ETV Bharat / city

MPSC Recruitment : १५ हजार ५११ पदांच्या भरतीला शासनाची मान्यता; जुलै अखेरपर्यंत प्रक्रिया होणार पूर्ण - एमपीएससी रिक्त पदे भरती

गट अ ते क पर्यंतची एकूण 15 हजार 511 पदे भरण्याच्या हालचाली राज्य शासनाने सुरू केल्या आहेत. त्यानुसार सर्व पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत लवकरच भरली जातील.

mpsc
मंत्रालय
author img

By

Published : Jul 14, 2021, 5:33 PM IST

मुंबई - राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग आदी विभागांना पदभरतीच्या निर्बंधांमधून सूट दिली आहे. त्यामुळे गट अ ते क पर्यंतची एकूण 15 हजार 511 पदे भरण्याच्या हालचाली राज्य शासनाने सुरू केल्या आहेत. त्यानुसार सर्व पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत लवकरच भरली जातील, अशी घोषणा सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केली आहे.

हेही वाचा - ...तेव्हा हेमांगी कवी कुठे होत्या, 'बाई, बूब्स, ब्रा' वादात तृप्ती देसाईंची उडी

  • 15 हजार रिक्त पदे भरणार -

एमपीएससीमार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षा आणि रिक्‍त पदांच्या भरतीच्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग इत्यादी विभागांना पदभरतीच्या निर्बंधांमधून सूट देण्यात आली आहे. तसेच गट अ ची 4 हजार 417 पदे, गट ब ची 8 हजार 31 पदे आणि गट क ची 3 हजार 63 पदे अशी एकूण 15 हजार 511 पदे भरण्यास वित्त विभागाने सन 2018 पासून मान्यता दिलेली आहे. त्याअनुषंगाने या पदाचे आरक्षण तपासून पद भरती गतीने राबवण्याच्या दृष्टीने कार्यवाही सुरू असल्याचे मंत्री भरणे यांनी सांगितले.

  • जुलै अखेरपर्यंत सर्व प्रक्रिया पूर्ण -

उमेदवारांच्या मुलाखती या टप्प्यावर प्रलंबित असलेली भरती प्रक्रिया पार पाडण्याच्या दृष्टीने एमपीएससी सदस्यांची 4 रिक्त पदे भरणे गरजेचे आहे. सदस्यांची ही पदे भरण्यासाठी जुलै अखेरपर्यंत सर्व प्रक्रिया पार पाडण्याबाबतही बैठकीत निर्देश देण्यात आले आहेत. याशिवाय केरळ लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सदस्य संख्येत वाढ करण्याच्या अनुषंगानेही या बैठकीत चर्चा करण्यात आली. जेणेकरून भविष्यातील मुलाखती गतीने पार पाडता येतील. संघ लोकसेवा आयोगाकडून दरवर्षी पुढील संपूर्ण वर्षाचे परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले जाते. त्याच धर्तीवर एमपीएससीच्या परीक्षांचेही वेळापत्रक जाहीर करण्याबाबतचे निर्देशही देण्यात आले आहेत, अशी माहिती मंत्री भरणे यांनी यावेळी दिली.

हेही वाचा - 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजप 400 हून अधिक जागा जिंकणार, चंद्रकांत पाटलांचा दावा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.