भवनात ही बैठक होणार आहे. आमदार कैलास पाटील, अंबादास दानवे, नितीन देशमुख या बैठकीसाठी रवाना झाले आहेत.

12:16 June 24

पुढची अडीच वर्षेही ठाकरे सरकारचीच - राऊत

यापुढील अडीच वर्षेही ठाकरे सरकारचीच असणार आहेत, असा ठाम विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. वाय. बी. चव्हाण सेंटरमधील बैठक संपल्यानंतर पत्रकारांशी ते बोलत होते. यापुढील सर्व सुत्रे शरद पवार यांच्याकडे सोपविली असल्याची माहिती त्यांनी दिली.

12:08 June 24

शिंदेचे बंड मोडण्यासाठी शरद पवार ठाकरेंच्या मदतीला

एकनाथ शिंदे यांचे बंड मोडून काढण्यासाठी आता शरद पवार मैदानात उतरले आहेत. ठाकरे यांचे सरकार वाचविण्यासाठी शरद पवार, संजय राऊत, देसाई यांच्यात बैठक सुरू आहे.

12:03 June 24

अजय चौधरी गटनेते, सुनील प्रभू यांच्या प्रतोद पदास मान्यता, शिंदेंना धक्का

एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेन त्यांना गटनेते पदावरून काढून अजय चौधरी यांची गटनेते पदावर नियुक्ती केली होती. तर सुनील प्रभू यांना प्रतोद म्हणून नियुक्ती देण्यासंदर्भात विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे विनंती केली होती. आज या दोघांच्या नियुक्तीला झिरवळ यांनी मान्यता दिली आहे. शिंदे गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे.

प्रतोद

नरहरी झिरवळ

11:56 June 24

एकनाथ शिंदे गटाची बैठक थोड्याच वेळात, राज्यपालांकडे पत्र पाठविण्याची शक्यता

शिवसेनेमधून बंडखोरी करीत उद्धव ठाकरेंनाच आव्हान देणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्यासोबत सुमारे 50 आमदार गुवाहटीमधील हॉटेलमध्ये थांबलेले आहेत. या सर्व आमदारांची थोड्याच वेळात बैठक सुरू होणार आहे. या बैठकीत चर्चा करून राज्यपालांकडे अधिकृत पत्र पाठविले जाण्याची शक्यता राजकीय सूत्रांनी वर्तविली आहे.

11:44 June 24

देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्यावर भाजप नेत्यांची खलबतं

देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यांवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. भाजप नेते आशिष शेलार, गिरीश महाजन, प्रवीण दरेकर, अतुल सावे यांच्यासह अन्य भाजप नेते या ठिकाणी उपस्थित आहेत. विद्यमान राजकीय परिस्थितीवर त्यांच्यात चर्चा सुरू आहे.

11:37 June 24

शिवसेनेची कायदेतज्ज्ञांची टीम विधानभवनात दाखल, भाजपचीही खलबतं सुरू

शिवसेनेची कायदेतज्ज्ञांची टीम विधानभवनात दाखल झाली आहे. काल शिवसेनेने बंडखोर 12 आमदारांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यासंदर्भात पुढे काय कार्यवाही होत आहे याची चर्चा करण्यासाठी ही कायदेतज्ज्ञांची टीम गेली आहे. दरम्यान, भारतीय जनता पार्टीच्या नेतेही विद्यमान परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी फडणविसांच्या सागर बंगल्यावर जमले आहेत.

11:26 June 24

बंडखोर शिंदे गटाच्या अडचणी वाढल्या, ३४ आमदार ठरणार अपात्र, शिवसेना कायदेशीर कारवाईच्या तयारीत

मुंबई - महाविकास आघाडीतील शिवसेना या प्रमुख पक्षाच्या आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत बंडखोरी केली आहे. ठाकरे सरकार धोक्यात आले असून शिंदे गट शिवसेनेला मोठा धक्का देण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र, त्यापूर्वीच शिंदे गटाच्या ३४ आमदारांना अपात्र ठरविण्याची रणनिती शिवसेनेने आखली आहे. दरम्यान, आधीच १२ आमदारांवर विधानसभा उपाध्यक्ष नगहरी झिरवळ कारवाईची शक्यता वर्तवली जात आहे.

11:12 June 24

संजय राऊत शरद पवार यांच्यात चर्चा सुरू

मुंबईतील वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्यामध्ये चर्चा सुरू झाली आहे. विद्यमान राजकीय घडामोडींवर त्यांच्या चर्चा सुरू आहे. बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्याकडे किती आमदार गेले आहेत, किती संख्याबळ त्यांच्याकडे आहे यावर या दोन्ही नेत्यात खलबत सुरू आहे.

10:56 June 24

गुवाहटीचे ते हॉटेल आठवडाभरासाठी झाले बुक

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेले सुमारे 50 आमदार गुवाहटीच्या हॉटेल रेदिसन ब्ल्यू मध्ये थांबलेले आहेत. राज्यासहित देशाच्या राजकारणाचे सध्या ते केंद्रबिंदू झाले आहे. दरम्यान, हॉटेल रेदिसन ब्ल्यू हे पुढच्या आठवडाभरासाठी पूर्णतः बुक झाल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे आगामी आठवड्यात या हॉटेलमध्ये कोणालाही जागा मिळणार नाही.

10:47 June 24

शरद पवार, संजय राऊत यांना जरा जास्तच अभिव्यक्ती स्वातंत्र्य, सतत बोलत असतात - चंद्रकांत पाटील

शरद पवार, संजय राऊत यांना जरा जास्तच अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. त्यामुळे सतत बोलत असतात, असे वक्तव्य भाजप प्रदेशाध्य चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. राऊत तर सकाळी एक दुपारी दुसरेच बोलत असतात, असे सांगत चंद्रकांत पाटील यांनी राज्यात सुरू असलेल्या राजकीय घडामोडींशी भाजपचा संबंध नाही, असे म्हटले आहे. भाजप नेते हे तीन दिवस कार्यकर्त्यांच्या कामांसाठी दिल्लीत गेले, असेही त्यांनी सांगितले.

10:39 June 24

बिजवडीचे शिवसेना उपजिल्हाप्रमुख संजय भोसले गुवाहाटी पोलिसांच्या ताब्यात

बिजवडी (ता माण) येथील शिवसेना उपजिल्हाप्रमुख संजय भोसले गुवाहाटी पोलिसांच्या ताब्यात घेतले आहे. उद्धव ठाकरे यांच्याकडे परत या, असे एकनाथ शिंदेंना सांगण्यासाठी ते हॉटेल रेदिसन ब्लूमध्ये गेले होते.

10:20 June 24

शिंदे गटाकडून अद्याप कोणताही प्रस्ताव नाही - चंद्रकांत पाटील

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून आम्हाला अद्याप कोणताही प्रस्ताव आलेला नाही, असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी म्हटलं आहे. प्रस्ताव आल्यावर आम्ही त्यावर विचार करू असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

10:09 June 24

गरज पडल्यास शिवसैनिक रस्त्यावर उतरतील - राऊत यांचा इशारा

शिवसेनेचे कार्यकर्ते अजून रस्त्यावर आलेले नाहीत हे एकनाथ शिंदे गटाला आव्हान देणाऱ्यांनी लक्षात घ्यायला हवे. अशा लढाया कायद्याने किंवा रस्त्यावर लढल्या जातात. गरज पडली तर आमचे कार्यकर्ते रस्त्यावर येतील : शिवसेना नेते संजय राऊत

10:03 June 24

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या प्रकृतीत सुधारणा, कोरोनाची झाली होती लागण

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे.

09:56 June 24

एकनाथ शिंदे कॅम्पमधील आमदारांची संख्या आज पन्नाशी पार होण्याची शक्यता

महाराष्ट्रातील राजकीय संकट: एकनाथ शिंदे कॅम्पमधील आमदारांची संख्या आज पन्नाशी पार करण्याची शक्यता आहे.

09:54 June 24

उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ आर्णीत शिवसैनिकांची रस्त्यावर घोषणाबाजी

आर्णी : राज्यातील राजकारणात भूकंप झाल्याने एकाएकी पडलेल्या शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ आर्णीतील शिवसैनिकांनी गुरुवारी रस्त्यावर एकत्र येत घोषणाबाजी केली. सोबतच पक्षाशी गद्दारी करणाऱ्या आमदार व खासदारांचा निषेध करण्यात आला.

09:41 June 24

शरद पवारांना धमकी देण्याइतका काही नेत्यांचा माज वाढला

मुंबई- आमदार मुंबईत आल्यानंतर त्यांच्या निष्ठेची कसोटी लागणार आहे. शरद पवारांना धमक्या देण्याइतका माज काही नेत्यांचा वाढला आहे. त्यांचा विचार पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना करावा लागणार आहे.

09:31 June 24

एकनाथ शिंदे यांची गुवाहाटीत आज बैठक, काय होणार निर्णय

मुंबई- एकनाथ शिंदे यांची गुवाहाटीत आज बैठक होणार आहे. या बैठकीत काय निर्णय आहे, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. या बैठकीत आमदारांच्या सह्या घेऊन राज्यपालांना पत्र पाठविले जाण्याची शक्यता आहे.

09:24 June 24

या प्रकरणात भाजपची कोणतीही भूमिका नसल्याचे एकनाथ शिंदे यांचा दावा

मुंबई- शिवसेनेचे ३७ आमदार आपल्यासोबत आहेत. या प्रकरणात भाजची कोणतीही भूमिका नसल्याचा दावा शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी एका माध्यमाबरोबर बोलताना सांगितले.

09:14 June 24

एकनाथ शिंदे गटातील शिवसेना आमदारांची संख्या 50 च्या पुढे जाण्याची शक्यता

एकनाथ शिंदे गटातील शिवसेना आमदारांचे संख्याबळ 50 च्या पुढे जाण्याची शक्यता. कारण आज आणखी काही आमदार गुवाहाटीमध्ये पोहचण्याची शक्यता आहे.

09:09 June 24

सत्तेसाठी भाजपचे खलबत? भाजप नेते देवेंद्र फडणवीस कालपासून दिल्लीत

भाजप नेते देवेंद्र फडणवीस कालपासून दिल्लीत.

09:06 June 24

एकनाथ शिंदे गटाची थोड्याच वेळात गुवाहाटीत बैठक

एकनाथ शिंदे गटाची थोड्याच वेळात गुवाहाटीत बैठक. पुढील रणनीती ठरवण्यासाठी ही बैठक होणार असल्याची माहिती.

09:03 June 24

शरद पवाराच्या इशाऱ्याला घाबरत नाही - एकनाथ शिंदे

शरद पवाराच्या इशाऱ्याला घाबरत नाही, एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया

08:43 June 24

आमदार दिलीप लांडे नॉट रिचेबल

मुंबई - चांदिवलीचे आमदार दिलीप लांडे नॉट रिचेबल आहेत. त्यामुळे ते एकनाथ शिंदे गटात सहभागी झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

08:20 June 24

राजकीय उलथापालथ होत असताना देवेंद्र फडणवीस कोठे आहेत?

मुंबई- शिवसेनेच्या आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी लगेचच दिल्ली गाठली होती. तर चंद्रकांत पाटील यांनी सुरत गाठले होते. त्यानंतर फडणवीस पुन्हा मुंबईत आले. दोन दिवस येथील नेत्यांसोबत बैठका घेतली. पुन्हा दिल्लीत मोदी व शाह यांच्यात तब्बल अडीच तास चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. गुरुवारपासून फडणवीस दिल्लीत ठाण मांडून आहेत.

08:17 June 24

सकाळी मातोश्री आमचं मंदिर बोलले सायंकाळी गुवाहाटीकडे; एकनाथ शिंदे यांचा निरोप येताच क्षीरसागर रवाना

राजेश क्षीरसागर
राजेश क्षीरसागर

कोल्हापूर - एकनाथ शिंदे यांना आमदारांबरोबर आता खासदारांचा सुद्धा पाठिंबा मिळत आहे. अशातच आता माजी आमदारांना सुद्धा आता गुवाहाटी ला बोलविण्यात आले आहे. कोल्हापूरचे उत्तर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार तसेच राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर हे सुद्धा गुवाहाटी येथे रवाना झाले आहेत.

08:00 June 24

चार्टड विमानाने १७ गेले परराज्यात, पहा त्यांची यादी

चार्टड विमानांची तिकीटे
चार्टड विमानांची तिकीटे

मुंबई- एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील होण्यासाठी खासगी चार्टड विमाने आमदार रवाना झाली आहेत. त्यांची नावे व बुकिंग माहिती समोर आली आहेत.

07:55 June 24

खासगी चार्टड विमानाने १७ आमदार गेले परराज्यात, विमान बुकिंगची यादीच पहा

चार्टड विमानांची तिकीटे
चार्टड विमानांची तिकीटे

मुंबई- शिवसेना नेत्यांची पळवापळवी करण्यासाठी त्यांना खासगी चार्टड विमानाने नेण्यात आली आहेत. गुवाहाटीत गेलेल्या आमदारांची नावे व बुकिंग पहा.

07:46 June 24

मातोश्रीवर शिवसेनेच्या सर्व जिल्हा प्रमुख आणि संपर्क प्रमुखांची आज दुपारी होणार बैठक

मुंबई - शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या राज्यातील सर्व जिल्हा संपर्क प्रमुख आणि जिल्हा प्रमुखांची महत्वाची बैठक आज दुपारी १२ वाजता शिवसेना भवनात होणार आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेकडून संघटनेत मोठ्या हालचाली सुरू आहेत.

07:38 June 24

आमदारांनी उद्धवजींना वेळ मागूनही ते भेटले नाहीत- आमदार संजय शिरसाट

  • Many times in the past MLAs informed Uddhav ji that whether it is Congress or NCP, both are trying to eliminate Shiv Sena. Numerous times the MLAs sought time from Uddhav ji to meet him but he never met them: Rebel Shiv Sena MLA Sanjay Shirsat in Guwahati pic.twitter.com/p0U37Mi3uU

मुंबई- काँग्रेस असो वा राष्ट्रवादी, दोघेही शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी माहिती यापूर्वी अनेकदा आमदारांनी उद्धवजींना दिली आहे. अनेकवेळा आमदारांनी उद्धवजींना भेटण्यासाठी वेळ मागितला. पण ते त्यांना भेटलेच नाहीत, असे शिवसेनेचे बंडखोर आमदार संजय शिरसाट यांनी गुवाहाटीमध्ये सांगितले.

07:25 June 24

गुहागरचे आमदार भास्कर जाधव नॉट रिचेबल

मुंबई- गुहागरचे आमदार भास्कर जाधव नॉट रिचेबल आहेत. त्यामुळे ते एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

06:58 June 24

अपक्ष उमेदवार किशोर जोरगेवार आणि गीता जैन गुवाहाटीत पोहोचले!

मुंबई - अपक्ष उमेदवार किशोर जोरगेवार आणि गीता जैन गुवाहाटीतील रॅडीसन ब्ल्यू हॉटेलमध्ये पोहोचले आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे यांना पाठिंबा असलेल्या उमेदवारांची संख्या ३९ झाली आहे.

06:47 June 24

यांना कोल्हापूरात थारा नाही, म्हणत शिवसैनिकांनी एकनाथ शिंदे यांचे काढले पोस्टर

कोल्हापूरमधील लावलेले फलक
कोल्हापूरमधील लावलेले फलक

कोल्हापूर - कोल्हापूरात एकनाथ शिंदे यांच्या अभिनंदनाचे फलक लावण्यात आले होते. पण आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी ते तत्काळ काढायला लावले. शिवसेनेशी गद्दारी करणाऱ्या व्यक्तीला थारा नाही म्हणत एकनाथ शिंदे यांच्या अभिनंदनाचा फलक काढायला संबंधित जाहिरात कंपनीला भाग पाडले. शहरातील विविध ठिकाणी काही पोस्टर लावण्यात आले आहेत. हे पोस्टर मात्र कोणी लावले होते हे अध्याप स्पष्ट झाले नाहीये मात्र लावण्यात आलेली फलक मात्र काढण्यात आले.

06:31 June 24

आदित्य ठाकरे हे मध्यरात्री मातोश्रीमधून पडले बाहेर

  • #WATCH | Maharashtra: State Minister Aaditya Thackeray came out of Matoshree, the family residence of CM Uddhav Thackeray in Mumbai, at midnight to interact with the media pic.twitter.com/d1jUVo5tm8

मुंबई- पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे मध्यरात्री मातोश्रीमधून बाहेर पडले. यावेळी त्यांनी माध्यमांशी चर्चा केली.

06:18 June 24

Maharashtra Political Crisis

मुंबई -राज्यात महाविकास आघाडी सरकार अल्पमतात येत असताना मोठ्या घडामोडी घडत आहे. शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांची गटनेतापदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यावर एकनाथ शिंदे यांनी आपणच गटनेता असल्याचे पत्र राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना लिहिले आहे. मात्र, कायद्यात पक्षप्रमुखाने गटनेता नेमायचा असतो, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. एकनाथ शिंदे यांनी हकालपट्टी झाल्यानंतर आपणच गटनेता असल्याचा दावा केला होता. त्यावर नरहरी झिरवळ यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. माझ्याकडे आलेली यादी संशयास्पद असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्रातील सत्तास्थापनेत आता कायदेशीर अडचणी निर्माण होऊ लागल्या आहेत. त्यामुळे सत्ता स्थापनेचा मुहूर्त लांबण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आपल्याकडे आलेली यादी संशयास्पद असल्याचे विधानसभा उपाध्यक्ष यांनी सांगितले आहे. गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या महाराष्ट्रातील सत्ता नाट्यात आता नवीन पैलू समोर आला आहे. शिवसेनेचे गटनेते एकनाथ शिंदे यांची हकालपट्टी करत त्यांच्या जागी अजय चौधरी यांची शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नियुक्ती केली आहे. तर प्रपोजपदी सुनील प्रभू कायम आहेत. दरम्यान शिंदे यांच्या गटाने आपणच खरी शिवसेना असल्याचे सांगत शिवसेना पक्षाचे प्रत्येक म्हणून भरत गोगावले यांचे नाव सुचवले आहे त्यांच्यासोबत 34 आमदारांची यादी पाठवली आहे.

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांनी पुकारलेल्या बंडाच्या मागे भारतीय जनता पक्षाचे फूस असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ( Sharad Pawar ) यांनी केला आहे. गुजरात आणि आसाममध्ये कोणाची सत्ता आहे? असा प्रश्न उपस्थित करून एकनाथ शिंदे जे करत आहेत, यामागे भारतीय जनता पक्ष असल्याचा दाखला शरद पवार यांनी दिला. गुजरातमधील भारतीय जनता पक्षाचे नेते आपल्या परिचयाचे आहेत. ते नेते बंडखोर आमदार थांबलेल्या हॉटेलमध्ये काय करत होते? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.

पक्ष संघटनेच्या बैठकीला उपस्थित न राहिल्यामुळे आमच्या बारा आमदारांच विधानसभा सदस्यत्व रद्द करा, अशी मागणी शिवसेने विधानसभेच्या प्रभारी अध्यक्षांकडे केली असल्याची माहिती शिवसेना नेते अरविंद सावंद यांनी दिली आहे.

या 12 आमदारांची नावे - एकनाथ शिंदे, तानाजी सावंत, संदीपान भुमरे, संजय शिरसाठ, अब्दुल सत्तार, भरत गोगावले, प्रकाश सुर्वे, अनिल बाबर, बालाजी किनीकर, यामिनी जाधव, लता सोनावणे महेश शिंदे, पक्षाच्या प्रतोदांनी सांगून सुद्धा हे सर्व बैठकीसाठी उपस्थित न राहिल्याने ही कारवाई करण्यात यावी, अशी शिवसेनेनी केली आहे. हे पत्र आम्ही कायदेशीर तरतुदींनुसारच सर्व चाचपणी करून मगच विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे दिले असल्याचे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) यांनी भावनिक आवाहन करुनही शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Uddhav Thackeray) माघारी येण्यास तयार नाहीत. हे पाहून मुख्यमंत्र्यांनी शासकीय निवासस्थान 'वर्षा' बंगला सोडण्याचा निर्णय घेतला आहे. उद्धव ठाकरे यांनी वर्षा बंगला सोडतावेळी हजारो शिवसैनिक बंगल्याबाहेर जमले होते. यावेळी कट्टर शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे यांच्या नावाच्या गगनभेदी घोषणा देऊन शिवसैनिक पक्षनेतृत्वाच्या पाठीमागे खंबीरपणे उभा असल्याचं दाखवून दिले आहे. त्यांना याबाबत आपल्या फेसबूक लाईव्हमध्ये पूर्वीच सुचना दिली होती.

शिवसेनेतील निम्म्यापेक्षा अधिक आमदार बाहेर पडले आहेत. मात्र, शिवसेनेत गद्दारांना क्षमा नाही असे म्हणणारा शिवसैनिक अजूनही का शांत आहे. शिवसैनिक संभ्रमित आहे की आदेशाची वाट पाहतोय..शिवसेनेतील एकनाथ शिंदे सुमारे सदतीस आमदारांना घेऊन बाहेर पडले आहेत. भाजप सोबत जाण्यासाठी पक्ष नेतृत्वावर दबाव आणला जातो आहे. महाविकासआघाडी तून बाहेर पडावे असा सातत्याने दबाव पक्षावर आणला जातो आहेच. मात्र शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर कोणत्याही नेत्याला शिवसेनेने सहज सोडले नाही, असे राजकीय विश्लेषक सांगतात.

Last Updated : Jun 24, 2022, 10:48 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.