मुंबई - राज्यात कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात आल्याने रोज चार हजाराच्या दरम्यान नवे रुग्ण आढळून येत आहेत. गेले दोन दिवस तीन हजाराच्या घरात रुग्णसंख्या होती. त्यात किंचित वाढ होऊन चार हजाराच्या वर रुग्ण आढळून आले आहेत. आज बुधवारी ४,१७४ नवे रुग्ण आढळून आले आहेत. ६५ रुग्णांचा मृत्यू झाला असून ४,१५५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.०८ टक्के इतके असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
राज्यात ४७,८८० सक्रिय रुग्ण -
राज्यात ४१५५ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण ६३,०८,४९१ कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.०९ टक्के एवढे झाले आहे. राज्यात ४१७४ नवीन रुग्णांचे निदान झाले असून ६५ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आतापर्यंत एकूण १,३७, ९६२ जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५ कोटी ५३ लाख ३८ हजार ७७२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६४ लाख ९७ हजार ८७२ (११.७४ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३ लाख ७ हजार ९१३ व्यक्ती होम क्वारांटाईनमध्ये आहेत. राज्यात साध्य ४७ हजार ८८० सक्रिय रुग्ण आहेत.
हे ही वाचा - मुख्यमंत्र्यांच्या गुंडांकडून मला गोळ्या घालण्याच्या धमक्या, किरीट सोमैय्या यांचा गंभीर आरोप
रुग्णसंख्येत चढउतार -
गुरुवारी २६ ऑगस्टला ५१०८, शुक्रवारी २७ ऑगस्टला ४६५४, शनिवारी २८ ऑगस्टला ४८३१, रविवारी २९ ऑगस्टला ४,६६६ तर सोमवारी ३० ऑगस्टला ३,७४१, मंगळवारी ३१ ऑगस्टला ४१९६, १ सप्टेंबरला ४४५६, २ सप्टेंबरला ४३४२, ३ सप्टेंबरला ४३१३, ४ सप्टेंबरला ४१३०, ५ सप्टेंबरला ४०५७, ६ सप्टेंबरला ३६२६, ७ सप्टेंबरला ३९८८, ८ सप्टेंबरला ४१७४ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या महिनाभरात रुग्णसंख्येत चढ उतार पाहायला मिळत आहे.
मृत्यूदर २.१२ टक्के -
१९ जुलैला ६६, २४ जुलैला २२४, २६ जुलैला ५३, २७ जुलैला २५४, २८ जुलैला २८६, ३० जुलैला २३१, ३१ जुलैला २२५, ९ ऑगस्टला ६८, १२ ऑगस्टला २०८, २५ ऑगस्टला २१६, ३० ऑगस्टला ५२, ३१ ऑगस्टला १०४, १ सप्टेंबरला १८३, २ सप्टेंबरला ५५, ३ सप्टेंबरला ९२, ४ सप्टेंबरला ६४, ५ सप्टेंबरला ६७, ६ सप्टेंबरला ३७, ७ सप्टेंबरला ८६, ८ सप्टेंबरला ६५ मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यात २.१२ टक्के इतका मृत्युदर नोंदवण्यात आला आहे.
हे ही वाचा - मुंबईत आता केंब्रिज बोर्डाच्याही शाळा, महाराष्ट्रातही अशा शाळा सुरू करणार-आदित्य ठाकरे
..या विभागात सर्वाधिक रुग्ण
- मुंबई - ५३२
- ठाणे पालिका - ६८
- नवी मुंबई पालिका -५४
- कल्याण डोबिवली पालिका - ६०
- रायगड - ७४
- पनवेल पालिका - ६२
- नाशिक - ४८
- अहमदनगर - ७८६
- पुणे - ५२९
- पुणे पालिका -२७६
- पिपरी चिंचवड पालिका - १७०
- सोलापूर - २५४
- सातारा - ४३६
- कोल्हापूर - ६१
- सांगली - १९२
- रत्नागिरी - ६२
- उस्मानाबाद - ५५
- बीड - ४२