मुंबई - राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त राज्यासह देशातील विविध मान्यवरांकडून त्यांच्यावर अभिष्टचिंतनाचा वर्षाव सुरू आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळक यांनी राजभवन येथे भेट घेऊन शुभेच्छा ( Ajit Pawar Birthday Wish Governer Bhagat Singh Koshyari ) दिल्या. तर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी दूरध्वनी करुन तसेच पत्राव्दारे राज्यपालांना शुभेच्छा दिल्या.
![devendra fadnavis Birthday Wish Governer Bhagat Singh Koshyari](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-mum-governer-birthday-7210546_17062022155253_1706f_1655461373_8.jpg)
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या 80 व्या वाढदिवसानिमित्त विविध मान्यवरांकडून देण्यात येत आहे. दोनच दिवसांपूर्वी राजभवनात झालेल्या जाहीर भाषणात राज्य सरकार वर टीकेचे बाण चालवणाऱ्या राज्यपालांना अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, खासदार प्रफुल पटेल, आमदार मंगल प्रभात लोढा आदींनी राजभवन येथे भेट घेऊन शुभेच्छा दिल्या. तसेच, केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी, केंद्रीय राज्यमंत्री अजय भट, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी देखील दूरध्वनीवरुन राज्यपालांना शुभेच्छा दिल्या.
![prafull patel Birthday Wish Governer Bhagat Singh Koshyari](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-mum-governer-birthday-7210546_17062022155253_1706f_1655461373_194.jpg)
हेही वाचा - Nupur Sharma : नुपूर शर्मा कुठे झाल्या बेपत्ता?, मुंबई पोलीस 4 दिवसांपासून मागावर