रायगड : मुंबई-पुणे हायवे वर विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांवर खालापूर पोलिसांनी धडक कारवाई 15 मे सायंकाळी केली असून, अशा तब्बल 41 वाहनांकडून 10,500 हजारांचा दंड पोलिसांनी वसूल केला आहे.
LIVE Updates : राज्यातील कोरोना परिस्थितीचे ताजे अपडेट्स; वाचा एका क्लिकवर.. - महाराष्ट्र कोरोना रुग्ण
12:57 May 16
विनाकारण फिरणाऱ्यांवर दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर खालापुर पोलिसांची कारवाई
11:47 May 16
गोव्यात २१ खासगी रुग्णालये सरकारने घेतली ताब्यात, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची घोषणा
सिंधुदुर्ग - गोवा राज्यातील २१ खासगी रुग्णालये सोमवार दिनांक १७ मे पासून सरकार ताब्यात घेणार असल्याची घोषणा मुखमंत्री डॉ. प्रमोश सावंत यांनी केली आहे. सोमवार पासून या रुग्णालयात रुग्ण दाखल करण्याचे अधिकार सरकारने आपल्याकडे घेतले आहेत. असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे. गोव्यात कोरोना दिवसेंदिवस वाढत असताना सरकारने घेतलेला हा निर्णय अत्यंत महत्वाचा ठरणार आहे.
11:35 May 16
देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते चिखलीत आधार कोविड केअर सेंटरचे आज उद्घाटन..
बुलडाणा : स्व. दयासागरजी महाले यांच्या स्मृती प्रित्यर्थ आमदार श्वेता महाले पाटील यांच्या प्रयत्नाने सुरु होत असलेल्या आधार कोविड केअर सेंटरचे आज 16 मे रोजी दुपारी 4 वाजता माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे.
11:19 May 16
कोरोनाने घरातील कर्त्या माणसाचा मृत्यु; अज्ञात व्यक्तीने शेतातील साठवलेला कांदा केला नष्ट..
माणुसकीला काळीमा फासणारा प्रकार जुन्नर तालुक्यात उघडकीस आल आहे. एकीकडे शेतकऱ्याचा कोरोनामुळे रुग्णालयात मृत्यू झाला असताना, त्याच्या मागे शेतात काढलेल्या कांद्यावर काही समाजकंटकानी युरिया मिश्रित पाणी टाकल्याने मोठं नुकसान झालं आहे. राजुरी येथील ही घटना आहे. शेतकऱ्याच्या कांदा आरणीवर अज्ञात व्यक्तीने युरिया टाकल्याने सर्व कांदा खराब होऊन 1 लाख 20 हजार रूपयांचे नुकसान झाले आहे.
10:36 May 16
अमरावती शहरातील ११ केंद्रांवर आज कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस..
अमरावती : महानगरपालिका अमरावती कार्यक्षेत्रातील ज्या नागरिकांचा कोविड-१९ अंतर्गत कोव्हॅक्सिन या लसीचा पहिला डोस घेवून २८ दिवस पूर्ण झाले असेल, तर त्यांचा दुसरा डोस रविवारी शहरातील ११ लसीकरण केंद्रांवर देण्यात येणार आहे. नागरीकांनी लसीकरण केंद्रावर जावून कोव्हॅक्सिन या लसीचा दुसरा डोस घ्यावयाचा असून, नमुद लसीकरण केद्रांवरुन फक्त कोव्हॅक्सिन लसीचा दुसरा डोज सकाळी ९ ते ५ या वेळांमध्ये देण्यात येणार आहे.
10:35 May 16
अमरावती नजीकच्या वलगाव येथे लॉकडाऊनचा फज्जा; भाजीबाजारात उसळली नागरिकांची गर्दी..
अमरावती - जिल्ह्यात कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने लॉकडाऊन हा 22 एप्रिल पर्यत पुन्हा वाढवला आहे. पण यात काही निर्बंध शिथिल करण्यात आले आहे.त्यामुळे भाजीपाला, किराणा, फळे दूध आदी खाद्यपदार्थांना घरपोच सुविधा देण्याचे आदेश आहेत. या आदेशाला अमरावती नजीकच्या वलगाव मधील व्यावसायिक व नागरिकांनी हरताळ फासत, बाजारपेठेत मोठी गर्दी केल्याचं चित्र आज सकाळी पाहायला मिळालं.
09:58 May 16
कोल्हापूर - जिल्ह्यात १०० टक्के लॉकडाऊन, पुढील आठ दिवस नियम पाळा- जिल्हा पोलीस प्रमुख
कोल्हापुर- कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात शनिवारी मध्यरात्रीपासून कडक लॉकडाऊन सुरुवात झाली आहे. प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत जिल्ह्यातील नागरिकांनी लॉकडाऊन शंभर टक्के यशस्वी केला आहे. पुढील आठ दिवस नागरिकांनी नियम पाळावेत, असे आवाहन जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. शैलेश बलकवडे यांनी केले आहे.
08:56 May 16
जळगावात कोव्हॅक्सिन लसीचे २३०० डोस उपलब्ध; दुसऱ्या डोससाठीच लसीकरण होणार
जळगाव : कोव्हॅक्सिन लसीचे जिल्ह्यासाठी २३०० डोस प्राप्त झाले आहेत. उपलब्ध झालेले हे डोस ४५ वर्षांवरील नागरिकांसाठीच्या दुसऱ्या डोसच्या लसीकरणासाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे दुसरा डोस घेणाऱ्या नागरिकांना काहीअंशी दिलासा मिळाला आहे. शहरातील स्वाध्याय भवन व रोटरी भवनाच्या लसीकरण केंद्रांवर कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस उपलब्ध राहणार आहे.
08:35 May 16
नालासोपाऱ्यात मंगल कार्यालयावर पालिकेची कारवाई, 50 हजाराचा दंड वसूल
पालघर/नालासोपारा : नालासोपारा येथे कोवीड 19 नियमांचे उल्लंघन करून लग्न समारंभाचे आयोजन करत गर्दी जमविल्या प्रकरणी आशीर्वाद हाॅलच्या मालकांवर कारवाई करण्यात आली असून लग्न समारंभाच्या आयोजकावर प्रभाग समीती 'बी' कार्यालयामार्फत कारवाई करत 50 हजाराचा दंड ठोठावण्यात आला आहे.
07:10 May 16
फूड पॅकेट्सची मदत करणाऱ्या सर्वांना कोल्हापूर पोलिसांनी केलीये 'ही' विनंती..
कोल्हापूर : कोल्हापूरात मदत करणाऱ्यांची, सामाजिक संघटनांची कमी नाही. सद्या अनेक सामाजिक संघटना, व्यक्ती गरजू आणि निराधार व्यक्तींना फूड पॅकेट्स वाटत आहेत. मात्र 23 मे पर्यंत जिल्ह्यात कडक लॉकडाऊन करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर कोणीही घरातून बाहेर पडू नये. आपल्याला जर मदत करायचीच असेल तर कोल्हापूर पोलिसांनी सुरू केलेल्या संवेदना नावाच्या सामाजिक उपक्रमाला फूड पॅकेट्सची देऊन मदत करू शकता, असे कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी म्हटले आहे.
06:23 May 16
राज्यातील कोरोना परिस्थितीचे ताजे अपडेट्स; वाचा एका क्लिकवर..
मुंबई - राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार राज्यात आज एकाच दिवशी 59 हजार 73 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत राज्यात 47 लाख 67 हजार 53 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर, दुसरीकडे 34 हजार 848 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात आत्तापर्यंत 53 लाख 44 हजार 63 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. असे असले तरी या तिसऱ्या लाटेमध्ये रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वाढल्याचे आपल्याला दिसून येते. राज्यात एकाच दिवसात 960 रुग्णांनी उपचारादरम्यान आपले प्राण गमावले आहे.
राज्यातील कोरोनाची स्थिती
राज्यात 24 तासांत 960 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूदर 1.5 टक्के एवढा आहे. राज्यात एकूण सक्रिय रुग्ण 4 लाख 94 हजार 32 इतकी आहेत.