ETV Bharat / city

LIVE Updates : राज्यातील कोरोना परिस्थितीचे ताजे अपडेट्स; वाचा एका क्लिकवर.. - महाराष्ट्र कोरोना रुग्ण

Maharashtra Corona situation LIVE updates on ETV Bharat
LIVE Updates : राज्यातील कोरोना परिस्थितीचे ताजे अपडेट्स; वाचा एका क्लिकवर..
author img

By

Published : May 24, 2021, 7:10 AM IST

Updated : May 24, 2021, 10:51 PM IST

22:49 May 24

राज्यात 22 हजार 122 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

मुंबई - महाराष्ट्रात कोरोना ची दुसरी लाट आटोक्यात येत असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत. राज्याच्या आरोग्य विभागाकडून प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार. आज राज्यात 22 हजार 122 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. आतापर्यंत एकूण कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 56 लाख 02 हजार 019 इतकी झाली आहे. असं असलं तरी आज राज्यात 42 हजार 320इतक्या रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. 

19:16 May 24

पुण्यात अंत्यसंस्कारासाठीचे वेटींग थांबले, कोरोना मृत्यू दर घटल्याचे चित्र

पुण्यात अंत्यसंस्कारासाठीचे वेटींग थांबले

पुणे - शहरात कोरोनाच्या संसर्गाचा वेग सध्या मंदावला असल्याने पुणेकर नागरिक आणि प्रशासनाला काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. मार्च, एप्रिल आणि मे या तीन महिन्यात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण वाढले होते. या काळात शंभरच्यावर मृत्यू हे शहरात होत होते. आता मात्र कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचा आकडा 60 च्या घरात आला आहे. हा आकडा आणखी कमी होण्याची चिन्हे आहेत.  

18:35 May 24

मुंबईत लहान मुलांसाठी स्वतंत्र कोविड सेंटर उभारा, भाजपची मागणी

मुंबई - मुंबईमध्ये गेले वर्षभर कोरोनाचा प्रसार आहे. मुंबईत सध्या कोरोनाची दुसरी लाट कमी होत असताना येत्या काही महिन्यात मुंबईत तिसरी लाट येणार असून त्यात लहान मुलांना कोरोना होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई शहरात लहान मुलांसाठी स्वतंत्र कोविड सेंटर उभारावीत, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे स्थायी समिती सदस्य भालचंद्र शिरसाट यांनी महापालिका आयुक्तांकडे पत्राद्वारे केली आहे.  

18:32 May 24

मुंबईत अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीवरील ताण कमी झाला, शहरात २०० हून अधिक स्मशानभूमी

मुंबईत अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीवरील ताण कमी झाला

मुंबई - कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत राज्यातील अनेक जिल्हात दररोज कोरोनाचा मृत्यूदर वाढला आहे. एकीकडे अंत्यसंस्कारासाठी अनेक ठिकाणी पुरेशा सुविधा नसल्याने अक्षरशः स्मशानभूमीत मृतदेहांची विटंबना होत असल्याचे विदारक चित्र असताना दुसरीकडे मुंबई मात्र अपवाद ठरत आहे. कारण शहरात २०० पेक्षा अधिक स्मशानभूमी असून येथे लाकडांची आणि विद्युत दाहिनीची सोय असल्याने नागरिकांना दिलासा मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे.  

15:36 May 24

केवळ १० तासांत कोरोनामुळे दोन सख्ख्या भावांचा मृत्यू

शिक्रापूर - कोरोनामुळे अनेकांचे संसार उघड्यावर पडले अनेक कुटुंबातील कर्ते सदस्य मृत्युमुखी पडले ह्या दुसऱ्या लाटेमुळे अनेक कुटुंबाचे मोठे नुकसान झाले आहे. शिरूर तालुक्यातील शिक्रापूर जवळील विठ्ठलवाडीमधील दोन सख्ख्या भावांचा बळी कोरोनाने घेतला आहे. या दोन भावंडांच्या जाण्याने तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.  सतीश कुंडलिक गवारे आणि दत्तात्रेय कुंडलिक गवारे अशी मृत भावांची नावे आहेत. हे दोघे मनसेचे दिवंगत आमदार रमेश वांजळे यांचे मेव्हुणे होते. 

15:34 May 24

पुण्यात दोन पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांचा कोरोनाने मृत्यू

पुणे - जिल्ह्यात कोरोना विस्कोट दिवसेंदिवस वाढत असताना खेड पंचायत समितीच्या पशुवैद्यकीय डॉक्टर व ओझर येथील पशुवैद्यकीय डॉक्टरला मागील पंधरा दिवसापूर्वी सेवा बजावत असताना कोरोनाची लागण झाली होती. या दोघांवर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना दोघांचाही मृत्यु झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. डॉ. नंदकुमार बेलापूरकर (वय 47 ) व डॉ. राजेंद्र दुणके (वय 45) अशी मृत पशुवैद्यकीय डॉक्टरांची नावे आहेत.

12:20 May 24

सकारात्मक! ९५ वर्षाच्या आजीची कोरोनावर मात

अमरावती : जिल्ह्यातील भुगाव येथील रहिवासी मनकर्णा कडू या आजी ९५ वर्षाच्या आहेत. त्यांना आजाराची लक्षणे जाणवू लागण्याने, त्यांच्या मुलाने खाजगी दवाखान्यात उपचार घेत असताना डॉक्टरांनी त्यांना कोरोना चाचणी करण्याची सल्ला दिला.कोरोनाची चाचणी केल्यानंतर मनकर्णा कडू यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला.त्यानंतर त्याच्या मुलाने १५ मे रोजी आपल्या आईला उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल केले. ८ दिवस उपचार घेतल्यानंतर आजीचा अहवाल निगेटिव्ह आला, आणि आजीबाई घरी परतल्या.

12:19 May 24

तब्बल 15 दिवसांनी बाजार समित्या सुरू... कांद्याचे भाव स्थिर

मनमाड : तब्बल 15 दिवसांनंतर बाजार समित्या सुरू झाल्या असून आज कांद्याचे भाव स्थिर होते. केवळ 250 जणांना प्रवेश दिल्याने गर्दी कमी प्रमाणात बघायला मिळाली. तर अँटीजन टेस्ट कंपल्सरी असल्याने देखील आज बराच फरक पडला. जवळपास 90 टक्के शेतकऱ्यांनी स्वतःच कोव्हिड टेस्ट करून रिपोर्ट सोबत आणले होते. ज्यांनी आणले नाही त्यांच्या बाजार समितीच्या वतीने टेस्ट करण्यात आल्या होत्या.

12:19 May 24

कोल्हापूर : लॉकडाऊन काळात जप्त केलेल्या गाड्या परत घ्यायला भली मोठी रांग

कोल्हापूर : लॉकडाऊन काळामध्ये नियमांचे उल्लंघन करून घराबाहेर पडलेल्या अनेक वाहनधारकांवर कारवाई करून त्यांच्या गाड्या जप्त करण्यात आल्या होत्या. ज्यांच्या गाड्या जप्त करून सात दिवसांपेक्षा जास्त अवधी झाला आहे, अशा सर्वांना त्यांच्या गाड्या पुन्हा परत दिल्या जात आहेत. याच पार्श्वभूमीवर आपल्या गाड्या परत घेण्यासाठी आज कोल्हापूर वाहतूक नियंत्रण शाखेच्या बाहेर नागरिकांनी भली मोठी रांग लागल्याचे आज पाहायला मिळाले.

12:18 May 24

अलिबाग तालुक्यात जिल्ह्यातील सर्वाधिक 342 जणांचा कोरोनाने मृत्यू

रायगड : रायगड जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्या हळूहळू आटोक्यात येण्यास सुरुवात झाली आहे. पनवेल महानगर पालिका क्षेत्रात रुग्णाची संख्या झपाट्याने कमी होत आहे. मात्र अलिबाग तालुक्यात रुग्ण संख्या कमी होत नाही. अलिबाग तालुक्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण चांगले असले तरी कोरोना मृत्यू संख्या वाढत आहे. ही एक चिंतेची बाब आहे. जिल्ह्यात आतापर्यत अलिबाग तालुक्यात सर्वाधिक 342 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. त्यामुळे प्रशासनाने अलिबागमधील वाढत असलेली कोरोना रुग्ण संख्या आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

12:18 May 24

येवल्यात बाजार समित्या सुरू, शेतकऱ्यांची बाजार समिती प्रवेशद्वारावर कोरोना अहवाल तपासणी....

येवला : आज पासून कृषी उत्पन्न बाजार समित्या सुरू झाल्या असून येवला बाजार समित्यांच्या प्रवेशद्वाराव शेतकऱ्यांचा कोरोना चाचणी अहवाल तपासण्यात येत आहे. अहवाल निगेटीव्ह असणाऱ्या शेतकऱ्यांनाच बाजार समितीत प्रवेश दिला जात आहे.

08:10 May 24

अहमदनगर- कोरोनाकाळात ‘फिरता दवाखाना’ ठरतोय कर्जत-जामखेडकरांसाठी वरदान; आ.रोहित पवारांचा उपक्रम

अहमदनगर- कोरोना संकटकाळात कर्जत-जामखेडमधील आ. रोहित पवार यांच्या ‘फिरता दवाखाना’ हा उपक्रम सुरू केला आहे. सध्या अनेक सर्वसाधारण रुग्णालये कोविड रुग्णालये म्हणून कार्यरत आहेत. त्यामुळे नियमित आजारांवर तपासणी, निदान आणि उपचार यासाठी रुग्णांना अडचणी येत आहेत. त्यामुळे या उपक्रमाला तालुक्यातील गावोगावच्या नागरिकांकडून प्रतिसाद मिळत असून गेल्या चार महिन्यात ११ हजारहून अधिक लाभार्थ्यांना मोफत घरपोच प्राथमिक उपचार व औषधे देण्यात आली आहेत. या उपक्रमाचे कर्जत व जामखेडमधील वयोवृध्द, गर्भवती महिला व विकलांग नागरिकांकडून कौतुक होत आहे. आ. रोहित पवार यांच्या माध्यमातून राबवण्यात येणारा हा उपक्रम कर्जत व जामखेडवासीयांसाठी कोरोनाच्या या काळात एक वरदानच ठरत आहे.

08:09 May 24

कोल्हापुर- तिसऱ्या लाटेच्या मुकाबल्यासाठी कृती आखाडा तयार करा, पालकमंत्र्यांच्या सर्व रुग्णालयांना सूचना

कोल्हापूर- तिसरी लाट येईल का ? आणि आली तर जिल्ह्यातील लहान मुलांना किती संसर्गग्रस्त करेल या विषयी सध्या अंदाज आहेत. पण आपण सावध असले पाहिजे. त्या दृष्टीने तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी जिल्ह्यातील शासकीय आणि खाजगी हॉस्पीटल्सनी सज्ज रहावे. तसेच यासाठी लागणारा कृती आराखडा येत्या बुधवारपर्यंत तयार करावा. असे निर्देश पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिले आहेत. जिल्ह्याधिकारी कार्यालयातील छत्रपती शाहूजी सभागृहात बालरोग तज्ज्ञांच्या दूरदृष्यप्रणाली व्दारे (व्ही. सी) आयोजित करण्यात आलेल्या आढावा बैठक घेण्यात आली.

08:09 May 24

वृद्धांचा जीव वाचवण्यासाठी पालिकेचा ऍक्शन प्लॅन, लसीकरण करून सुरक्षित करणार

मुंबई - मुंबईत कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लसीकरण सुरु आहे. सध्या कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असली तरी जेष्ठ नागरिकांच्या मृत्यूचे प्रमाण कमी झालेले नाही. त्यासाठी पालिकेने ऍक्शन प्लान तयार केला आहे. जेष्ठ नागरिकांच्या मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी त्यांना लस देऊन सुरक्षित करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. यासाठी सोमवार ते बुधवार वॉक ईन तर गुरुवार ते शनिवार नोंदणी पद्धतीने लसीकरण केले जाणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली. 

08:09 May 24

कोरोना रुग्णांना वापरासाठी मोफत मिळतंय ऑक्सिजन काँसेंट्रेटर, दोन आठवड्यात 15 रुग्णांना झालाय फायदा

मंचर : कोरोना मुळे ऑक्सिजन पातळी कमी झालेल्या, मात्र ऑक्सिजन बेड मिळण्यास उशीर होत असलेल्या रुग्णांना मंचर येथील लोकविश्व प्रतिष्ठान व संतोषभाऊ वायाळ मित्रपरिवरच्या वतीने ऑक्सिजन बेड उपलब्ध होईपर्यंत ऑक्सिजन काँसेंट्रेटर मशीन मोफत वापरासाठी देण्यात येत आहे. अशी माहिती लोकविश्व प्रतिष्ठानचे अध्यक्ष सचिन तोडकर यांनी दिली.

06:54 May 24

राज्यातील कोरोना परिस्थितीचे ताजे अपडेट्स; वाचा एका क्लिकवर..

मुंबई - महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात येत असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत. आरोग्य विभागाकडून प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार, आज राज्यात 26 हजार 672 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर दिवसभरामध्ये 29 हजार 177 रुग्णांनी कोरोवर मात केली आहे. गेल्या 24 तासांमध्ये 594 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.

राज्यातील कोरोना स्थिती..

राज्यात आज 26 हजार 672 नव्या रुग्णांची नोंद झाली असून, कोरोनाबाधितांचा एकूण आकडा हा 55 लाख 79 हजार 897 इतका झाला आहे. आज 29 हजार 177 जणांनी कोरोनावर मात केल्याने कोरोनामुक्तांचा एकूण आकडा हा 51 लाख 40 हजार 272 वर पोहोचला आहे. तर गेल्या 24 तासांमध्ये 594 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यात 3 लाख 48 हजार 395 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

Last Updated : May 24, 2021, 10:51 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.