पुणे - शहरात लॉकडाऊनबाबत उच्च न्यायालयाने सरकारला सूचना केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यात कडक लॉकडाऊन लागणार का याची चर्चा असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी पुण्यात याबाबत भाष्य केले. लॉकडाऊन करायचा की नाही याबाबत मी बोलणार नाही, त्याबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील. मात्र, सध्याच्या परिस्थितीबाबत आढावा घेताना काही बाबी निदर्शनास येत असल्याचे अजित पवार म्हणाले. त्यांनी शुक्रवारी कोरोना आढावा बैठक घेतली त्यानंतर ते बोलत होते.
LIVE Updates : राज्यातील कोरोना परिस्थितीचे ताजे अपडेट्स; वाचा एका क्लिकवर..
19:24 May 07
पुण्यातील लॉकडाऊनबाबत आज झाली बैठक
16:54 May 07
१८ वर्षांखालील मुलांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी ‘पेडीयाट्रीक टास्क फोर्स’ची निर्मिती - टोपे
मुंबई - राज्यात येत्या तीन महिन्यांत कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. केंद्र शासनाच्या बैठकीतही सूचना देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर १८ वर्षांखालील मुलांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी राज्यात तातडीने ‘पेडीयाट्रीक टास्क फोर्स’ची निर्मिती करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
15:42 May 07
मुलुंड जम्बो कोविड सेंटरमध्ये ऑक्सिजन साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध
मुंबईत ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत नाही. सर्वोच्च न्यायालयाने आणि मुंबई उच्च न्यायालयाने देखील याचे कौतुक केले आहे. ऑक्सिजनचे नियोजनपूर्वक व्यवस्थापन केल्यामुळेच तुटवडा भासत असतानाही मुंबईत दिल्ली किंवा अन्य राज्यांसारखी गंभीर परिस्थिती निर्माण झालेली नाही. मुंबईच्या मुलुंड येथील जम्बो कोविड सेंटरमध्ये एकूण 1650 बेड आहेत. त्यातील 100 पेक्षा जास्त बेड हे रिकामे आहेत. तसेच 700 ऑक्सिजन बेड आहेत. त्याबरोबर ऑक्सिजन साठा ही बरोबर आहे. कोणताही तुटवडा सध्या जाणवत नाही. पालिकेने योग्यप्रकारे नियोजन केलं आहे असे मुलुंड येथील जम्बो कोविड सेंटरचे डॉक्टर अभय नाईक यांनी सांगितले.
11:23 May 07
ऑक्सिजन प्रकल्पासाठी वापरता येणार आमदार निधी
मुंबई - कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. यापार्श्वभूमीवर राज्य सरकारने शासकीय रुग्णालये, शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व सलग्न रुग्णालये आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रुग्णालयांमध्ये वैद्यकीय ऑक्सिजन प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी आमदार निधीच्या खर्चाला राज्य शासनाने मंजुरी दिल्याचे अद्यादेश काढण्यात आले आहेत.
10:17 May 07
जालना विभागीय आयुक्तांनी केली ऑक्सिजन प्लांटची पाहणी
जालना - नाशिक येथील ऑक्सिजन प्लांट मुळे झालेल्या दुर्घटनेनंतर आता आरोग्य विभाग अधिक सतर्क झाला आहे. त्यासोबत वरिष्ठ पातळीवरील अधिकारी देखील ऑक्सिजन विषयीच्या समस्येसंदर्भात बारकाईने लक्ष ठेवून आहेत. त्याचाच एक भाग म्हणून औरंगाबाद विभागाचे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी गुरुवारी येथील कोविड हॉस्पिटलच्या ऑक्सिजन प्लांटची पाहणी केली.
10:16 May 07
पगार वाढ, कोविडमुळे मृत कर्मचाऱ्यांना आर्थिक मदतीसाठी बेस्ट कर्मचाऱ्यांचे आंदोलन
मुंबई - मुंबईत गेले वर्षभर कोरोनाचा प्रसार सुरू असताना आपल्या जीवाची परवा न करता बेस्ट कर्मचारी अत्यावश्यक सेवेत काम करत आहेत. मात्र कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत करण्यात आलेली नाही, पगार वाढही करण्यात आलेली नसल्याने बेस्टमधील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आज वडाळा, कुलाबा आणि बांद्रा डेपो येथे आंदोलन केले.
10:15 May 07
मुंबई पोलिसांकडून बनावट ई-पास बनवणाऱ्याला अटक..
मुंबई : अवघ्या एक हजार रुपयात ई-पास बनवून देण्याचा दावा करणाऱ्या एका व्यक्तीला मुंबईतील दहिसर पोलिसांनी अटक केली आहे. त्याने सोशल मीडियावरही या गोष्टीची जाहिरात केली होती.
10:15 May 07
वैजापूरच्या शासकीय कोविड सेंटर मध्ये महिलेला छेडले..
औरंगाबाद : वैजापूरच्या शासकीय निवासी वसतिगृहातील कोरोना उपचार केंद्रात ५ मे च्या रात्री खासगी रुग्णवाहिका चालकाने ग्रामीण भागातील कोरोनाबाधित महिलेची छेडछाड केल्याचा संतापजनक प्रकार घडला. रुद्र मावळे (रा. डाकपिंपळगाव, ता. वैजापूर) याच्याविरुद्ध वैजापूर पोलिस ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल झाला.
10:13 May 07
माढा - लसीकरणासाठी जिवघेणी गर्दी; नेत्यांचा हस्तक्षेप, सर्वसामान्याचे हाल
माढा - कोरोनाचा संसर्ग झपाट्याने होऊ लागल्याने नागरिक आता कोरोनापासुन बचाव करण्यासाठी आपल्याला लस टोचुन घेण्यासाठी धावपळ करीत आहेत. माढ्यासह सगळीकडेच लसीकरण केंद्रावर गर्दी होऊ लागल्याने कोरोना नियमांची सर्रास पायमल्ली होताना दिसत आहे. माढा शहरातील लसीकरण केंद्रावर देखील हाऊसफुल गर्दी होऊ लागली असून, नेते गिरी करणारे चिल्लर पुढारी लस टोचुन घेण्यासाठी हस्तक्षेप करीत आहेत.
10:11 May 07
नाशिक : टोसिलिझुमॅब इंजेक्शनचा गैरवापर केल्यास गुन्हा दाखल करणार - जिल्हाधिकारी मांढरे
नाशिक : रुग्णालयांमध्ये टोसिलिझुमॅब इंजेक्शनचा गैरवापर होत नाही ना, यावर अधिनस्त पथकाद्वारे तपासणी करुन लक्ष ठेवावे अशा सूचना जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी जिल्हा रुग्णालय आणि मालेगाव महापालिका आरोग्य प्रशासनाला दिल्या आहेत. तसेच इंजेक्शनचा दुरुपयोग होत असल्यास सबंधित रुग्णालयाविरुध्द फौजदारी गुन्हे दाखल करावे, असे स्पष्ट आदेश त्यांनी आरोग्य विभागाला दिले आहेत.
09:32 May 07
६१ हजार कोरोना प्रतिबंधात्मक लसी प्राप्त, ओडीसा येथून ऑक्सिजन सुद्धा मिळणार:- जिल्हाधिकारी
नागपूर : जिल्ह्यातील कोरोना लसीकरणाला गती देण्यासाठी ६१ हजार कोरोना प्रतिबंधात्मक लसी प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे लसीकरणाला गती आली असून पुढील काळात आणखी लसी केंद्राकडून मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दरम्यान रात्री उशिरा पुन्हा चार टँकर वायुदलाच्या विशेष विमानाने ओडिसा राज्यातील अंगूळ येथील स्टील प्लांटला रवाना करण्यात असून आज सायंकाळपर्यंत चार ऑक्सिजन टँकर नागपूर शहरात पोहोचण्याची अपेक्षा आहे.
09:30 May 07
४५ वर्षे वयोगटाच्या वरील नागरिकांचे लसीकरण सुरळीत; तर १८ ते ४४ वर्षे वयोगटासाठी आता ६ केंद्रांवर लसीकरण
नागपूर : शहरातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शहराकरीता राज्य शासनाच्या कोट्यातून लसीचा साठा प्राप्त झाल्यामुळे शहरातील ४५ वर्षावरील नागरिकांचे एकूण ९६ केंद्रांवर लसीकरण सुरू झाले आहे. यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (GMC) येथे २ केंद्रावर कोव्हॅक्सीन, इंदीरागांधी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे २ केंद्र व अ.भा. आर्युविज्ञान संस्था (AIMS) मध्ये ४ येथे कोव्हिशिल्ड याप्रमाणे एकुण ९६ शासकीय व मनपाच्या केंद्रावर ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण करण्यात येत असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी दिली.
08:50 May 07
परवानगी नसतांना दुकाने सुरु; नंदुरबारात 30 दुकानांवर कारवाई
नंदुरबार - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी असल्याने परवानगी नसतांना दुकाने सुरु ठेवणार्या नंदुरबार शहरातील तीस दुकानदारांवर कारवाई करण्यात आली आहे. यात साडीची 15 दुकाने, फुटवेअरची 2 दुकाने, भांडीची 1, हार्डवेअर 1, इलेक्ट्रीक्सची 1, ज्वेलर्सची 4, झाडुची 1 तर बँगल्सची 1 अशी दुकाने उघडी आढळल्याने कारवाई केली आहे. नगर पालिका प्रशासन व पोलीस विभागाच्या पथकाद्वारे वारंवार सूचना करून देखीलही व्यवसायिक दुर्लक्ष करीत असल्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
08:49 May 07
स्वनिधीतून लस खरेदीच्या परवानगासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र - महापौर दयाशंकर तिवारी
नागपूर - राज्याचे विधानसभेतील विरोधी पक्ष नेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरच्या नागरिकांचे सुरळीत लसीकरण करण्यासाठी महापौर दयाशंकर तिवारी यांच्या आवाहनावर आपल्या आमदार निधीतून मनपाला रुपये १ कोटीचा निधीचे पत्र महापौरांना दिले.
06:28 May 07
ऐरोलीतील श्रीराम शाळेने केले कोरोनाचे नियमांचे उल्लंघन
नवी मुंबई : ऐरोली सेक्टर ३ येथील श्रीराम विद्यालयाल शाळेतील व्यवस्थापकांनी नववीतील विद्यार्थ्यांच्या पालकांना निकाल घेण्यासाठी व्हाटसअप द्वारे सूचना संदेश पाठविला होता. त्यामुळे पालक व विद्यार्थ्यांनी शाळेमध्ये गर्दी केली होती. परंतु कोरोना काळात कोणत्याही प्रकारची सभा, बैठक अथवा गर्दी न करण्याच्या शासनाच्या आदेशाला श्रीराम शाळेने पायदळी तुडविल्याचा आरोप येथील पालकांनी केला आहे.
06:28 May 07
सोलापुरात गुरुवारी वाढले 2,117 रुग्ण; तर 53 रुग्णांचा मृत्यू
सोलापूर - वाढती कोरोना रुग्णसंख्या आणि वाढता मृत्यूदर यामुळे शहर आणि जिल्ह्यात सात दिवसांचा कडक लॉकडाऊन 8 मे पासून सुरू होणार आहे. गुरुवारी सोलापूर शहरात आणि जिल्ह्यात असे मिळुन 2,117 जणांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. तर उपचार घेत असलेल्या शहर आणि जिल्ह्यातील 53 पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
06:27 May 07
महाबळेश्वरजवळ पार्टी करणारांवर गुन्हा; साताऱ्यातही १५ जणांवर कारवाई
सातारा : कोरोना महामारीत आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू असतानाही सातारा शहर तसेच परिसरात विनाकारण फिरणे, विनामास्क फिरणारे पोलिसांच्या निदर्शनास आले. याप्रकरणी शहर पोलिसांनी १५ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
06:25 May 07
राज्यातील कोरोना परिस्थितीचे ताजे अपडेट्स; वाचा एका क्लिकवर..
मुंबई - राज्यात आज नव्या 62 हजार 194 रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे एकूण कोरोना रुग्णांचा संख्या 49 लाख 42 हजार 736 एवढी झाली आहे. तर 853 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तसेच आज दिवसभरात 63 हजार 842 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यात एकूण सक्रिय रुग्णांचा संख्या 6 लाख 39 हजार 75 इतकी झाली आहे.