ETV Bharat / city

MLC History : विधानपरिषद निवडणुकीमध्ये धक्कादायक निकालांची परंपरा; 'या' दिग्गज नेत्यांचा झाला होता पराभव - विधानपरिषद निवडणूक इतिहास

विधान परिषद निवडणूक ( Legislative Council ) उद्या (सोमवार) होणार आहे. या निवडणुकीकरीता शिवसेना ( Shivsena ), काँग्रेस ( Congress ) , राष्ट्रवादी काँग्रेस ( NCP ) महाविकास आघाडी आणि भाजपने ( BJP ) आपले उमेदवार निवडून आणण्यासाठी कंबर कसली आहे.

Legislative Council Election History
Legislative Council Election History
author img

By

Published : Jun 19, 2022, 7:46 PM IST

Updated : Jun 19, 2022, 8:19 PM IST

मुंबई - विधान परिषद निवडणूक ( Legislative Council ) उद्या (सोमवार) होणार आहे. या निवडणुकीकरीता शिवसेना ( Shivsena ), काँग्रेस ( Congress ) , राष्ट्रवादी काँग्रेस ( NCP ) महाविकास आघाडी आणि भाजपने ( BJP ) आपले उमेदवार निवडून आणण्यासाठी कंबर कसली आहे. मात्र, आतापर्यंत महाराष्ट्रातील विधान परिषद निवडणुकीचे निकाल पाहता अनेकदा धक्कादायक निकाल लागले आहेत. या धक्कादायक निकालांची परंपरा ( Tradition Of Defeating Result ) कायम राहणार का असा प्रश्न अनेक जाणकारांना पडला आहे. राज्यसभा किंवा विधान परिषद निवडणूक असो यामध्ये अनेकदा धक्कादायक निकाल समोर आले आहेत या निकालांमध्ये माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख असो किंवा विद्यमान परिवहन मंत्री अनिल परब असो अशा दिग्गजांना पराभव पत्कारावा लागला होता. त्यामुळे या निवडणुकीत देखील ही परंपरा कायम राहणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे.

धक्कादायक निकालांची परंपरा - विधान परिषद निवडणुकीमध्ये माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख हे अवघ्या 0.59 मताने पराभूत झाले होते. त्यांच्या राजकीय कारकीर्दीला मिळालेली कलाटणी, मतांच्या फाटाफुटीमुळे शेकापचे गणपतराव देशमुख यांचा पराभव, विजयी उमेदवारापेक्षा पहिल्या पसंतीची अधिक मते मिळूनही विद्यमान परिवहनमंत्री अनिल परब यांचा झालेला पराभव किंवा पुरेशी मते असतानाही काँग्रेस उमेदवाराचा पराभव अशा विविध निकालांची परंपरा राज्यसभेप्रमाणेच विधान परिषदेतही कायम राहिली आहे.

10 जागांसाठी 11 उमेदवार - विधान परिषदेच्या सोमवारी होणाऱ्या निवडणुकीत 10 जागांसाठी 11 उमेदवार रिंगणात असल्याने चुरस निर्माण झाली आहे. कोण पराभूत होणार याचीच चर्चा रंगली आहे. गेल्याच आठवड्यात सुमारे दोन दशकांनंतर झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकीत शेवटपर्यंत उत्कंठा कायम राहिली. साडेआठ तास विलंबाने सुरू झालेल्या मतमोजणीत भाजपच्या धनंजय महाडिक यांनी दुसऱ्या पसंतीच्या मतांच्या आधारे विजय प्राप्त केला तर शिवसेनेचा उमेदवार पराभूत झाला. यापूर्वी राज्यातील विधान परिषद निवडणुकीतही असेच काही धक्कादायक निकाल लागले आहेत.

विलासरावांचा पराभव अवघ्या 0.59 मताने - 1996 मध्ये 9 जागांसाठी झालेली विधान परिषदेची निवडणूक माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या अपक्ष उमेदवारीमुळे चांगलीच गाजली होती. 1995 मध्ये लातूर मतदारसंघात पराभव झाल्याने विलासरावांनी विधान परिषद निवडणुकीत नशीब अजमाविले. काँग्रेसने उमेदवारी देण्यास नकार दिल्याने विलासरावांनी मातोश्रीचे द्वार ठोठावले होते. शिवसेनेच्या पाठिंब्यावर त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविली होती. तेव्हा छगन भुजबळ, शिवाजीराव देशमुख, रामदास फुटाणे (काँग्रेस), अण्णा डांगे व निशिगंधा मोगल (भाजप), शिशिर शिंदे, रवींद्र मिर्लेकर व प्रकाश देवळे (शिवसेना) हे राजकीय पक्षांचे उमेदवार निवडून आले होते. नवव्या जागेकरिता दोन अपक्ष लालसिंह राठोड आणि विलासराव देशमुख यांच्यात लढत झाली होती. विलासरावांना पहिल्या पसंतीची 19 तर राठोड यांना 20 मते मिळाली होती. पुढील पसंतीक्रमानुसार राठोड यांना 2468 तर विलासरावांना 2409 मते मिळाली. शेवटी सर्व मते मोजून झाल्याने विलासराव हे अवघ्या 0.59 मतांनी पराभूत झाले होते. तेव्हा अर्ध्या मताने पराभूत झाल्याचे विलासरावांना दु:ख झाले होते. विशेष म्हणजे विलासरावांना पराभूत करणारे राठोड हे त्यांचे मित्र होते. विलासराव तेव्हा शिवसेनेच्या पाठिंब्यावर निवडून आले असते तर 1999 मध्ये काँग्रेसने त्यांना मुख्यमंत्रीपदाची संधी दिली नसती.

गणपतराव देशमुखही झाले होते पराभूत - सर्वाधिक 11 वेळा विधानसभेवर निवडून आलेले गणपतराव देशमुख हे 1995 च्या विधानसभा निवडणुकीत पराभूत झाले होते. शेकापने त्यांना 1996 मध्ये विधान परिषदेची उमेदवारी दिली होती. पण पुरोगामी लोकशाही आघाडीची मते फुटल्याने गणपतरावांचा त्या निवडणुकीत पराभव झाला होता. 2010 च्या निवडणुकीत पहिल्या पसंतीची सर्वात कमी मते मिळालेले काँग्रेसचे विजय सावंत हे विजयी झाले होते. भाजपच्या माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांना 24, शिवसेनेचे अनिल परब विद्यमान परिवहनमंत्री 21 तर काँग्रेसचे विजय सावंत यांना 13 मते मिळाली होती. 2619 मतांचा कोटा होता. विजय सावंत यांना काँग्रेस व राष्ट्रवादीच्या पाच उमेदवारांची दुसऱ्या पसंतीची मते मिळाल्याने ते कोटा पूर्ण करू शकले. शेवटी शोभाताई फडणवीस यांना 2415 तर परब यांना 2291 मते मिळाली. म्हणजेच सावंत यांच्यापेक्षा पहिल्या पसंतीची 8 मते अधिक मिळूनही परब पराभूत झाले होते.

काँग्रेसकडे मते असूनही गणगणेंना धक्का - 2008 मध्ये झालेल्या विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसकडे पुरेशी मते असतानाही पक्षाचे उमेदवार सुधाकर गणगणे हे पराभूत झाले होते. पक्षांतर्गत वादातूनच तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना या पराभवातून नेतेमंडळींनी झटका दिला होता. याशिवाय अन्य काही धक्कादायक निकालांची नोंद झाली आहे. ही सगळी धक्कादायक निकालांची परंपरा पाहता यंदा काही धक्कादायक निकाल लागणार का? अशी चर्चा सध्या राजकीय जाणकारांमध्ये रंगली आहे. यंदा विधान परिषदेच्या 10 जागांसाठी 11 उमेदवार उभे आहेत. भाजपने आपला पाचवा अधिकचा उमेदवार उभा केला आहे. त्यामुळे प्रत्यक्ष मतदान घ्यावे लागत आहे. शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडीचे उमेदवार मतांची कोणतीही फाटाफूट न होता निवडून येतील, असा दावा तर आघाडीच्या नेत्यांनी छातीठोकपणे केला आहे. मात्र, राज्यसभेप्रमाणेच भाजप काही नवी खेळी खेळून बाजी मारणार का, याची सर्वांना उत्सुकता आहे.

गुप्त मतदानामुळे उत्सुकता शिगेला - राज्यसभा निवडणुकीवेळी गुप्त पद्धतीने मतदान नव्हते. तरीदेखील भारतीय जनता पार्टीने धनंजय महाडिक यांच्या रुपाने आपला तिसरा उमेदवार निवडून आणत शिवसेनेला धक्का दिला होता. शिवसेनेचे संजय पवार या निवडणुकीत पराभूत झाले होते. यावेळी तर गुप्त पद्धतीने मतदान होणार आहे. त्यामुळे कोणी कोणाला मत दिले हे कोणालाही कळणार नाही. त्यामुळे प्रत्येक पक्ष आपल्या आमदारांना सुरक्षित करण्याचा आटोकाट प्रयत्न करीत आहे. मात्र, अपक्षांचा कल कुठे जाणार हे स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे प्रत्यक्ष मतदानानंतरच हे कळू शकेल. निकालात बाजी कोण मारणार त्यावरच मतांची फाटाफूट झाली अथवा नाही हे स्पष्ट होऊ शकणार आहे.

विधान परिषद निवडणूक उमेदवार

भाजपचे उमेदवार
प्रवीण दरेकर
श्रीकांत भारतीय
राम शिंदे
उमा खापरे
प्रसाद लाड

शिवसेनाचे उमेदवार
सचिन अहिर
आमशा पाडवी

राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार
राम राजे निंबाळकर
एकनाथ खडसे

काँग्रेसचे उमेदवार
भाई जगताप
चंद्रकांत हंडोरे

विधानसभेतील संख्याबळ
शिवसेना - 54
राष्ट्रवादी काँग्रेस -53
काँग्रेस - 44
बहुजन विकास आघाडी - 3
समाजवादी पार्टी - 2
एमआयएम - 2
प्रहार जनशक्ती पक्ष - 2
कम्युनिस्ट पक्ष - 1
स्वाभिमानी शेतकरी संघटना - 1
मनसे - 1
राष्ट्रीय समाज पक्ष - 1
क्रांतीकारी शेतकरी पक्ष - 1
जनसुराज्य शक्ती - 1
शेतकरी कामगार पक्ष - 1
अपक्ष -13
महाविकास आघाडीकडे एकूण 169 आमदार
बहुजन विकास आघाडी 3, समाजवादी पक्ष 2, प्रहार जनशक्ती पक्ष 1, स्वाभिमानी शेतकरी संघटना 1 ,शेकाप 1 ,क्रांतीकारी शेतकरी पक्ष 1, कम्युनिस्ट पक्ष 1 आणि 8 अपक्ष आमदार महाविकास आघाडीसोबत आहेत.

भाजपकडे एकूण 113 आमदार
भाजपबरोबर जनसुराज्य पक्ष 1, राष्ट्रीय समाज पक्ष 1 आणि 5 अपक्ष आमदार आहेत. त्यामुळे भाजपकडे 113 आमदार आहेत.

हेही वाचा - Sanjay Raut : 'तेरा घमंड चार दिन का है पगले, हमारी बादशाही तो खानदानी है'; राऊतांचा भाजपावर निशाणा

Last Updated : Jun 19, 2022, 8:19 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.