मुंबई - कोरोनाची रुग्णसंख्या घटत असताना आज किंचित वाढ झाल्याचे समोर आले आहे. दिवसभरात 2 हजार 831 रुग्ण सापडले असून, आज 35 जणांचा मृत्यू झाला आहे. सोमवारी 1 हजार 966 रुग्ण सापडले होते. ओमयक्रोनचे रुग्ण देखील वाढले असून, आज 351 बाधितांची नोंद झाल्याचे राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.
हेही वाचा - Sanjay Raut Press Video: ...तर केंद्रीय तपास यंत्रणा तुम्हाला टाईट करतील - संजय राऊत
राज्यात कोरोना उतरणीला लागला आहे. रुग्णसंख्येत दिवसागणिक चढ उतार दिसून येत आहेत. आज 2 हजार 831 बाधित आढळून आले. सोमवारी हा आकडा 1 हजार 966 रुग्ण इतका होता. यात किंचित वाढ झाल्याचे दिसते. तर, आज 35 जणांचा मृत्यू झाला आहे. 8 हजार 695 रुग्ण बरे झाले असून, बरे होण्याचे प्रमाण 97.73 टक्के आहे.
आजपर्यंत 7 कोटी 66 लाख 39 हजार 114 कोविड चाचण्या केल्या. त्यापैकी 10.24 टक्के इतके म्हणजेच 78 लाख 46 हजार 746 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 3 लाख 14 हजार 531 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तर, 1 हजार 544 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. 30 हजार 547 कोरोना सक्रिय रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
ओमायक्रोनचे 8 रुग्ण
कोरोनाचा नवा व्हेरिएंट असलेल्या ओमयक्रोनचे आज 351 रुग्ण सापडले. पैकी 148 औरंगाबाद, 111 नाशिक, 72 पुणे मनपा, 12 पुणे ग्रामीण, पिंपरी चिंचवड 5, यवतमाळ आणि 1 रुग्ण साताऱ्यातील आहे. आज मुंबईत एकही रुग्णाची नोंद झाली नाही. आजपर्यंत 4 हजार 345 एवढे रुग्ण बाधित झाले आहेत. तर, 3334 जणांची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्याने सर्वांना घरी सोडण्यात आले. आजपर्यंत 8904 जणांची जनुकीय चाचणी केली. 7858 चाचण्याचे अहवाल प्राप्त झाले असून 1046 नमुने प्रलंबित आहेत, असे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.
विभागात सर्वाधिक कोरोना रुग्ण -
मुंबई महापालिका - 235
ठाणे - 15
ठाणे मनपा - 31
नवी मुंबई पालिका - 41
कल्याण डोबिवली पालिका - 13
मीरा भाईंदर - 10
वसई विरार पालिका - 5
नाशिक - 93
नाशिक पालिका - 41
अहमदनगर - 316
अहमदनगर पालिका - 68
पुणे - 190
पुणे पालिका - 344
पिंपरी चिंचवड पालिका - 130
सातारा - 44
नागपूर मनपा - 121
हेही वाचा - संजय राऊत यांनी केलेले आरोप अत्यंत गंभीर, राज्य सरकारने कारवाई करावी - नाना पटोले