ETV Bharat / city

MLC Election Candidate : सर्व पक्षांकडून विधान परिषदेचे उमेदवार जाहीर, जाणून घ्या कोण कोण लढणार - शिवसेना विधान परिषद उमेदवार

10 जूनला राज्यसभा निवडणूक संपताच 20 जूनला विधान परिषदेसाठी निवडणूक होणार आहे. विधान परिषदेच्या दहा आमदारांचा कार्यकाळ संपल्यामुळे दहा जागांसाठी ( Maharashtra Legislative Council elections ) ही निवडणूक होणार आहे. मुख्य पक्षांनी आपले उमेदवार जाहीर केले ( MLC Election Candidate ) आहे.

MLC Election Candidate
विधान परिषदेचे उमेदवार जाहीर
author img

By

Published : Jun 8, 2022, 5:57 PM IST

मुंबई - राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीची राज्यात रणधुमाळी सुरू आहे. 10 जूनला राज्यसभा निवडणूक संपताच 20 जूनला विधान परिषदेसाठी निवडणूक होणार आहे. विधान परिषदेच्या दहा आमदारांचा कार्यकाळ संपल्यामुळे दहा जागांसाठी ( Maharashtra Legislative Council elections ) ही निवडणूक होणार आहे. भाजपाने पाच उमेदवार हे जाहीर केले आहेत. तर कॉंग्रेसने, शिवसेनेने प्रत्येकी दोन उमेदवार जाहीर केले आहेत. नेमके कोणत्या पक्षाकडून कोण विधान परिषद निवडणूक लढणार आहे. याबाबत जाणून घेऊया सविस्तर -

भाजपाकडून पाच जणांची नावे -

  1. प्रवीण दरेकर,
  2. प्रसाद लाड
  3. राम शिंदे
  4. श्रीकांत भारतीय
  5. उमा खापरे

शिवसेना -

विधान परिषदेसाठी शिवसेनेने दोन नावे जाहीर केली आहेत.

  1. सचिन अहिर
  2. आमशा पाडवी

कॉंग्रेस -

कॉंग्रेसने विधान परिषदेसाठी दोन उमदेवारांची नावे जाहीर केली आहेत. यामध्ये -

  1. चंद्रकांत हंडुरे
  2. भाई जगताप

असा आहे निवडणुकीचा कार्यक्रम ( MH Legislative Council elections program )

  • अर्ज भरण्याची अंतिम तारीख 9 जून
  • अर्जाची छाननी 10 जून
  • अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख 13 जून
  • मतदान 20 जून, वेळ सकाळी 9 ते सायंकाळी चारपर्यंत
  • मतमोजणी 20 जून सायंकाळी पाच वाजता

असे असणार जिंकून येण्याचे गणित - विधानपरिषदेवर निवडून येण्यासाठी प्रत्येक उमेदवाराला 27 आमदारांच्या मतांची गरज लागणार आहे. त्यानुसार भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या सहकारी आमदारसहीत त्यांचा आकडा 113 एवढा आहे. या संख्याबळानुसार भारतीय जनता पक्षाच्या चार जागा विधान परिषदेवर सहज निवडून जाऊ शकतात. मात्र, भारतीय जनता पक्षाने पाच उमेदवार उभे केल्यामुळे पाचवा जागेसाठी त्यांना आपली सर्व ताकद पणाला लावून पुन्हा एकदा इतर लहान गट किंवा अपक्ष आमदारांना आपल्या गळाला लावावे लागणार आहे.

तर तिथेच शिवसेनेचे 56 राष्ट्रवादी काँग्रेसचे 54 आणि काँग्रेसचे 44 आमदार आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेकडून प्रत्येकी दोन उमेदवार विधान परिषदेत धाडले जातील. तर काँग्रेसकडून एक उमेदवार निश्चित विधान परिषदेत जाईल. मात्र सहाव्या जागेसाठी महाविकास आघाडीला देखील रस्सीखेच करावी लागणार आहे. त्यामुळे विधान परिषदेच्या निवडणुकीतही राज्यसभेच्या निवडणुकीप्रमाणे रणधुमाळी पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

हेही - MH Legislative Council elections : राज्यसभेनंतर विधान परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी, राजकीय पक्षांकडून तयारी सुरू

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.