ETV Bharat / city

Maharashtra corona update : राज्यात गुरुवारी 2 हजार 797 नव्या कोरोना रुग्णांची नोंद, 40 जाणांचा मृत्यू

author img

By

Published : Feb 17, 2022, 8:04 PM IST

Updated : Feb 17, 2022, 8:44 PM IST

राज्यात ( Maharashtra corona update ) कोरोनाची रुग्णसंख्या आज स्थिर स्थावर आहे. सुमारे 2 हजार 797 जणांना संसर्गाची बाधा झाली असून 40 जण दगावले आहेत. तर, सक्रिय रुग्ण 23 हजार इतके असून बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 97.83 टक्के आहे.

Maharashtra corona update
महाराष्ट्र कोरोना अपडेट

मुंबई - राज्यात ( Maharashtra corona update ) कोरोनाची रुग्णसंख्या आज स्थिर स्थावर आहे. सुमारे 2 हजार 797 जणांना संसर्गाची बाधा झाली असून 40 जण दगावले आहेत. तर, सक्रिय रुग्ण 23 हजार इतके असून बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 97.83 टक्के आहे. ओमयक्रोनचा मात्र आज एकही रुग्ण आढळला नसल्याचे राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.

हेही वाचा - निवडणुकीच्या तोंडावरच भाजपाला भगवतगीता कशी आठवली, काँग्रेस नेत्याचा सवाल

देशासह राज्यात कोरोना रुग्णसंख्या कमालीची घटली आहे. राज्यात मागील दोन दिवसांपासून रुग्ण स्थिरस्थावर आहेत. बुधवारी 2 हजार 748 जणांना संसर्ग झाला होता. आज 2 हजार 797 बाधितांची नोंद झाली आहे. तर, 40 जण दगावले आहेत. 6 हजार 383 रुग्ण बरे झाले असून, बरे होण्याचे प्रमाण 97.82 टक्के आहे. बुधवारी हे प्रमाण 99.77 टक्के होते.

आजपर्यंत 7 कोटी 67 लाख 67 हजार 774 कोविड चाचण्या केल्या. त्यापैकी 10.22 टक्के इतके म्हणजेच, 78 लाख 53 हजार 291 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 2 लाख 51 हजार 23 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तर, 1 हजार 146 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. 23 हजार 816 कोरोना सक्रिय रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

ओमायक्रोनचा एकही रुग्ण नाही

कोरोनाचा नवा व्हेरिएंट असलेले ओमयक्रोनचे बुधवारी 111 तर, मंगळवारी 351 रुग्ण सापडले होते. मात्र, आज एकही रुग्ण न सापडल्याने राज्याला दिलासा मिळाला आहे. आजपर्यंत 4 हजार 456 एवढे रुग्ण बाधित झाले आहेत. तर, 3 हजार 355 जणांची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्याने सर्वांना घरी सोडण्यात आले. आजपर्यंत 8 हजार 904 जणांची जनुकीय चाचणी केली. 7 हजार 991 चाचण्याचे अहवाल प्राप्त झाले असून, 913 नमुने प्रलंबित आहेत, असे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.

विभागात सर्वाधिक कोरोना रुग्ण -

मुंबई महापालिका - 259
ठाणे - 13
ठाणे मनपा - 27
नवी मुंबई पालिका - 52
कल्याण डोबिवली पालिका - 27
मीरा भाईंदर - 7
वसई विरार पालिका - 10
नाशिक - 52
नाशिक पालिका - 44
अहमदनगर - 172
अहमदनगर पालिका - 31
पुणे - 176
पुणे पालिका - 450
पिंपरी चिंचवड पालिका - 262
सातारा - 57
नागपूर मनपा - 90

हेही वाचा - KCR to Meet CM Maharashtra : तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर मुख्यमंत्री ठाकरेंची घेणार भेट; विरोधकांची मोट बांधण्याचा नवा प्रयत्न

Last Updated : Feb 17, 2022, 8:44 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.