ETV Bharat / city

LIVE Updates : राज्यातील कोरोना परिस्थितीचे ताजे अपडेट्स; वाचा एका क्लिकवर..

author img

By

Published : May 11, 2021, 6:58 AM IST

Updated : May 11, 2021, 4:59 PM IST

Maharashtra Corona situation LIVE updates on ETV Bharat
LIVE Updates : राज्यातील कोरोना परिस्थितीचे ताजे अपडेट्स; वाचा एका क्लिकवर..

16:58 May 11

महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, दिल्ली, राजस्थान, हरियाणा, छत्तीसगड, बिहार आणि गुजरातमध्येही दररोज आढळणाऱ्या नविन कोरोनाबाधितांमध्ये सातत्याने घट दिसून येत आहे : आरोग्य मंत्रालय

16:04 May 11

'कोविशिल्ड' लसीपाठोपाठ आता 'कोवॅक्सिन'ची निर्मितीही महाराष्ट्रात होणार आहे. भारत बायोटेकच्या सहयोगी कंपनीला महाराष्ट्रात निर्मीतीसाठी ताबडतोब मंजूरी द्या, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला निर्देश दिले आहेत. पुण्याजवळ 12 हेक्टर भूखंडावर लस उत्पादनासाठी 'बायोवेट प्रायव्हेट लिमिटेड' ही कंपनी मुंबई उच्च न्यायालयात पोहोचली होती. त्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने आदेश दिला. कर्नाटकच्या बायोवेट प्रायव्हेट लिमिटेडने पुण्यातील मंजरी खुर्द गावात मॅन्युफॅक्चरिंग युनिटचा ताबा देण्याच्या दिशेने महाराष्ट्र सरकारकडे निर्देश देण्याच्या मागणीच्या याचिकेवर न्यायाधीश बोरकर यांच्या खंडीठासमोर सुनावणी झाली.

16:03 May 11

दिलासादायक : महाराष्ट्रात कोवेक्सिन लसीच्या उत्पादनाचा मार्ग मोकळा...

13:57 May 11

लॉकडाऊनचे निर्बंध झुगारून कापड विक्री करणाऱ्या प्रसिद्ध कापड दुकानावर पोलिसांची कारवाई..

पैठण - कोरोना महामारीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने लॉकडाऊन घोषित केले आहे. लॉकडाउन काळात कापड व्यवसाय करण्यास निर्बंध घातले असताना, शहरातील प्रसिद्ध कापड दुकान शुभसंकेतच्या गोडाऊन वर विना परवानगी कापड विक्री करीत होते.

13:56 May 11

मध्यवर्ती बसस्थानकात कर्मचाऱ्यांनी नियम धाब्यावर बसवत केला वाढदिवस साजरा

औरंगाबाद : औरंगाबाद बसस्थानकावर एसटी कर्मचाऱ्यांनी लॉकडाऊनचे नियम धाब्यावर बसवून वाढदिवस साजरा केल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, या वाढदिवसाला कर्मचाऱ्यांसोबत वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते. 20 ते 25 कर्मचाऱ्यांनी बसस्थानकात गर्दी केली होती.

13:55 May 11

क्रिकेट खेळणाऱ्या 10 तरुणांवर दंडात्मक कारवाई..

सांगली - शहरात लॉकडाऊनचे नियम मोडून क्रिकेट खेळणाऱ्या 10 तरुणांवर सांगली पोलिसानी दंडात्मक कारवाई केली आहे.सांगलीच्या आंबेडकर स्टेडियम येथे 14 तरुण खेळत होते.पोलिसांची चाहूल लागताच यातील 4 जण पळून गेले.

13:54 May 11

नाशकात उद्याच्या लॉकडाऊन मुळे बाजारात नागरिकांची मोठी गर्दी.

नाशिक - जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी प्रशसनाने 12 मे पासून 23 मे पर्यंत कडक लॉक डाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे.या काळात वैद्यकीय कामा व्यतिरिक्त नागरीकांना घरा बाहेर पडता येणार नाही.आणि याचाच परिणाम आज बाजारपेठेत बघायला मिळाला,आज शहरातील सर्वच ठिकाणी नागरीकांना भाजीपाला,किराणा,चिकन,अंडी सह इतर वस्तू खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी केल्याने सोशल डिस्टनसिंग चा मात्र फज्जा उडाल्याचे दिसून आलं.

13:54 May 11

संजय राऊत यांच्या हस्ते भांडुप येथील लसीकरण केंद्राचे लोकापर्ण

मुंबई - मुंबईत कोरोना चा प्रादुर्भाव कमी करायचा असेल तर जास्तीत जास्त लसीकरण हाच मार्ग सध्या दिसत आहे. त्यामुळे जागोजागी जास्तीत जास्त लसीकरण केंद्र उभारण्यावर पालिकेकडून भर देण्यात येत आहे. आज भांडुप येथील बापूसाहेब जुवेकर मार्गावरील महापालिका रुग्णालयात लसीकरण केंद्राचे खासदार संजय राऊत यांच्या हस्ते लोकापर्ण झाले.

13:53 May 11

मुंबईतील कोरोना रुग्णांना पुण्याच्या वॉर रूममधून फोन येत असल्याचा दावा नितेश राणे यांनी केला..

मुंबई : देशभरात नावाजला जात असणारा महाविकास आघाडी सरकराचा मुंबई पॅटर्न हा निव्वळ खोटारडेपणा असल्याचा आरोप भाजप आमदार नितेश राणे यांनी केला आहे. ठाकरे सरकार मुंबईतील रुग्णांची नोंद पुण्याच्या खात्यात करून येथील आकडा कमी भासवत असल्याचे नितेश राणे यांनी ट्विट करून म्हटले आहे. 

13:53 May 11

लसीकरणासाठी बडनेरात पहाटेपासून रांग

अमरावती - बडनेरा जुनीवस्ती परिसरॅट कोवॅक्सिन घेण्यासाठी मंगळवारी पहाटे पासून नागरिकांची रांग लागली. केवळ 100 डोज आले असताना हजारो नागरिकांची गर्दी उसळली. विशेष म्हणजे बडनेरा परिसरात अमरावती शहरतूनही अनेकांनी लस घेण्यासाठी धाव घेतल्याने प्रशासनाची नियोजन शून्यता समोर आली.

13:52 May 11

कोल्हापुर - मंत्र्यांच्या रोज बदलत्या 'लॉकडाऊन' भूमिकेमुळे बाजारात गर्दी

कोल्हापूर- लॉकडाऊन, जनता कर्फ्यु, पुन्हा लॉकडाऊन मंत्र्यांच्या या रोजच्या बदलत्या भूमिकेमुळे बाजारात गर्दी होत असल्याचे चित्र आहे. येत्या दोन दिवसांत कोल्हापूर जिल्हा कडक लॉकडाऊन करणार असल्याची घोषणा करताच शहरातील लक्ष्मीपुरी बाजारपेठेत खरेदीसाठी नागरिकांची गर्दी उसळली आहे. यावेळी सोशल डिस्टन्सचा फज्जा उडाला असून नियमांना हरताळ फासला आहे. 'दिवसभर कमावलं पण ७ ते ११ या वेळेत गमावलं' अशी परिस्थिती शहरातील झाली आहे.

11:39 May 11

सुप्रीम कोर्टाला मुंबईची रियालिटी माहित आहे का, मनसेचा सवाल

मुंबई - राज्यात कोरोना रुग्णसंख्या वाढली की जनता बेजबाबदार आणि कमी झाली की सरकार आणि प्रशासनाचे यश अशी दुटप्पी भूमिका सरकार घेत आहे. त्याचबरोबर सुप्रीम कोर्टाला मुंबईतील ग्राऊंड रियालिटी माहिती आहे का, असा सवाल मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केला आहे.

11:39 May 11

तळेगाव ढमढेरे प्राथमिक आरोग्य केंद्रात पहाटे पासून रांगा..

पुणे - तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत सोळा गावातील नागरिक कोवीड प्रतिबंधक लसीकरणासाठी पहाटे चार पासूनच रांगा लावत असल्याने मोठी गर्दी होत आहे. त्यामुळे अनेकांना हेलपाटेही मारण्याची वेळ आली आहे.

11:39 May 11

पालकमंत्री यांनी केली केंद्रीय नियंत्रण कक्षाची पाहणी

नागपूर - महानगरपालिका आणि नागपूर जिल्हा प्रशासन द्वारे संयुक्त रूपाने संचालित केंद्रीय नियंत्रण कक्षाचे निरीक्षण पालकमंत्री डॉ नितीन राऊत यांनी केले. त्यांच्या सोबत आमदार दुष्यंत चतुर्वेदी, मनपाचे विरोधी पक्ष नेता श्री तानाजी वनवे, ज्येष्ठ नगरसेवक प्रफुल गुडधे, मनपा आयुक्त राधाकृष्णन बी आणि जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे उपस्थित होते.

11:38 May 11

लस घेण्यासाठी होणाऱ्या गर्दीवरून राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी आरोग्य यंत्रणेला फटकारले

सिल्लोड - लस घेण्यासाठी होणाऱ्या गर्दीवरून राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी आरोग्य यंत्रणेला फटकारले आहे गर्दी टाळण्यासाठी लसीकरण केंद्राचे विभाजन करण्यात आले असून, आता शहरातील छत्रपती शाहू महाराज व मौलाना आझाद सभागृह या दोन ठिकाणी लस मिळणार आहे.

11:38 May 11

अहमदनगर- जिल्ह्यात रुग्णवाढीने चिंता कायम, नगर शहरात मात्र दिलासा..

अहमदनगर - जिल्ह्यात दोन दिवस रुग्णांची संख्या घटली होती. मात्र सोमवारी पुन्हा एकदा रुग्णांची संख्या चार हजारांच्या पार गेल्याने जिल्हा पुढील कोरोनाचे संकट कायम असल्याचे दिसून येत आहे. मात्र दुसरीकडे नगर शहरांमध्ये असलेली रुग्ण संख्या ही निम्म्याने घटल्याचे दिसून येत असून गेल्या आठ दिवसांपासून शहरात सुरू असलेला कडक लॉकडाऊनचा हा परिणाम म्हणावा लागेल.

11:37 May 11

खासगी हॉस्पिटलच्या बिलांना चाप... ऑडिट करून महापालिकेने सव्वा तीन कोटी रुपये परत मिळवून दिले

पुणे - कोरोना रुग्णांवरील उपचाराचे अव्वा च्या सवा बिल घेणाऱ्या खासगी रुग्णालयांना पुणे महापालिकेने चांगलंच चाप लावला आहे. कोरोनाच्या सुरवातीला पुण्यातील खाजगी रुग्णालयांच्या माध्यमातून रुग्णांना मोठ्या प्रमाणात बिल येत होतं. कोणत्याही प्रकारचं या खाजगी रुग्णालयांकडून ऑडिट होत नव्हतं. आत्ता महापालिकेच्या माध्यमातून या रुग्णालयांचे ऑडिट करून गेल्या नऊ महिन्यांतील सुमारे आठशे रुग्णांना सव्वातीन कोटी रुपये पालिकेने परत मिळवून दिले आहेत. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना दिलासा मिळाला आहे.

11:37 May 11

सलग दुसऱ्या दिवशी देखील 45 वर्षावरील नागरिकांचे लसीकरण बंद

नागपूर - शहराकरिता आवश्यक लसी प्राप्त न झाल्याने सलग दुसऱ्या दिवशी ४५ वर्षावरील नागरिकांचे लसीकरण बंद पडलेले आहे,त्यामुळे या वयोगटातील नागरिकांमध्ये कमालीची नाराजी निर्माण होऊ लागली आहे. तर १८ ते ४४ या वयोगटातील व्यक्तींसाठी शहरातील केवळ ६ ठिकणीच लसीकरणाची व्यवस्था करण्यात आल्याने अनेकांना इच्छा असताना देखील लस मिळत नसल्याने त्यांच्यात देखील नाराजीचा सूर उमटू लागला आहे.

09:03 May 11

अमरावती जिल्ह्यात कोरोनाची तिसरी लाट? मंत्री यशोमती ठाकुरांनी व्यक्त केली शंका.

अमरावती - जिल्ह्यात कोरोना रुग्ण झपाट्याने वाढत आहे.त्यातच आता ग्रामिण भागांतून मोठ्या प्रमाणावर नवे कोरोना बाधित रुग्ण आढळत आहे.त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाची तिसरी लाट आली की काय अशी शंका राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केली आहे. अमरावती जिल्ह्यातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर कोरोना रुग्ण संख्या वाढत आहे.त्यामुळे आता मोठी दक्षता घेण्याची गरज आहे असही मंत्री यशोमती ठाकूर म्हणाल्या.

09:02 May 11

उरणच्या लसीकरणात रात्रीस खेळ चाले; मध्यरात्री 2 वाजता टोकन वाटणारा महाभाग कोण?

रायगड : उरण शहरासाठी असणाऱ्या लसीकरण केंद्रावर सध्या टोकन घोटाळा होत असून, लस घेण्यासाठी मध्यरात्रीपासून रांगा लागत आहेत. मात्र तासंतास रांगेत उभे राहूनही वयोवृद्धांना डोस मिळत नसल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. मध्यरात्री 2 वाजता टोकन वाटण्यात येत आहेत. प्रत्यक्षात सकाळी 9 वाजता टोकन वाटण्यात येईल असा फलक लावण्यात येत असतानाही मध्यरात्री 2 वाजता टोकन वाटणारा हा महाभाग कोण? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

09:01 May 11

जिल्हा कोरोनाच्या तिसरा लाटे साठी सज्ज - जिल्हाधिकारी

नंदुरबार - आरोग्य सुविधांमध्ये मागासलेला नंदुरबार जिल्हा आता कोरोनाच्या तिसऱ्या लाटीसाठी सज्ज होत असुन त्याच अनुशंगाने नंदुरबार जिल्ह्यात आरोग्य सुविधा उभ्या केल्या जात आहे. विशेष म्हणजे याच आदिवासी भागातील स्थानिक असलेल्या जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी ज्या नंदुरबार जिल्ह्यातुन आपलं माध्यमिक शिक्षण पूर्ण केलं, त्याच नंदुरबारला ते आपल्या कल्पकतेतुन आरोग्य सुविधासाठी सबळ आणि परिपुर्ण बनविण्याचा प्रयत्न करत आहेत.

09:01 May 11

नवी मुंबईत कोविडच्या संभाव्य तिस-या लाटेदरम्यान मुलांच्या सुरक्षिततेला दिले जाणार प्राधान्य

नवी मुंबई : कोविडच्या संभाव्य तिस-या लाटेच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने नवी महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी नवी मुंबई महानगरपालिकेच्या कोविडं टास्क फोर्समधील डॉक्टर्स तसेच अखिल भारतीय बालरोगतज्ज्ञ संघटना, नवी मुंबईचे पदाधिकारी असणारे बालरोगतज्ज्ञ यांच्याशी वेबसंवाद साधत आगामी नियोजनच्या दृष्टीने सर्वांगीण चर्चा केली. त्यांच्या संपन्न अनुभवाचा नियोजनामध्ये उपयोग व्हावा यादृष्टीने ही चर्चा अत्यंत महत्वाची होती.

06:37 May 11

अहमदनगर- कोरोना रुग्णांना भेटू द्या म्हणून नातेवाईकांची अरेरावी.. जिल्हा रुग्णालयात गोंधळ

अहमदनगर - क्षमतेपेक्षा अधिक कोरोनाबाधित रुग्ण जिल्हा रुग्णालयात असताना त्यांना भेटायला येत असलेल्या नातेवाईकांना जिल्हा रुग्णालय प्रशासनाने बंदी घातल्या नंतर रुग्णांच्या नातेवाईकांनी सोमवारी संध्याकाळी एकच गोंधळ घातला. आम्हाला आमच्या नातेवाईकांना भेटून जेवण-पाणी द्यायचे आहे, त्यांची तब्येतीची महिती हवी आहे असे सांगणाऱ्या नातेवाईकांनाच्या बाजूने काही सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते उभे ठाकल्याने जिल्हा रुग्णालयात एकच गोंधळ उडाला. 

06:37 May 11

म्युकरमायकोसिसचा पहिला रुग्ण आढळला ठाण्यात? महिलेचा डोळा झाला निकमी

ठाणे : कोरोनाबाधित रुग्णांमध्ये आता एका नवीन आजाराची लक्षणे दिसून येतात ज्याला म्युकरमायकोसिस असे म्हणटले गेले आहे ही लक्षणे असलेला पहिला रुग्ण ठाणे जिल्हयात ठाण्यात आढळला असून करोना बाधित रुगणांची प्रतिकार कमी झाल्यास असे प्रकार रुग्णांसोबत घडू शकतात याची फक्त चर्चा होती ते आता ठाण्यात पाहिल्याची भीती निर्माण झाली आहे.

06:32 May 11

राज्यातील कोरोना परिस्थितीचे ताजे अपडेट्स; वाचा एका क्लिकवर..

मुंबई - राज्यात आज (दि. 12) एकाच दिवशी 61 हजार 607 रुग्ण कोरोनामुक्त मात केलेली आहे. आतापर्यंत राज्यात 44 लाख 69 हजार 425 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर दुसरीकडे 37 हजार 326 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात आत्तापर्यंत 51 लाख 38 हजार 937 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात कडक निर्बंध असा पर्याय निवडला होता त्यामुळे कुठेतरी रुग्ण संख्या कमी होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

राज्यातील कोरोनाची स्थिती

  • राज्यात 61 हजार 607 रुग्ण 24 तासांत कोरोनामुक्त झाले आहेत.
  • राज्यात आतापर्यंत 44 लाख 69 हजार 425 रुग्णांनी कोरोनावर मात केली.
  • राज्यात नव्या 37 हजार 326 रुग्णांची नोंद झाली आहे.
  • राज्यात 24 तासांत 549 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूदर 1.49 टक्के एवढा आहे.
  • राज्यात एकूण 51लाख 38 हजार 937 रुग्णांची नोंद झाली.
  • राज्यात एकूण सक्रिय रुग्ण 5 लाख 90 हजार 818 इतकी झाली.

Last Updated : May 11, 2021, 4:59 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.