मुंबई - राज्यात कोरोना चा उद्रेक झाला आहे. वाढत्या कोरोना संसर्गाला रोखणे हेच मोठे आव्हान राज्य सरकारपुढे आहे. कोरोना रोखण्यासाठी राज्यात कडक निर्बंध लागू केले आहेत, तसेच सार्वजनिक आणि धार्मिक कार्यक्रमांवर सुद्धा बंदी घालण्यात आली आहे. सर्वजण कोरोनाच्या विळख्यात सापडलेत त्यातच आता गुढीपाडवा देखील कोरोनाच्या बंधनात अडकलेला आहे. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गुढीपाडव्याच्या सणावर राज्य सरकारने काही बंधने घातली आहेत. गुढीपाडवा सणासाठी राज्य सरकारने नियमावली जारी केली आहे; त्यामध्ये पाच पेक्षा जास्त लोक एकत्र जमू शकत नाही असा नियम राज्य सरकारने घालून दिला आहे. त्यामुळे मुंबईसह राज्यात गुढीपाडवा हा अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात येत आहे.
LIVE Updates : राज्यातील कोरोना परिस्थितीचे ताजे अपडेट्स; वाचा एका क्लिकवर..
12:41 April 13
कोरोनाच्या सावटाखाली मुंबईत अत्यंत साधेपणाने गुढीपाडवा साजरा करण्यात आला..
11:27 April 13
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची सर्व सामान्यांसोबत आढावा बैठक
मुंबईत कोरोनाचं वाढतं प्रमाण लक्षात घेता, पालिका आणि प्रशासनाकडून कठोर निर्बंध लावण्यात आले आहेत. दिवसेंदिवस परिस्थिती हातबाहेर जात आहे. वेळीच कठोर पावले न उचलल्यास वेळ प्रसंगी पुन्हा लॉकडाऊन करण्याच्या मनस्थितीत राज्यसरकार आहे. मात्र नागरिकांना विश्वासात न घेता लॉकडाऊनचे पाऊल उचलल्यास नागरिकांमध्ये नाराजी पसरून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू शकतो. त्यामुळेच पोलिसांनी अत्यावश्यक सेवेतील अधिकरी आणि तळागाळातले व्यापारी, सर्वसामान्यांची आँनलईन आढावा बैठक घेऊन परिस्थितीचं गांभीर्य समजून, त्यांच्या सूचना ऐकून घेण्यास सुरूवात केली आहे.
10:31 April 13
नंदुरबार जिल्ह्यात कोरोनाच्या उद्रेकाला जिल्हा अधिकारी जबाबदार - खा.डॉ.हिना गावीत
नंदुरबार - जिल्ह्यात कोरोनाच्या उद्रेकाला जिल्हाधिकारी यांचे ढिसाळ नियोजन कारणीभूत असुन अडीच हजार रेमडीसीवर इंजेक्शन असतांना सामान्य लोकांना वाटप करण्यात आली नाही. यामुळे कोरोना रूग्णांचा मृत्यूदर वाढला आहे. या मृत्यूंना जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड हेच जबाबदार असल्याचा आरोप खा.डॉ. हिना गावीत यांनी केला असून, जिल्हाधिकारी यांच्या विरोधात राज्यासह केंद्र सरकारकडे तक्रार करणार असल्याची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली.
09:08 April 13
अमरावतीला मिळाले कोविडशिल्ड लसीचे २० हजार डोस..
अमरावती : राज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असतानाच, दुसरीकडे अनेक जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक लसीचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे अनेक जिल्ह्यात लसीकरण मोहिमेला देखील ब्रेक लागला होता. अमरावती जिल्ह्यात देखील १०० लसीकरण केंद्र पडले होते. परंतु आता पुन्हा अमरावती जिल्ह्यासाठी नव्याने 20 हजार कोविड शिल्ड लसचे डोस प्राप्त झाल्याने दोन दिवसासाठी थोडा दिलासा मिळाला असून, बंद पडलेले लसीकरण केंद्र पुन्हा सुरू होण्याची आशा पल्लवित झाली आहे.
08:40 April 13
सोलापुरात कोविड सेंटरमधील रुग्णांना आठवड्यातून तीन दिवस मिळणार मांसाहार..
सोलापूर- शहरामध्ये कोरोनचा वाढता प्रादुर्भाव पाहता महापालिकेच्या माध्यमातून विविध ठिकाणी कोविड पॉझिटिव्ह पेशंट व त्यांच्या संपर्कात येणाऱ्या नागरिकांना त्यांच्यासाठी निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रामुख्याने सिंहगड कॉलेज, म्हाडा बिल्डींग, गव्हर्नमेंट पॉलीटेक्निक, वाडिया हॉस्पिटल, पोलिस प्रशिक्षण केंद्र केगाव, सोलापूर विद्यापीठ, भारतरत्न इंदिरा गांधी कॉलेज या ठिकाणी सोय करण्यात आली आहे.उपचार घेत असलेल्या रूग्णांना आता कोविड केअर सेंटर मध्ये आठवड्यातुन तीन दिवस मांसाहार जेवण आणि रोज अंडे मिळणार आहे.
08:40 April 13
नागपूरात एका क्लिकवर कळणार बेडची उपलब्धता..
नागपूर - शहरात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. बेड मिळत नसल्याने शहरातील विविध खाजगी व शासकीय रुग्णालयात बेडची उपलब्धता देण्यासाठी अद्यावत यंत्रणा करण्यात आली आहे. नागपूर स्मार्ट ॲण्ड सस्टेनेबल सिटी डेवलपमेंट कारपोरेशन लिमिटेडच्यावतीने एकाच क्लिक केल्यानंतर उपलब्ध आई.सी.यू. ऑक्सीजन, व्हेंटीलेटर, खाटांची माहिती प्राप्त होईल. या सोयीमुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळेल, असा विश्वास मनपा आयुक्त श्री. राधाकृष्णन बी यांनी व्यक्त केला.
08:38 April 13
नागपूरात ऑक्सिजन प्लॅन्ट उभारण्याच्या खंडपीठाच्या सूचना
नागपूर - जिल्ह्यात कोरोनाने विक्राळ रूप धारण केले आहे. या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकारी यंत्रणेने एकत्र येऊन पाऊले उचलावे. राज्य शासन, जिल्हा प्रशासन, मनपा व पोलिसांनी त्वरित निर्णय घेऊन एक ऑक्सिजन प्लांट उभारून ऑक्सिजनची अडचण सोडवण्याच्या सूचना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिल्या आहेत. यासोबतच पालकमंत्री यांनी लक्ष घालत मुख्यमंत्री यांच्याशी संवाद साधावा असे मत न्यायालयाने व्यक्त केले असून यासंदर्भात निर्णय महत्वाचा ठरणार आहे.
08:28 April 13
राज्यातील कोरोना परिस्थितीचे ताजे अपडेट्स; वाचा एका क्लिकवर..
मुंबई - राज्यात मागील 24 तासांत 51 हजार 751 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ झाली असून 258 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील एकूण बाधितांचा आकडा 34 लाख 58 हजार 996 वर पोहोचला असून 58 हजार 245 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.