मुंबई - गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोना रुग्ण संख्या झपाट्याने मंदावली ( Maharashtra Corona Update ) आहे. आज ( शनिवार ) केवळ 97 रुग्णांची नोंद ( Maharashtra Sees 97 New Corona Cases ) झाली असून, एकाचा मृत्यू झाला ( Maharashtra One Corona Death ) आहे. सक्रिय रुग्णांची संख्याही दीड हजारच्या आसपास असल्याची माहिती राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली आहे.
जगात कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने थैमान घातले असताना राज्यात तिसरी लाट अस्ताकडे चालली आहे. दिवसभरात 97 रुग्ण आढळून आले आहेत. तर 251 रुग्ण बरे होऊन घरी ( Maharashtra Recover Corona Cases ) परतले. बरे होणाऱ्यांचे प्रमाण 98.10 टक्के इतके आहे. आजपर्यंत 77 लाख 23 हजार 5 ठणठणीत बरे झाले आहेत. तर 7 कोटी 89 लाख 9 हजार 115 कोरोना चाचण्या आजपर्यंत केल्या. त्यापैकी 9.98 टक्के म्हणजेच 78 लाख 72 हजार 300 चाचण्यांचे अहवाल सकारात्मक आले आहेत. सध्या राज्यात 1525 सक्रिय रुग्ण ( Maharashtra Active Corona Cases ) आहेत.
'या' विभागांत सर्वाधिक रुग्ण -
- मुंबई मनपा - 29
- ठाणे - 0
- ठाणे मनपा - 2
- नवी मुंबई मनपा - 2
- कल्याण-डोंबिवली मनपा - 2
- मीरा-भाईंदर - 0
- वसई-विरार मनपा - 0
- नाशिक - 4
- नाशिक मनपा - 3
- अहमदनगर - 6
- अहमदनगर मनपा - 3
- पुणे - 4
- पुणे मनपा - 12
- पिंपरी-चिंचवड मनपा - 13
- सातारा - 2
- नागपूर मनपा - 0