मुंबई - महाराष्ट्राच्या शालेय शिक्षण विभागाने राज्यातील कोरोनामुक्त भागातील इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याबाबत मोठा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र शासनाने याबाबत आज(5 जुलै) शासन निर्णय जारी केला आहे.
सविस्तर बातमी वाचा खालील लिंकवर -
School Reopen : कोरोनामुक्त भागातील आठवी ते बारावीचे वर्ग सुरू होणार
मार्गदर्शक सूचना-
- शाळा सुरु झाल्यानंतर टप्प्याटप्याने विद्यार्थ्यांना शाळेत बोलवण्यात येणार आहे. कोरोना संबंधी नियमांचे पालन करावे लागणार आहे. यामध्ये सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर, सॅनिटायझरचा वापर आदीचा समावेश आहे.
- सोशल डिस्टन्सिंग पाळल जावे यासाठी एका बाकावर एकाच विद्यार्थ्याला बसता येणार आहे. दोन बाकांमध्ये सहा फूट अंतर असायला हवे. एका वर्गात जास्तीत जास्त 15 ते 20 विद्यार्थी बसू शकतील. सतत हात साबणाने धुणे, मास्क घालणे हे नियम पाळवे लागणार आहेत.
- कोरोनासंबंधी सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे.
- शाळा सुरू करताना मुलांना टप्प्याटप्प्यात शाळेत बोलविण्यात यावेत. विविध सत्रात वर्ग भरवावेत.
- एका बाकावर एकच विद्यार्थी, दोन बाकांमध्ये ६ फुट अंतर, एका वर्गात जास्तीत जास्त १५-२० विद्यार्थी, सतत हात साबणाने धुणे, मास्कचा वापर, कोणतेही लक्षण असल्यास विद्यार्थ्यांना घरी पाठविणे व लगेच कोरोना चाचणी करून घेणे.
- संबंधीत शाळेतील शिक्षकांची राहण्याची व्यवस्था शक्यतो त्याच गावात करण्यात यावी, किंवा त्यांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर न करण्याबाबत दक्षता घ्यावी.
- संबंधित शाळेतील शिक्षकाची राहण्याची व्यवस्था शक्यतो त्याच गावात करण्यात यावी किंवा त्यांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करू नये.
- शाळा सुरू करण्यापूर्वी किंवा शाळा सुरू झाल्यानंतर आरोग्य, स्वच्छताविषयक SOP चे पालन करावे.