मुंबई - राज्यात शुक्रवारी 29 हजार 644 बाधितांची नोंद करण्यात आली. तर 44 हजार, 493 जणांनी कोरोनावर मात केली. याबरोबरच गेल्या 24 तासांत 555 बाधितांचा मृत्यू झाला. याबरोरच राज्यातील एकूण बाधितांची संख्या 55 लाख 27 हजार 92 इतकी झाली. राज्यात आतापर्यंत 50 लाख 70 हजार 801 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर एकूण 86 हजार 618 बाधितांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यात 3 लाख 67 हजार 121 सक्रिय रुग्ण आहेत.
LIVE Updates : राज्यातील कोरोना परिस्थितीचे ताजे अपडेट्स; वाचा एका क्लिकवर.. - महाराष्ट्र कोरोना रुग्ण
22:37 May 21
21:15 May 21
मुंबईत गेले काही दिवस कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या वाढली होती. रोज 7 ते 11 हजाराच्यावर रुग्ण आढळून येत होते. त्यात गेल्या काही दिवसात घट झाली होती. 18 मे मंगळवारी तर 953 नवे रुग्ण आढळून आले होते. मात्र, त्यात वाढ होऊन बुधवारी 1350 तर गुरुवारी 1425 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. आज (शुक्रवारी) पुन्हा 1416 नव्या रुग्णांची नोंद झाली असून 54 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 1766 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
15:39 May 21
देशभरातील औषध विक्रेते आणि फार्मासिस्ट कोरोना काळात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. मात्र, हा गट दुर्लक्षित असून कोरोना योद्धे वा फ्रंटलाइन वर्कर म्हणून त्यांना दर्जाही देण्यात आलेला नाही. त्यामुळे हा गट लसीकरण मोहिमेतही प्राधान्य क्रमावर नाही. या पार्श्वभूमीवर औषध विक्रेते-फार्मासिस्टना प्राधान्य क्रमाने लस द्यावी. अन्यथा देशभरातील साडे नऊ लाख औषध विक्रेते संपावर जाऊ, असा इशारा ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अँड ड्रगिस्टचे (एआयओसीडी) अध्यक्ष जगनाथ शिंदे दिला आहे.
15:27 May 21
बीड - कोरोना बाधित रुग्णाने गळफास घेत आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना येथील दिप रुग्णालयात शुक्रवारी पहाटेच्या सुमारास उघडकीस आली. गळ्यातील रुमालाने गळफास घेत आपले जीवन संपविले. या घटनेने खळबळ उडाली असून घटनास्थळी शहर पोलिसांनी धाव घेतली आहे.
11:13 May 21
डॉक्टरांनी वेळेत इंजेक्शन दिले असते तर माझी ताई वाचली असती...!
बीड - तब्बल 28 दिवस माझी ताई बीडच्या जिल्हा रुग्णालयात कोरोना शी लढत होती. शेवटी डॉक्टरांनी खाजगी मेडिकल वरून सांगितलेले इंजेक्शन उपलब्ध करून आणून दिले. मात्र संबंधित वार्डात इंजेक्शन पोहोच करून देखील दोन तास झाले तरी ते इंजेक्शन रुग्णाला दिले नव्हते. जर डॉक्टरांनी वेळेवर ते इंजेक्शन दिले असते, तर माझी ताई वाचली असती. असा आरोप बीडमध्ये कोरोनाने मृत्यू झालेल्या महिलेचे भाऊ वकील सुभाष कबाडे यांनी केला आहे. विशेष म्हणजे कबाडे यांनी याबाबत बीड शहर पोलीस ठाण्यात तक्रार देखील केली आहे.
11:13 May 21
गोंदिया जिल्ह्यात पहिल्या म्युकरमायकोसिस रुग्णाचा मृत्यू..
गोंदिया : सध्या सर्वत्र कोरूना आजाराचे प्रमाण काहीसे कमी झाले असले तरी कोरोना आजारानंतर काही व्यक्तींना आता म्यूकर मायकोसिस आजार होऊ लागले आहे. यामुळे मृत्यू ओढवण्याचे प्रमाण वाढत आहे, या आजाराचा गोंदिया जिल्ह्यात पहिला बळी गेला आहे, या रुग्णावर नागपूर येथे उपचार सुरू होते. या रुग्णाला कोरोना आजार बरा झाल्यानंतर त्यांना डोळ्याचा त्रास वाटू लागल्याने त्याला नागपूर येथे उपचाराकरता दाखल केले असता. त्यांचा आज नागपूर येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
10:33 May 21
15 दिवसात एकापाठोपाठ एकाच कुटुंबातील चौघांचा कोरोनाने मृत्यू...
सांगली - कोरोनाने अवघ्या 15 दिवसात एकाच कुटुंबातील चौघांना मृत्यू झाला आहे.आई-वडील आणि दोन मोठया मुलांचा एका पाठोपाठ कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला आहे.मन सुन्न करणारी ही घटना कडेगाव तालुक्यातील तांडोली याठिकाणी घडली आहे.नुकतेच शिराळा येथील शिरशी येथील एक कुटंबाचा अवघ्या 13 तासात मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना या घटनेनेमुळे जिल्ह्यात भीतीचे वातावरणा पसरले आहे.
10:32 May 21
कोरोना बधितांचा मृतदेह नेला कचरा नेणाऱ्या गाडीत; नागपुरातील संतापजनक प्रकार
नागपूर - कोरोना संक्रमनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांच्या अंगावरील दागिने आणि मोबाईल चोरण्याचा प्रकार उघडकीस येऊन काही दिवस लोटत नाही. तेच बुट्टीबोरीत आणखी धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. आता कोरोना बाधित व्यक्तीचा मृतदेह कचरा संकलन गाडीतून नेण्याचा संतापजनक प्रकार बुटीबोरीत घडला आहे.
07:26 May 21
नाशिक - कोरोनाचा रिकव्हरी रेट 95 टक्क्यांवर, शहरातील 3,500 बेड रिक्त..
नाशिक - शहरात कडक लॉकडाऊनचा परिणाम दिसू लागला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असून, रुग्णसंख्या देखील कमी होत आहे. तसेच कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट आता 95 टक्क्यांवर असून; यामुळे शहरातील हॉस्पिटलमध्ये 3,500 बेड रिक्त असल्याचं चित्र आहे.
07:02 May 21
नागपुरात मागील 24 तासात 1,151 बाधितांची नोंद; 3,405 जण कोरोनामुक्त
नागपूर - नागपुरात रुग्णसंख्या मागील तीन चार दिवसात हजार ते पंधराशेच्या जवळपास स्थिरावली आहे. तेच एप्रिल महिन्यात हजारोच्या संख्येने रुग्ण मिळून उच्चांक गाठत होते. तेच या महिन्यात सक्रिय रुग्णाच्या संख्येत सातत्याने घट झाली आहे. यामुळे बाधितांच्या तुलनेत अधिक लोक बरे होत असल्याने दिलासादायक चित्र निर्माण झाले आहे. यात मागील 24 तासात 1,151 बाधितांची नोंद झाली असतांना आज 3405 जण हे कोरोनामुक्त झाले आहे. यात रुग्ण रिकव्हरी दर हा वाढला असून 94.03 वर जाऊन पोहचला आहे.
06:17 May 21
पीएम केअरमधून मिळालेल्या ४१२७ व्हेंटिलेटरपैकी केवळ ३३२ व्हेंटिलेटर नादुरुस्त - राजेश टोपे
मुंबई - पीएम केअरमधून मिळालेल्या 4 हजार 127 व्हेंटिलेटरपैकी केवळ 332 व्हेंटिलेटर नादुरुस्त अवस्थेत असल्याचे राजेश टोपे यांच्याकडून सांगण्यात आले. तर, शासनाच्या वैद्यकीय महाविद्यालयाला देण्यात आलेल्या व्हेंटिलेटरपैकी 250 व्हेंटिलेटर नादुरुस्त असल्याची माहिती अमित देशमुख यांनी दिली.
06:16 May 21
सोलापुरात गुरुवारी एकाच दिवशी आढळले 1,643 रुग्ण; तर 32 रुग्णांचा मृत्यू
सोलापूर - सोलापूर शहर आणि जिल्ह्यात गुरुवारी एकूण 1,709 रुग्ण बरे झाले आहे. तर शहर आणि जिल्ह्यात असे मिळून 1,643 नवीन रुग्ण आढळले आहेत. कोरोना संसर्गजन्य आजारामुळे उपचार सुरू असताना सोलापूर जिल्ह्यात एकूण 32 रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. तर सोलापुरात एकूण ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या 17,904 इतकी आहे. ऍक्टिव्ह किंवा पॉझिटिव्ह रुग्णांवर विविध कोविड रुग्णालयात उपचार सुरू आहेत.कोरोना विषाणूची दुसरी लाट हळूहळू उतरत आहे. सोलापुरात कोरोना रुग्णसंख्या आणि मृतांचा आकडा देखील कमी होत चालला आहे.
06:14 May 21
राज्यातील कोरोना परिस्थितीचे ताजे अपडेट्स; वाचा एका क्लिकवर..
मुंबई - राज्यात गुरुवारी(20 मे) 29 हजार 911 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 738 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात गुरुवारी 47 हजार 371 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात 50 लाख 26 हजार 308 रुग्ण आतापर्यंत कोरोनामुक्त झाले आहेत. मागच्या काही दिवसांपासून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत असले तरी, उपचारा दरम्यान मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या मोठी आहे.
राज्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची स्थिती
- राज्यात नव्या 29 हजार 911 रुग्णांची नोंद.
- राज्यात एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 54लाख 97हजार 448
- राज्यात 24 तासात 738 रुग्णांचा मृत्यू
- राज्यात 24 तासात 47 हजार 371रुग्ण कोरोनामुक्त.
- राज्यात आतापर्यंत 50 लाख 26 हजार 308 रुग्णांची कोरोनावर मात.
- राज्यात अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 3 लाख 83 हजार 253.