मुंबई - गेल्या 24 तासांत राज्यात 9 हजार 170 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 7 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
हेही वाचा - Mumbai Police Action : थर्टी फर्स्टच्या रात्री वाहतूक नियमांची पायमल्ली, 1817 जणांवर गुन्हा दाखल
मुंबईत 6 हजार 397 नव्या कोविड रुग्णांची नोंद
मुंबईत 6 हजार 397 नव्या कोविड रुग्णांची नोंद झाली असून, 1 रुग्णाचा आज मृत्यू झाला आहे. राज्य आरोग्य बुलेटिननुसार, गेल्या 24 तासांत राज्यात 1 हजार 445 रुग्ण बरे झाले असून, राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ही 32 हजार 224 इतकी आहे.
रुग्ण वाढले तर, अजून कडक निर्बंध लादले जातील
जर राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढले तर, अजून कडक निर्बंध लादले जातील, अशी प्रतिक्रिया आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. तसेच, राज्यातील तब्बल 10 मंत्री आणि किमान 20 आमदार कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती देखील अजित पवार यांनी दिली. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
यामुळे 5 दिवसांचे ठेवले अधिवेशन
अजित पवार आज कोरेगाव भिमा येथील विजयस्तंभ येथे आले होते. त्यावेळी त्यांनी हे आवाहन केले. ते पुढे म्हणाले की, राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. लोकांनी हे समजून घ्यावे. यामुळेच आम्हाला विधानसभेचे अधिवेशन केवळ 5 दिवसांचे ठेवावे लागले. इतके कमी दिवस ठेवल्यानंतरही 20 आमदार आणि सरकारचे 10 मंत्री कोरोनाबाधित आढळून आले, अशी चिंता अजित पवार यांनी व्यक्त केली.
राज्यात 6 नव्या ओमायक्रॉन रुग्णांची नोंद
राज्यात 6 नव्या ओमायक्रॉन रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी 3 पुणे ग्रामीणमध्ये आढळले असून 2 रुग्ण पिंपरी - चिंचवड आणि 1 पीएमसी येथे आढळला आहे. राज्यात एकूण 460 ओमायक्रॉन रुग्ण आहेत. सध्या 2 लाख 26 हजार 1 रुग्ण गृह विलगीकरणात असून 1 हजार 64 रुग्ण इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनमध्ये आहेत.
देशात इतके रुग्ण आढळले
भारतात गेल्या 24 तासांत 22 हजार 775 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून, 406 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती देशाच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने शनिवारी दिली.
हेही वाचा - Mumbai High Court : मुंबई उच्च न्यायालयाचे कामकाज सोमवारपासून प्रत्यक्ष आणि ऑनलाईन पद्धतीने