मुंबई - राज्यात आज (दि. 12) एकाच दिवशी 61 हजार 607 रुग्ण कोरोनामुक्त मात केलेली आहे. आतापर्यंत राज्यात 44 लाख 69 हजार 425 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर दुसरीकडे 37 हजार 326 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात आत्तापर्यंत 51 लाख 38 हजार 937 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात कडक निर्बंध असा पर्याय निवडला होता त्यामुळे कुठेतरी रुग्ण संख्या कमी होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
LIVE Updates : राज्यातील कोरोना परिस्थितीचे ताजे अपडेट्स; वाचा एका क्लिकवर.. - महाराष्ट्र कोरोना रुग्ण
22:25 May 10
राज्यात आज 37 हजार 326 नव्या कोरोना रुग्णांची नोंद
16:55 May 10
कोविडविषयी बातम्या थांबवण्यासंदर्भातील याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
औरंगाबाद - इलेक्ट्रॉनिक मीडियाकडून कोविडविषयक बातम्यांचा अतिरेक थांबवण्याची विनंती करणारी जनहित याचिका अमित जैन यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल केली होती. ही याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. न्यायमुर्ती एस. व्ही. गंगापूरवाला आणि न्यायमुर्ती श्रीकांत कुलकर्णी यांनी हा निर्णय दिला.
12:29 May 10
फ्रान्सकडून भारताला मोठी मदत , भारतीय युद्धनौकेने आणले दोन लिक्विड ऑक्सिजन
कोरोना संक्रमणाच्या दुसऱ्या लाटेने भारतात थैमान घातलेलं असून यामुळे दिवसेंदिवस कोरोना संक्रमित रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत असताना ऑक्सिजन पुरवठा सुरळीत करण्याचे काम युद्धपातळीवर प्रशासकीय स्तरावर सुरू आहे. यातच भारताला परदेशातून मोठ्या प्रमाणात कोरोना संक्रमणाच्या दृष्टीकोनातून वैद्यकीय मदत पाठवली जात आहे. याचाच भाग म्हणून फ्रान्स या देशाकडून भारताला 40 टन लिक्विड ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात आलेला आहे.
12:27 May 10
कोरोना रोखण्यासाठी प्रशासनाची अनोखी शक्कल; आता लसीकरणाआधी कोरोनाची रँपीड अँटिजेन टेस्ट..
अहमदनगर जिल्ह्यातील काही लसीकरण केंद्रानवर आता लसीकरणा आधी कोरोनाची रँपीड अँटिजेन टेस्ट करण्यास सुरवात झाली आहे. संगमनेर तालुक्यातील लसीकरण केंद्रांवर कोरोना प्रतिबंधात्मक लस घेण्यासाठी जाणाऱ्या नागरिकांना लसीचा पहिला आणी दुसरा डोस घेण्याआधी रॅपिड अँटिजेन टेस्ट केली जात आहे. ही टेस्ट पॉझिटिव्ह आल्यास त्या व्यक्तीचे लसीकरण न करता, त्याची लक्षणे बघून सौम्य लक्षणे असल्यास लसीकरण केंद्राजवळच्या कोविड हेल्थ केअर सेंटरमध्ये आणि मध्यम तीव्र स्वरूपाची लक्षणे असल्यास लसीकरण केंद्राजवळच्या डेडिकेटेड कोविड हेल्थ केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात येणार आहे.
12:26 May 10
अहमदनगर- थांबता थांबेना रेमेडिसीवरचा काळाबाजार, चार अटकेत
अहमदनगर- जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील वडाळा बहिरोबा येथे कोरोना संसर्गाचा फायदा घेण्याच्या उद्देशाने रेमडेसिविर इंजेक्शन विक्री रॅकेट वर जिल्हा गुन्हे अन्वेषण शाखेने छापा टाकून एकूण चार आरोपींना अटक केली आहे, तर एक आरोपी मात्र फरार झालेला आहे.
12:26 May 10
जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कोरोनाला खुलेआम निमंत्रण!
जळगाव - जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा वेग कायम आहे. दररोज शेकडोंच्या संख्येने कोरोनाचे नवे पॉझिटिव्ह रुग्ण समोर येत असून, मृत्यूचे आकडेही भयावह आहेत. एवढी विपरीत परिस्थिती असताना जळगावकर मात्र, स्वतःच्या आरोग्याच्या बाबतीत कमालीचे बेफिकीर असल्याचे पाहायला मिळत आहे. येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत दररोज पहाटेच्या वेळी होणाऱ्या भाजीपाला व फळांच्या लिलावावेळी हजारोंच्या संख्येने गर्दी उसळत आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती आहे.
12:26 May 10
कोरोना रुग्ण कमी न होणाऱ्या गावांना अलर्ट आणि 'हाय अलर्ट' गावे म्हणून घोषित...
पुणे - जिल्ह्यातील ग्रामीण भागात शहरांपेक्षा अधिक कोरोना बाधित रुग्ण सापडत आहे. काही गावांमध्ये तर दररोज बाधित रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे सर्व उपाययोजना करूनही रुग्णांची संख्या कमी झाली नसल्याने त्या गावांना 'हाय अलर्ट' आणि अलर्ट गावे म्हणून घोषित करण्यात आली आहेत.
08:08 May 10
नाशिक - इथं कोरोनाला कोणीच घाबरत नाही;मालेगावकरांकडून कोरोना नियमांचे सर्रास उल्लंघन.
नाशिक - जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक सुरू असतांना मालेगावात मात्र सर्व अलबेल असल्याचे चित्र आहे. एकीकडे कोरोना रुग्ण वाढत असतांना मालेगावात कोरोना नियमांचे सर्रास उल्लंघन होत असून बाजारपेठ नागरिकांच्या गर्दीने फुलुन गेल्या असून प्रशासनाकडून मात्र या कडे डोळेझाक केली जातं असल्याचं बोललं जातं आहे.
08:06 May 10
अहमदनगर- जामखेड शहरात वीस मे पर्यंत कडकडीत जनता कर्फ्युचा निर्णय
अहमदनगर- दिवसेंदिवस जामखेड शहराची कोरोना बाधितांची परीस्थिती बिकट होत आसताना प्रांताधिकारी अर्चना नष्टे यांच्या उपस्थितीत व्यापाऱ्यानसमवेत पार पडलेल्या बैठकीत जामखेड शहरात १० ते २० मे पर्यंत कडकडीत जनता कर्फ्यू सर्वांच्या संमतीने जाहीर करण्यात आला.
06:48 May 10
उपराजधानीत बाधितांच्या तुलनेत दुप्पट कोरोनामुक्त..
नागपूर - शहर आणि जिल्ह्यात रविवारी आलेल्या अहवालात मागील 24 तासात 3104 कोरोनाबधितांची भर पडली आहे. यात बाधितांच्या तुलनेत दुप्पट जण हे कोरोनामुक्त झाल्याने दिलासा मिळू लागले आहे. मागील 10 दिवसांपासून कोरोना बाधितांच्या संख्येत घट होत असून रुग्णसंख्या 3 हजारच्या घरात आली असून कोरोनामुक्त रुग्णाची संख्या 7 हजारच्या घरात जाऊन पोहचली आहे.
06:47 May 10
नाशिक - शिवसेना नगरसेविका सत्यभामा गाडेकर यांचं कोरोनाने निधन.
नाशिक - शिवसेना महिला आघाडीच्या उत्तर महाराष्ट्र प्रमुख व नगरसेविका सत्यभामा गाडेकर याचं यांचं (वय 56) यांचं कोरोनाने निधन झाले यांच्या जाण्याने उत्तर महाराष्ट्रतिल महिला आघाडीत पोकळी निर्माण झाली असल्याची प्रक्रिया राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.
06:47 May 10
मुंबईतील कोविड रुग्ण आणि मृत्यूंची आकडेवारी पूर्णपणे पारदर्शक, पालिकेने आरोप फेटाळले
मुंबई - मुंबईत गेले वर्षभर कोरोनाचा प्रसार आहे. गेल्या तीन महिन्यात कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात झाला. हा प्रसार कमी होत असतानाच पालिकेकडून रुग्ण आणि मृत्यूंची आकडेवारी लपवली जात असल्याचा आरोप केला जात आहे. असाच आरोप राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनीही केला आहे. तसे पत्र त्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिले आहे. यावर पालिकेने खुलासा केला असून कोणत्याही प्रकारची आकडेवारी लपवली जात नसल्याचे स्पष्ट केले आहे.
06:47 May 10
ऑक्सिजनचे सिलेंडर जप्त; मध्यरात्रीची कारवाई
जालना शहरातील गरीब शहा बाजारांमध्ये एका गोदामा मधून ऑक्सिजनचे 49 सिलेंडर जप्त करण्यात आले आहेत. महसूल प्रशासन आणि औषधी प्रशासनाने संयुक्तरित्या ही कारवाई केली.
06:44 May 10
राज्यातील कोरोना परिस्थितीचे ताजे अपडेट्स; वाचा एका क्लिकवर..
मुंबई - रविवारी राज्यात एकाच दिवशी 60 हजार 226 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात आतापर्यंत 44 लाख 7 हजार 818 रुग्णांनी कोरोनावर मात केली. तर राज्यात आज 48 हजार 401 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ झाली असून आज 572 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे.
राज्यातील कोरोनाची स्थिती
- राज्यात 60 हजार 226 रुग्ण 24 तासात कोरोनामुक्त झाले आहेत.
- राज्यात आतापर्यंत 44 लाख 7 हजार 818 रुग्णांनी कोरोनावर मात केली.
- राज्यात नव्या 48 हजार 401 रुग्णांची नोंद झाली आहे.
- राज्यात 24 तासांत 572 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूदर 1.49 टक्के एवढा आहे.
- राज्यात एकूण 51 लाख 1 हजार 737 रुग्णांची नोंद झाली.
- राज्यात एकूण सक्रिय रुग्ण 6 लाख 15 हजार 783 इतकी झाली.