ETV Bharat / city

Maha Govt Wine Sale Permission : महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; किराणा दुकान, सुपर मार्केटमध्ये मिळणार वाईन - दारूविक्रीच्या परवानगीवर विरोधी पक्षनेते

किराणा दुकान, सुपर मार्केटमध्ये वाईन मिळणार ( wine sale in super markets in Maharashtra ) असल्याची माहिती मंत्री नवाब मलिक यांनी दिली. आज झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत यावर निर्णय झाल्याचेही ते म्हणाले.

sale wine in grocery stores
महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय
author img

By

Published : Jan 27, 2022, 5:41 PM IST

Updated : Jan 27, 2022, 7:13 PM IST

मुंबई - सुपर मार्केट, वॉक इन स्टोअर्स, आणि 1000 चौरस फुटांपेक्षा मोठ्या असलेल्या कोणत्याही जनरल स्टोअर्स मध्ये आता राज्य सरकारने वाइन विक्रीला परवानगी दिली आहे. यामुळे आता शहराशहरात वाईन विक्रीच्या दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. राज्यात आता सुपर मार्केट ( wine sale in super markets in Maharashtra ), वॉक इन स्टोअर्स, आणि एक हजार चौरस फुटांपेक्षा मोठ्या असलेल्या कोणत्याही जनरल स्टोअर्समध्ये ( Wine sale permission in shops in Maharashtra ) वाईन मिळणं सहज शक्य आहे. सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबतचा निर्णय ( maharashtra government issue notification to sale wine ) आज घेतला आहे. अशी माहिती अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी दिली.

अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांची प्रतिक्रिया

शेतमालाला भाव मिळण्यासाठी निर्णय - मलिक

राज्यातील राज्यातील शेतकऱ्यांच्या शेतमालाला आणि फळांना योग्य भाव मिळण्यासाठी, फळांपासून वाईन तयार केल्यास त्याला अधिक दर मिळतो. हे गेल्या काही वर्षांमध्ये लक्षात आल्यामुळे राज्यातील सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीची दुकाने सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे. राज्यातील वाइन विक्रीतून मिळणारा महसूल वाढविण्यासाठी राज्य सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे. वाईन विक्रीच्या या नव्या धोरणावर राज्यभरातून काय प्रतिक्रिया उमटतात याकडे आता सर्वसामान्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

भाजपशासित राज्यातही हेच धोरण- मलिक

भाजपची सत्ता असलेल्या हिमाचल आणि गोवा या राज्यांमध्येही अशाच प्रकारचे धोरण यापूर्वी राबवले गेले आहे. त्याला अनुसरूनच राज्य सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या निर्णयाला विरोध करण्याचा नैतिक अधिकार भाजपाला नाही असेही नवाब मलिक यांनी यावेळी सांगितले.

नवीन शैक्षणिक धोरणासाठी मंत्री गट -

राष्ट्रीय शिक्षण धोरण अंतर्गत माशेलकर समितीने एक अहवाल राज्य सरकारला सादर केला आहे. महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्र हे पाच विभागात काम करत आहे. माशेलकर समितीने दिलेल्या अहवालानुसार काम करण्यासाठी नवीन शैक्षणिक धोरण तयार करण्यासाठी मंत्री समिती गठीत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मंत्री गटामध्ये अभ्यास करून कुठल्या विभागाला काय काम द्यायचे हे ठरवण्यात येणार असल्याचे ही मलिक यांनी यावेळी सांगितले.

आम्ही कोणावर ही बंधने घातली नाहीत -

मालेगावचे काँग्रेसचे नगरसेवक आणि महापौर यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. याबाबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नाराजी व्यक्त केल्याबद्दल मलिक यांना विचारले असता आम्ही कोणावर ही बंधने घातलेली नाहीत. जे लोक आमच्या सोबत येऊ इच्छित आहेत त्यांचे आम्ही स्वागत करतो ज्यांना जायचे असेल ते जातील त्यांना आम्ही बंधने घातलेली नाहीत असेही मलिक म्हणाले.

सोमेया यांचे मनोरंजन सुरूच -

किरीट सोमेया हे भाजपाचे आइटम कलाकार आहेत. ते सातत्याने मनोरंजन करीत असतात. त्यांचे मनोरंजन सुरूच असल्याने आम्ही गांभीर्याने घेत नाही, असा टोलाही मलिक यांनी लगावला.

sale wine in grocery stores
फडणवीस यांचे ट्वीट

'महाराष्ट्राला ‘मद्यराष्ट्र’ करण्याचा हा प्रकार खपवून घेतला जाणार नाही'

महाराष्ट्र सरकारचा किराणा दुकान, सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीला परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करून टीका केली आहे. त्यांनी ट्वीट मध्ये म्हटले आहे की, 'पेट्रोल-डिझेलऐवजी दारू स्वस्त, दारूबंदी संपवून दारुविक्रीला परवानगी, महाराष्ट्रात नवीन दारूविक्री परवाने देण्याचा निर्णय, आणि आता थेट सुपर मार्केट, किराणा दुकानातून घरोघरी दारू, महाराष्ट्राला ‘मद्यराष्ट्र’ करण्याचा हा प्रकार खपवून घेतला जाणार नाही. शेतकरी-कष्टकरी, गरिब, बारा-बलुतेदार अशा एकाही घटकाला राज्य सरकारने गेल्या दोन वर्षांच्या कोरोना कालखंडात मदत केली नाही. सरकारचे प्राधान्य केवळ आणि केवळ दारूलाच, महाविकास आघाडीचे हे सरकार नेमके आहे तरी कुणाचे, सत्तेच्या ‘नशे’त धुंद सरकारने गरिबांना थोडी तरी मदत करावी अशी टीका ट्वीट करून देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

हेही वाचा - कोल्हापूर प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयाला टाळे ठोकण्याचा भाजपचा प्रयत्न, पोलिसांनी कार्यकर्त्यांना घेतले ताब्यात

Last Updated : Jan 27, 2022, 7:13 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.